कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ७ समग्र परिवर्तन … (लाभार्थी आणि सेवेक ऱ्यांचे )


कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
 भाग - ७
समग्र परिवर्तन … (लाभार्थी आणि सेवेक ऱ्यांचे  ) 

आपण वेगवेगळ्या ६ भागांमधून कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराची माहिती घेतली . 
मला आलेले अनुभव , मी पाहिलेले हे सेवा शिबीर मी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयास केला . 
आणि ह्यामध्ये मला काही श्रद्धावान स्नेह्यांनी खूप मदत केली. 
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर म्हणजे एक नुसते सेवा शिबीर नाही ठरले माझ्यासाठी . 
तर माझ्यासाठी ती एक संस्कार शाळाच होती . 
सतत आपण रडत असतो , माझ्याकडे हे नाही,  माझ्याकडे ते नाही, देवा  मला हे दे , ते दे सतत मागण्या . 
सगळ्या सुख सोयी आहेत आपल्याकडे . 
हातात महागडे smart phone आहेत , hotel , मजा मस्ती , party , shopping सतत चालू असते . पण तरीही समाधान नाही . 
पण ह्या सेवा शिबिराला गेल्यावर कळले कि आपण किती नशीबवान आहोत. 
अजूनही त्या ठिकाणी गावांमध्ये वीज जाते , खूपशा आधुनिक गोष्टी तिथपर्यंत पोहचू शकत नाही पण हि खंत मला तिथल्या कोणत्याही माणसाच्या चेहऱ्यावर दिसली नाही . 
किंबहुना एक वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते . 
ह्या दोन दिवसांच्या कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा  शिबिराने माझ्यात खूप बदल झाले , विचार करण्याची दृष्टीच बदलली . 
आपल्या प्रेमाच्या दोन शब्दांनी , आपल्या प्रेमाच्या दोन क्षणांनी जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर 
तसे करायला काय हरकत आहे ना ?
दुसऱ्यांना आनंद देण्यात एक वेगळेच समाधान आहे. 
आणि त्याने तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होतात एवढे मात्र नक्की . 
मी घरी आईला मदत करते पण सगळी कामे स्वताची स्वतः करावी हि शिस्त मला ह्या कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा शिबिरामुळे लागली . घरी किंवा कुठलेही family function असेल तर काम करते मी 
पण अन्नपूर्णा प्रसादम च्या सेवेमध्ये हातात मोठे पातेले घेऊन , खाली वाकून एका वेळी २५-३० भक्तांना जेवण वाढणे , आणि ते सुद्धा दिवसभर. 
आणि सेवा झाल्यानंतर कंबर दुखतेय , हात दुखतोय अशी तक्रारहि नाही किंवा त्रास हि नाही . हे सारे माझ्यासाठी एक मोठे आश्चर्यच आहे !!! 
प्रत्येक क्षणी वेगवेगळे लोक भेटत होते, वेगवेगळ्या स्वभावांचे आणि म्हणतात न "व्यक्ती तितक्या प्रकृत्ती "
पण प्रत्येकाशी जुळवून घेणे , प्रेमाने वागणे , मिळून मिसळून राहणे हे सारे बदल आपोआपच माझ्यामध्ये झाले . 
भक्तीचे एक वेगळेच रूप मला पहायला मिळाले . 
ज्या बापूंना एकदाही प्रत्यक्ष पहिले नाही त्यावर इतके प्रेम कसे करू शकत कोणी !!!
जो बापू ह्या सगळ्यांसाठी एवढे सगळे करतो त्या बापुसाठी ह्या भक्तांच्या मुखातून येणारे अभंग काळजाचा ठाव घेणारे होते. आपल्या सद्गुरूला प्रेमाने आळवताना 
त्यांचे डोळे पाणावत होते . 
नाही वर्णन करू शकत ह्या भावाचे , प्रेमाचे  !!!

आपण घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो पण ते पण किती असतात ३,४,५ जास्तीत जास्त १० . 
पण २५-२५ जणांचे स्वागत "अतिथी देवो भाव " ह्या वाक्याची शिकवण देऊन गेली , जेव्हा मी गावांमध्ये साहित्य वाटप करायाल गेले होते 
पहिल्या दिवशी तेव्हा . त्यांनी दिलेल्या लिंबू सरबताची गोडी इथे मिळणाऱ्या कोणत्याही five star हॉटेलमध्यल्या सर्वात महागड्या पदार्थापेक्षाही कितीतरी पटीने अधिक होती . तुलनाच नाही त्याला .

असे हे कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य सेवा शिबीर मला खूप काही शिकवून गेले . 
बापू मी ऋणी आहे तुझी कि मला तू हि संधी दिलीस . 
माझ्याकडून सेवा करवून घेतलीस. जे काही केलेस ते फक्त तूच आणि जे काही घडले ते फक्त तुझ्याच कृपेने . 

अशी हि कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य सेवा शिबीराची लेखनमाला इथेच थांबवते . 
आणि ह्या कॅम्पसाठी मला येणाऱ्या प्रत्येक वर्षी जायला आवडेल आणि तुम्हालाही  संधी मिळावी हीच इच्छा .
आशा आहे तुम्हाला माझे हे प्रयास आवडले असतील ,
काही राहिले असल्यास , चुकले असल्यास क्षमस्व !!!

तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतेय !!!

सुप्रिया नार्वेकर 

http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/

0 comments: