Matching Center - शुभ विवाह




Matching Center

"आमच्या येथे perfect matching वधू - वर मिळतील ."
लग्न आहे कि matching center चे दुकान !!!
गम्मतच वाटते मला हे सगळे पहिले कि.
खरोखरच arrange marriage म्हणजे एखाद्या कटपीस सेन्टरमध्ये जाऊन
साडीला matching blouse piece घेण्यासारखे वाटते .
ते घेताना  कसे तंतोतंत match होत आहे का ते पाहतो,
कुठेही compromise नाही अगदी तसेच !!!
रंग , उंची , चष्मा ,  केस , जाडी , घर , पगार , नोकरी , क्षिक्षण , गाडी
बापरे किती ती मोज मापे !!!
मोज मापांची शेपटी हि हनुमानाच्या शेपटीसारखी  वाढतच जाते .
आणि खासकरून मुला-मुलींच्या अपेक्षा बाजूला इथे तर
त्यांच्या पालकांच्या अपेक्षाच भन्नाट असतात ….
"आमच्या मुलाला ना M. B.A च मुलगी हवी आहे , पगार लाखभर असला  तरी चालेल,
आमच्या मुलीला ना वेगळे राहणारा मुलगा हवा आहे , आणि त्याची गाडी पण हवी हा !!!
हे आणि असे बरेच काही ."
मुला मुलींच्या  नावावर हे  सारे सारे खपवले जाते.
एकदा का मुलांनी पंचविशी ओलांडली म्हणजे संपले सगळे …
मग काय सगळ्या कौटुंबिक समारंभांना विवाह मंडळाचे किंवा सामुहिक वधू वर मेळाव्याचे स्वरूप येते .
आपल्या मुलांबद्दल सांगताना जराही थकत नाहीत हे सर्व ….
कदाचित  आपल्यातले हे hidden गुण त्या बिचाऱ्या मुला मुलींनाहि माहित नसतील. 

बिचारे शांतपणे हे सगळे ऐकत असतात.
आणि मग सगळी मोज मापे पडताळून विवाह नामक एक फार मोठे ध्येय गाठले जाते…
गमतीचा भाग सोडला तर ह्या सगळ्यामध्ये एका खूप मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केला जातो .
आणि ती म्हणजे "एकमेकांचे स्वभाव ".
स्वभाव मनमिळाऊ पाहिजे हे फक्त  लिहिण्यापुरतीच कागदावर राहते .
दिसणे , नोकरी , शिक्षण ,रंग इ. हे तुमचे समाजातील पत वाढवू शकतात परंतु
स्वभाव तुमची एकमेकांच्या नजरेतील पत वाढवू शकतात.
जर दिसणे , नोकरी , शिक्षण ,रंग इ. अगदी तंतोतंत जुळले पण पुढे जाऊन स्वभावच जुळले नाही तर
काय फायदा !!!
ह्यातून होणारे पर्याय म्हणजे
एक तर मनाविरुद्ध आयुष्यभर संसार करायचा नाहीतर सध्या fashion आहेच घटस्फोट !!!
दोन्ही कुटुंबाला मानिसक त्रास !!!
मग हे सगळे करण्यापेक्षा
दिसणे,नोकरी,शिक्षण,रंग ह्याचबरोबर स्वभाव बघा.
तो पडताळून पहा. अगदी १०० वेळा पडताळून पहा .
तो जर एकदा जुळला,
perfect match झाला तर मग बघा तुमची संसारुपी साडी  किती खुलून दिसते ते !!!
आजूबाजूचे सर्व कसे वळून वळून पाहतील तुमच्याकडे !!!
आणि मग ह्याच समाजात तुम्ही अभिमानाने चालू शकाल …
हे पुरेसे नाही का मग खोट्या मान मरातब पेक्षा !!! 

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !!!

  

- सुप्रिया नार्वेकर

8 comments: