नात बाप-लेकीचं

" नात बाप-लेकीचं "


काल रात्री सहज T .V  पाहत बसले होते channels change करताना एका serial चे title song बघून तिथेच थांबले, 

Zee मराठी वर "असे हे कन्यादान" ह्या नव्या मालिकेचे title song चालू होते.  आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे. पण त्यात नवीन नाही तर खास आहे ते म्हणजे त्याची सुरुवात ती म्हणजे...

"नात बाप-लेकीचं " आणि संपूर्ण शिर्षक गीतामध्ये लक्षणीय गोष्ट आढळली ती म्हणजे कुठेही नायक किंवा नायिका नसून त्यात आहेत बाप आणि लेकींचे photographs !!! अतिशय सुंदर शब्द आणि मांडणी …

ऐकून नाही थांबवू शकले स्वतःला आणि लगेचच माझ्या बाबांना जाऊन मिठी मारली मी आणि म्हणाले " मी नाही जाणार तुम्हाला सोडून कुठे" न मग त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. 

त्या शिर्षक गीतामधल्या शेवटच्या ओळी मनाला स्पर्श करून गेल्या…  
"लेक परक्याचे धन 

बाबा तुटतो आतून 

आला गोठलेला क्षण 
शुभमंगल कन्यादान "

खरंच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना ????
किती आर्त वेदना होत असतील त्याला !!!
बाप  आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण. 
आणि ह्याचा अनुभव मी प्रत्येक क्षणी घेते. 
बाबा हा शहाळ्यासारखा असतो , बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. 
कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर … 
लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. 
संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. 
संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो.
बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो , लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही  बाबा असतो. 
कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही  बाबाच असतो. 
पिकनिकसाठी पण पैसे बाबच देतो. 
shopping करताना आईने कमी  किमतीचा dress काढला तर हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. 
आईने काही काम सांगितले तर तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो. 
लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,  तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि 
लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो.
पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते. 
लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!
आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही.  आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार. 
आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो. 
आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा बाबाच असतो. 
"दिल्या घरी सुखी रहा  म्हणताना " मनातून खचलेलाही बाबाच असतो. 
असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो. 
आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. 
लेकीचा स्वतःपेक्षा  जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो. 
लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही . 
ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते. 
एक गोंडस परी … 
बाबा I Love You So Much....

- सुप्रियावीरा नार्वेकर

10 comments:

  1. Amazing article....I remembered my sister's marriage ceremony when my she was hugging my dad with tears in her eyes.
    Thank you Supriya for this fantastic article. I am sending this to my sister. Thanks again. I am gonna read all your article now.
    TC

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Avdhut.
      n its rite, relation between father & daughter its really amazing.
      1ce u send it to your sister na, tel me her reactions as well.
      Thanks a lot.
      TC

      Delete
  2. Supriya you have really managed to beautifully describe the Father-Daughter bond...could actually feel the warmth of the relation while reading your post.....Great going !!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Harsh...
      The bonding between father and daughter is god gifted, n only those can feel the warmness between these.
      Thanks a lot...

      Delete
  3. सुप्रिया , बाप-लेकीचे नातं - खूपच हृदयस्पर्शी लेख , वाचून डोळे पाणावले आणि मन अधिकच व्याकूळ झाले वडिलांच्या आठवणीने..
    अनोखे रेशमी बंध खूप सुंदर रीत्या हळूवारपणे उलगडून दाविले आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार …
      प्रत्येक मुलीच्या आपल्या बाबांसाठी ह्याच भावना असतील …

      Delete
  4. Very nice article Supriya.
    Really this relation is very different than any other.
    For every father its difficult moment when his daughter marries & goes to other persons home.
    Our beloved Dad too cried during Shakabariveera's wedding.

    ReplyDelete