Road Safety

article


Road Safety

३१ जानेवारीची रविवारची सकाळ हि मुंबईसाठी वेगळीच होती .
पहाटे ६ वाजल्यापासून western express highway वर  bikes ची धाव दिसत होती . 
निमित्त होते.
आपल्या RTO तर्फे  "ROAD SAFETY RALLY 2016 "चे आयोजनचे.
लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ला सुद्धा ह्याची नोंद घ्यावी लागली इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या प्रयासांना यश मिळाले.
मीसुद्धा ह्या  "Rally" चा एक भाग होते.
खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी .
ह्या rally चा  मुख्य उद्देश होता सुरक्षा !!!
कोणाची ???
तुमची ,आमची,आपल्या कुटुंबाची,आपल्या मित्र परिवाराची ,
म्हणजेच आपल्या समाजाची .
आजच्या काळामध्ये प्रवास हा महाग झाला आहे .
पैशाने पण खऱ्या अर्थाने म्हणायला गेलो तर आपल्या जीवाच्या किमतीने .
रोज आपण वर्तमानपत्र , दूरदर्शन ह्यामध्ये बातम्या वाचतो . निदान एकतरी बातमी हिअपघाताची असते .
परंतु आपल्या बाबतीत घडले नाही ना मग परमेश्वराचे आभार मानून नजरेआड करून आपण विसरतो .
पण ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे त्याच्याशी खेळण्याचा आपल्याला काय अधिकार ?
किंबहुना आपल्या चुकीमुळे दुसऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा आपल्याला काय अधिकार ?
RTO आयोजित केलेल्या ह्या Rally मध्ये काही गोष्टी ह्या सतत सांगितल्या जात होत्या .
हेल्मेट घाला ,
ते पूर्णपणे बंद असू द्या ,
पायामध्ये शूज असले पाहिजे ,
गाडीचे आरसे हे असलेच पाहिजेत आणि तेसुद्धा व्यवस्थितच पाहिजेत.
गाडी चालवताना सीट बेल्ट हे प्रत्येकासाठी आवश्यकच आहे .
गाडीचे license मिळवताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात पण त्या किती प्रमाणात कटाक्षाने पाळल्या जातात हे माहित नाही .
दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे कमी न होता वाढतच जात आहे .
ह्यामागचे गांभीर्य आपण सहज नजरेआड करतो .
वाहतुकीचे नियम हे फक्त कागदोपत्री न राहता ते अमलात पण आणले गेले पाहिजे.
रस्त्याने जाताना आपण ठिकठिकाणी वाहतूक सुरक्षा चे फलक पाहतो .
RTO कडून नेहमी सेमिनार आयोजित केले जतात .
दूरदर्शन वर जाहिराती प्रसारित केल्या जातात .
पण आपल्या सुरक्षेसाठी कोणी काही सांगावे किंवा करावे ह्याची वाट का बघा.
सुरुवातीला दुचाकी चा विचार करूया .
काही गोष्टी ह्या आपण वारंवार ऐकतो पण त्यामागचा हेतू काय असतो ते आपण बघूया .
पहिले म्हणजे सगळ्यांनाच परिचयाचे असलेले हेल्मेट.
ते फक्त दुचाकी चालवण्यासाठी नाही तर मागे बसणाऱ्यासाठी सुद्धा तितकेच बंधनकारक आहे .
आणि तेसुद्धा पूर्णपणे बंद .
खूप वेळा दुचाकी वर मागे बसलेली व्यक्ती हि हेल्मेट घालत नाही.
पण अपघातांचे प्रमाण पाहता चालवणाऱ्यापेक्षा मागे बसलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे .
त्यामुळे प्रत्येक वाहकाने हि स्वताची जबाबदारी समजून आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी. 
जर आपल्याला अपघात झाला तर जास्त प्रमाण हे डोक्यावर आघात
होण्याचे असते आणि जर हेल्मेट नसेल तर मृत्यूची शक्यता जास्त असते .
त्याचप्रमाणे ते बंद असण्याचे कारण असे कि चालवताना धूळ डोळ्यात जाऊन आपल्याला दिसू नये अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि अपघात होऊ शकतो .अजून एक महात्त्त्वाची गोष्ट म्हणजे बंद हेल्मेट आपली मानेची शीर सुरक्षित ठेवते .
त्यामुळे जर अपघात झाला तर आपला जीव वाचू शकतो .
दुसरी गोष्ट जी अगदी सहजपणे दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे
शूज .
खूप वेळा आपण चप्पल , मुली उंच खोटांचे बूट घालून दुचाकी चालवताना पाहतो .
पण खरे पाहता बाईकच्या लीवरची रचना हि बुटांच्या आकारानेच केलेलि असते .
आणि चालवताना खडे लागून आपल्याला ईजा होऊ नये हाही एक त्यामागचा उद्देश.
म्हणून दुचाकी चालवताना शक्यतो शूजच वापरावे .
हेल्मेट आणि शूज हेसुद्धा जर उत्तम दर्जाचे असतील तर चांगले .
तिसरी गोष्ट सिग्नल .
सिग्नल तोडणे हे म्हणजे अगदी रोजचेच झाले आहे .
पण ते तोडून आपण आपलाच आणि आपल्याबरोबर इतरांचा जीव सुद्धा धोक्यात घालतो .
चौथी गोष्ट वेग .
घाई हि प्रत्येकालाच असते .
पण आपल्या जिवापेक्षा नक्कीच जास्त नाही ना ???
अजून काही गोष्टी आहेत त्या म्हणजे जर दुचाकी चालवताना आपण jacket आणि gloves घातले तर ते केव्हाही चांगले असते .
jacket जेव्हा आपण चालवत असतो तेव्हा वाऱ्याचा आपल्या शरीरावर होणारा थेट प्रभाव हा रोकण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्याला थकवा येत नाहीआणि gloves हे आपल्या हातांचा धुळीपासून सांभाळ करतात, त्याचप्रमाणे चालवताना जर आपल्याला घाम आला तर आपली बाईक वरची पकड सैल होऊ शकते. म्हणून शक्यतो ह्या गोष्टी असणे चांगले. helmet, jacket आणि gloves हे सोडले तर हे सारे नियम  चार चाकी गाडीसाठी सुद्धा तितकेच बंधनकारक आहेत.
गाडीमध्ये seat belt हे प्रत्येकासाठी असतात फक्त लावले किती जातात हे प्रत्येकाला माहित .
ह्या सर्व गोष्टींबरोबर काही गोष्टी ह्या महात्तावाच्या आहेत ते म्हणजे
कोणतेही वाहन चालवत असताना mobile वर न बोलणे ,
कानात headphone लावून गाडी न ऐकणे आणि आपल्याबरोबर driving license आणि गाडीची सर्व कागदपत्रे नेहमी असणे .
जेणेकरून आपण अपघातांना आळा घालू शकतो आणि जर अपघात झालाच तर असलेल्या कागदपत्रांमुळे आपली ओळख पटणे आणि आपल्या कुटुंबाला आपली माहिती कळवणे सोयीचे होते .
हे सर्व जर प्रत्येक वाहकाने काटेकोर पणे पाळले तर पुढे येणाऱ्या वर्षात अपघातांची संख्या आपण नक्कीच कमी करू शकतो.
कारण अपघाताने आपण स्वतःचे , आपल्या कुटुंबाचे नुकसान करतोच पण आपल्या आणि सरकारच्या property चे पण नुकसान करतो .
आपल्यापैकी कित्येक  जणांच्या फोन ला पासवर्ड असतो .
पण सहसा तो नसावा कारण आपल्या फोनमधून आपल्या निकटवर्तीयांना फोन करणे सोयीचे होते .
अजून एक खूप महत्तवाची सुविधा आपल्या सरकारकडून सुरु करण्यात आली आहे .
ती म्हणजे एका sms द्वारा तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती मिळू शकते.
त्यासाठी  
७७३८२९९८९९ ह्या नंबर वर
VAHAN space vehicle number हे type करून पाठवायचे आहे .
त्यावरून तुम्हाला तुमच्या गाडीची माहिती मिळते तुमच्या नावासकट .
आणि हे सर्वांनी लक्षात ठेवावे कारण जर तुमची गाडी नसले परंतु रस्त्याने जाताना तुम्हाला
अपघात झालेला दिसला तर आणि मालकाबद्दल काही माहिती मिळत नसेल तर ह्या सेवेद्वारे तुम्ही
ती माहिती मिळवू शकता .
आपण आपल्या समाजाचे देणे लागतो आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने सतर्क असणे आणि सगळे नियम काटेकोरपणे पाळणे हे अत्यावश्यक असते .
शेवटी आपला जीव हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा आहे .

सर्व जण पाळूया वाहतुकीचे नियम 
कशाला जवळ येईल मग तुमच्या यम

                                                                              -सुप्रिया नार्वेकर

6 comments:

  1. Road Safety - very nicely and briefly explained. Focus on the Importance of all the related accessories is really telling the need of wearing them while traveling.

    Thank you Supriya.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Rasika Sant.
      we easily ignore so many things, so i tried to show it.
      Traveling accessories plays important role while driving.

      Delete
  2. खुप छान माहिती

    ReplyDelete
  3. सुप्रिया आपण रस्त्यावरील सुरक्षा हा दिवसागणिक अनन्यसाधारण महत्त्व मिळवित चाललेल्या विषयाचा अतिशय चांगल्या रीतीने आढावा घेतला आहेत. परमेश्वराने दिलेल्या अमूल्य अशा मानवी देहाची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे ह्याची प्रत्येकाला जाणीव असणे हे जितके गरजेचे आहे तेवढेच त्या करिता सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही सुध्दा अत्यंत निकडीची बाब आहे.
    हेल्मेट हे फक्त दुचाकी चालवणार्‍या वाहकासाठीच (ड्रायव्हरसाठीच) नव्हे तर मागे बसणाऱ्यासाठी सुद्धा तितकेच बंधनकारक आहे ह्या अत्यंत महत्वाच्या सूचनेकडे आपण लक्ष वेधले ही कौतुकास्पद बाब आहे.
    सरकारने सुरु केलेल्या नवीन योजनेची माहिती आणि फोन पासवर्डने लॉक न करण्याबाबतची सूचना ह्या खूपच उपयोगी आहेत. धन्यवाद !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुनीता कारंडे .
      खरच आपण खुपदा काही गोष्टी नजरेआड करतो.
      प्रवास हा प्रत्येक जण करतो,पण त्यामध्ये घ्यावी लागणारी दक्षता हि सहज
      दुर्लक्षित केली जाते .
      म्हणून हा लेख लिहिण्यचे प्रयोजन.
      प्रत्येकाचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा ह्यासाठी एक छोटासा प्रयास .
      तुमच्या अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद !!!

      Delete