कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ५ कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस पहिला


  
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग -
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस पहिला

१ फेब्रुवारी २०१५, रविवारचा दिवस.
पण हा हा रविवार सुट्टीचा दिवस  म्हणून घरी लोळत पडण्यासाठी  नव्हता.
तर हा रविवार होता काहीतरी वेगळे करण्याचा.
आपण  ज्या समाजात राहतो , त्या समाजाचे सुद्धा आपण काही देणे लागतो .
पण सध्या आपण फक्त आपलाच विचार करतो, फक्त आपल्याच सुखासाठी
प्रयत्न करतो , चुकीचे नाही आहे हे , पण त्याचबरोबर जर आपण ह्या समाजासाठी
काही केले , गरजू  आहेत त्यांच्यासाठी काही केले तर मिळणारे समाधान , आनंद ह्याची
किंमत अमुल्य असते , आणि ह्याचा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा मी
"कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराच्या पहिल्या दिवशी घेतला .
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराने माझ्या विचारसरणीत झालेला बदल
शब्दांत मांडणे कठीण …

असा हा कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबिराचा पहिला दिवस उजाडला .
दिवस नेहमीसारखाच पण  वातावरणात  चैतन्य वेगळेच होते .
सकाळी ५ ला उठले , माझ्या रूम माझ्या अजून २ मैत्रिणी  होत्या. आम्ही तिघी किंबहुना सगळेच कॅम्पवर
लवकरात लवकर पोहचायचे म्हणून पटापट आवरले आणि खाली आलो .
तरीही काही प्रमुख कार्यकर्ते आमच्याआधीच उठून तयार होऊन आम्हां सर्वाना उठवण्यासाठी आले होते ,
management level किती सुंदर आहे ती बघा .

धर्मशाळेच्या खाली आमच्या सर्वांची चहाची सोय  केली होती . आणि पुन्हा एकदा
Bisleri Bottle देण्यात आली. कॅम्प site हि  कोल्हापूर शहरापासून थोडी लांब असल्या कारणाने
आम्हाला आपापल्या बस मध्ये जाऊन बसण्यास सांगितले .
आमच्या आधीच बसेस ready होत्या .
आम्ही सर्व आपापल्या बस मध्ये जाऊन बसलो .
साईट च्या दिशेने सर्व बसेस निघाल्या .
मुंबईत  बघायला न मिळणारी चूल , गाय ,बैल ह्यांना घेऊन निघालेले  गावकरी , डोक्यावर हंडा घेऊन नदीवर निघालेल्या मुली,
वाऱ्यावर झुलणारी पिके , अहाहा काय मन प्रसन्न करणारे दृश्य होते सारे !!!
सगळीकडे प्रसन्नता होती, हे सारे न्ह्याहाळत असताना कॅम्प साईट केव्हा आली कळलंच नाही.

कॅम्प साईट वर गेल्यावर आमच्या सकाळच्या न्याहरीची सोय केली होती …
कोल्हापूर स्पेशल मिसळ-पाव …
कसली भारी होती…
हे सगळे झाल्यावर आम्हाला मैदानात उभे राहायला सांगितले .
कोणत्याही चांगल्या गोष्टींची  सुरुवात हि भगवंताच्या नामस्मरणानेच होते ,तसे आम्ही परेमेश्वरचे नाव घेतले.
जसे तीसऱ्या भागात आपण पहिले कि "वाटप केल्या जाणाऱ्या साहित्याचे अचूक आणि पद्धतशीर
विभाजन केले होते.प्रत्येक गावाप्रमाणे वेगवेगळे भाग होते आणि तिथे banner वर त्या गावाचे नाव होते आणि त्या गावात जाणाऱ्या
group चे . गावाप्रमाणे सर्व गाठोडी व्यवस्थित रचून ठेवली होती.बघण्यासारखे होते ते सगळे "

 


त्याचप्रमाणे group coordinator हातामध्ये placards घेऊन होते जेणेकरून गोंधळ होऊ नये .
इतके पद्धतशीर होते सगळे.
मग group no . प्रमाणे tempo येत होते.
माझा group no. २३ होता . एकूण २६ group होते.
अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते कि आपला no. येईपर्यंत असंच बसून न राहता आम्हाला तिथे पूर्ण माहिती सांगितली जात होती,कसे वाटप होणार , काय काय आहे त्यात इ , camp साईट वर फिरण्याची मुभा होती .
माझ्यासाठी तर पर्वणीच होती ती ,सगळ्या गोष्टी बारकाईने पहिल्या आणि म्हणूनच कदाचित हे लिहू शकते .
असो
तर पूर्ण साईट वर पाणी वाटप सेवेचे कार्यकर्ते पाणी देत होते…
सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते .
मग आमच्या group चा no. आला , आम्हाला पाटपन्हाळे आणि बांद्रे वाडी अशी दोन गावे होती.
खूप excite होते ,
सुरुवातच सही होती ती म्हणजे
आपल्याला असलेल्या group चे tempo मध्ये material loading चे काम आपणच करायचे .
खाली दिलेल्या video च्या link वरून तुम्हाला समजू शकेल .
https://www.youtube.com/watch?v=Ow3cua7nJg0
खूप धमाल आली हे करताना .
मग आम्ही टेम्पो मध्ये बसलो गावांमध्ये जाण्यासाठी .
टेम्पोत बसण्याची तर मज्जाच न्यारी होती .
दोन्ही गावांमध्ये वाटप करताना आलेले अनुभव
अंगावर शहारे आणणारे होते.
लहान लहान मुले , त्यांचे आई बाबा , आजीबाई , आजोबा , सगळे आधीच
ठरलेल्या ठिकाणी जमले होते .
चेहऱ्यावर त्यांच्या एक वेगळाच आनंद होता.
आणि त्याही पलीकडचे म्हणजे समाधान होते .
जे आपल्याकडे आहे त्यात ते खुश होते .
कुठेही कसलीही हव नव्हती .

आम्हा सर्वांसाठी लिंबू सरबत,चहा ,पाणी हे सारे त्यांनी ठेवले होते.
केवढे प्रेम त्यांचे !!!
हे सारे काही आपल्या परमेश्वरामुळे होते आहे हा त्यांचा त्यांचा विश्वास  मनात एक वेगळेच घर करून गेला .
सुरुवातीला त्यांनी आपल्या परमेश्वराचे नाव घेतले.
त्यांच्या अभंगांमध्ये जी आर्तता होती , जो भाव होता ,त्याने डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्या.
त्यांची ती साधी भोळी भाषा इतकी गोड होती कि काय वर्णन करू त्याचे …

मग यादीप्रमाणे एकेका कुटुंबाचे नाव घेतले जात होते ,
आम्हा कार्यकर्त्यांची एक team उभी राहिली.
१-१ करून वस्तूंचे वाटप होते.
कपड्यांनी भरलेले गाठोडे ,गोधडी, मग साबण (प्रत्येक कुटुंबाला २) , कपडे धुण्याची powder (२ किलो ) , दात  घासण्याची powder (प्रत्येक कुटुंबाला २), जल शुद्धीकरण द्रव्य (१०० मिली ची १ बाटली ) ,खरुज वरील औषध (gamma benzyl ) (१०० मिली ची १ बाटली) , कंगवे , टिकल्या ,
बांगड्या ह्या साऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले . ह्यापैकी साबण , कपडे धुण्याची powder, दात  घासण्याची powder , जल शुद्धीकरण द्रव्य बाटली  ,खरुज वरील औषध  हे साहित्य तेथील स्थानिक स्वयंसेवकांकडून वर्षातून ३ वेळा दिले जाते . 

 

       



हे सारे चालू असताना बाजूला गावकऱ्यांचे अभंग चालूच होते , त्यांच्या गावरान भाषेतील परमेश्वराला आळवणे हे अतिशय गोड होते ,त्यांचे ते साधेभोळे शब्द  हृदयाचा ठाव घेत होते .

https://www.youtube.com/watch?v=eNoCiso3Olg
 लहान मुलांबरोबर , गावकऱ्यानबरोबर मी खूप गप्प मारल्या .
तेव्हा हे समजले कि आता आत आरोग्यविषयक ज्या गोष्टी दिल्या जातात त्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती आहे .
एक अनुभव सांगते  तुम्हाला
"एका आजीला मी कुतूहलाने जल शुद्धीकरण द्रव्याच्या बाटलीकडे बोट दाखवून म्हणाले कि ,
आजी , हे कसे वापरायचे ग ? त्यावर त्या आजीने दिलेले उत्तर इतके गोड होते कि काय सांगू तुम्हाला
"अग बाय , सोप्प आहे कि ……....

आम्हासनी सगलं माहित हाय,दरवर्षी तर येत्यात हे सगले ,सगलं शिकवलंय आम्हासनी"
आणि मग त्या आजीने मला संपूर्ण procedure सांगितली . "
इतका तो साधा गोड भाव …
तिथला प्रत्येक क्षण डोळ्यात पाणी आणणारा होता .
प्रत्येक क्षण मनात कोरला जात होता .

ह्या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही सर्व पुन्हा टेम्पो मध्ये बसलो .
गाव नजरेपासून दूर जात होते पण माझी नजर आणि मी अजूनही मागेच होती .
मग रात्री आम्ही पुन्हा कॅम्प site वर पोहचलो .
तिथे गावकऱ्यानी एक सुंदर सत्संग आयोजित केला होता .

 

आपल्या लाडक्या परमेश्वराला ते आपल्या अभंगातून आळवत होते ,
बेभान होऊन आपल्या लाडक्या  परमेश्वराच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचत होते ,
वातावरणात एक वेगळाच जल्लोष होता. मग आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर दंग झालो .
दिवसभराचा सारा क्षिण १ क्षणात निघून गेला .
हे सगळे बघून परमेश्वराला म्हटले " देवां काय काय साठवू रे डोळ्यांमध्ये !!!"  कधीही न पाहिलेले आणि अनुभवलेले हे सारे क्षण माझ्यासाठी
आयुष्यभराची सोबत होऊन गेले .
इतके अपार प्रेम , इतकी अपार भक्ती , इतकी अपार श्रद्धा ह्या आधी कधीच अनुभवली नाही .
खरच इतके प्रेम कोणी कसे करू शकते ?

सत्संगानंतर आमची रात्रीच्या जेवणाची वेळ झाली .
अप्रतिम असे गावचे चुलीवारचे जेवण !!!
काय चव वर्णू त्याची !!!
जेवण झाल्यावर आपले ताट ,वाटी आपणच घासून ठेवायची , इथे शिस्त अनुभवायला मिळाली .
खूप लहान लहान गोष्टींमधून खूप काही शिकायला मिळाले .

ह्या सगळ्या सुंदर आणि गोड आठवणी घेऊन आम्ही सर्व पुन्हा एकदा आपापल्या बस मध्ये जाऊन बसलो
रहाण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी …
आम्ही रूम वर पोहचलो पुन्हा आम्हाला bisleri bottle देण्यात आली , उद्याच्या reporting time सांगण्यात आले .
पण मी अजूनही त्याच आठवणीत होती …
काय झोप लागणार होती मला ???
आजच्या दिवसाच्या आठवणी आणि उद्याच्या दिवसाची उत्सुकता ह्यात रात्र कशी सरली कळलच नाही …
चला मग आता उद्याच्या दिवसाची  करूया !!!
मुले आणि  गावकरी येणार आहेत ना medical check up करायला !!!

क्रमश :

सुप्रिया नार्वेकर 

Find More Photos and Videos on 
http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/


 

0 comments: