माझा
मराठीची बोलू कौतुके।
परि
अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी
अक्षरे रसिके। मेळवीन।।
असे
मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर कवी सुरेश
भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा गायला आहे.
लाभले
आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो
खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या
जगात माय मानतो मराठी
२७
फेब्रुवारी हा दिवस मराठी
साहित्याचा मानदंड कुसुमाग्रज म्हणजेजच वि.वा.शिरवाडकर
यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी
भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा वाढविण्याचे खरे श्रेय छत्रपती शिवरायांना आहे.त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला. पुढे अनेक श्रेष्ठ संत मंडळींनी आपल्या बोलीतून मराठी भाषेला सजविले, फुलविले, मोठे केले. विसाव्या,एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केली. पण
हीच आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडते आहे. हे विधान सर्वत्र
ऐकायला मिळते. आणि ह्या मागे एक आर्त कळकळ
असते ती आपल्या मातृभाषेवरील
प्रेमाची, आस्थेची .
मुळात
भाषा कशासाठी ?
संवाद
साधण्यासाठी, भावना, विचार मांडण्यासाठी, ते जतन करून ठेवण्यासाठी, विकासासाठी.
आणि मग जेव्हा हीच
भाषा मागे पडते तेव्हा फक्त भाषा नाही तर एक संपूर्ण
मानव समुह , एक संस्कृती मागे
पडते.
बदलाच्या, काळाच्या ओघामध्ये पुढे जाणे गरजेचेच आहे परंतु आपल्या भाषेला धरून राहणे तितकेच महत्त्वाचे आहे . इतर भाषांचा राग किंवा द्वेष नाही परंतु आपल्या मराठी भाषेचा अभिमान जरूर असावा. दोन वाक्यांमध्येही सर्रास इंग्रजी शब्द वापरले जातात. कधी तो कामाचा भाग
असतो तर कधी प्रतिष्ठेचा!
अनेकदा आपण
‘मॉडर्न’ आहोत
हे दाखवायला इत्तर भाषांचा हात पकडला जातो . त्यामुळे आपल्याकडे एकाही भाषेत अस्खलित बोलण्याचं कौशल्य उरत नाही.
कामाच्या ठिकाणी सर्व भाषिक काम करतात. दिवसाचे दहा तास आपण ऑफिसमध्ये असतो. त्यामुळे एक ठरावीक मर्यादेपर्यंत
इंग्रजी शब्दांचा वापर केला तर काहीच हरकत
नाही. परंतु जिथे शक्य असेल तिथे मराठीत बोलायला काय हरकत आहे. परंतु मराठीत बोलणे हे आजकाल मागासलेले
समजले जाते. ज्या संस्कृत भाषेतून सर्व भाषांचा उगम झाला त्याच मारहती भाषेत बोलण्याची लाज वाटणाऱ्यांना माझा नमस्कार !!! आपल्या मातृभाषेची लाज वाटणे ह्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ???
भाषा
हि मुळात संवादासाठी असल्यामुळे आग्रह कुठे आणि किती असावा हे आपल्याला कळले
पाहिजे . स्वतः कुसुमाग्रजांनी
असं म्हटलंय –
परभाषेतही
व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी,
मायमराठी
मरते इकडे परकीचे पद चेपू नका!
भाषेच्या
वृद्धीपेक्षा समृद्धी अधिक महत्त्वाची आपणच आपल्या भाषेबद्दल असा दुजाभाव ठेवला तर इतरांनी मराठीचे
कौतुक गावे असे आपण कोणत्या तोंडानी म्हणावे.?
हल्ली
दिवस साजरे करणे खूप सहज शक्य झाले आहे परंतु ते साजरे होण्यापेक्षा
ते जगणे हे महत्त्वाचे आहे
. मराठी भाषेचा गोडवा गावा तेवढा थोडाच आहे. तो केवळ शब्दांनी
गाऊन चालणार नाही तर कृतीतही आणायला
हवा.
‘मराठी भाषा दिवस’ निमित्ताने आपल्या मायबोलीचा झेंडा उंच आकाशात सदैव फडकत राहो हीच इच्छा !!!
- सुप्रिया
नार्वेकर
Follow Us
Were this world an endless plain, and by sailing eastward we could for ever reach new distances