My Mentor


हरि ॐ
Dr. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच अनिरुद्ध बापू !!!
बापू माझा dad आहे, माझा मित्र आहे , माझी आई आहे, माझा सदगुरु आहे, माझा शिक्षक आहे , माझा मार्गदर्शक आहे थोडक्यात माझे सर्वस्व आहे.
बापू स्वतः एक निष्णात M. D आहेत . सगळ्या कलांमध्ये ते पारंगत आहेत.
कुठलीही गोष्ट वरवर न बघता सखोल ज्ञान घेणे म्हणजे काय हे बापूकडे पहिले कि कळते .

भक्तीच्या मार्गाने विद्यानाचा हात धरायला बापू शिकवतो . आम्हाला आवडणारी कला जोपासायला बापू शिकवतो.
बापूने ज्यांना जी कला येते त्या कलेत पुढे  जाण्यासाठी सगळे दरवाजे  उघडले आहेत.
बापू एक सखा आहे जो जीवनाच्या प्रत्येक क्षणात आमच्या बरोबर असतो.  "मी तुला कधीच टाकणार नाही " आणि " एक विश्वास असावा पुरता करता हरता सदगुरु ऐसा ."  हि आमच्या बापुची ब्रीदवाक्ये प्रत्येक श्रद्धावानाने आपल्या मनात कोरली आहेत .  असा हा भक्तसखा माझा बापू माझा dad आहे.
मी अम्बज्ञ आहे.

ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अम्बज्ञ ll


- सुप्रियावीरा नार्वेकर

0 comments:

मैत्री


मैत्री म्हणजे ,
आयुष्यभराची साथ 
धडपडताना  सावरणारा हात 

मैत्री म्हणजे ,
रणरणत्या उन्हातला गारवा 
सुख दुःखातला प्रेमळ गोडवा 

मैत्री म्हणजे ,
निरपेक्ष निखळ नात 
निर्मळपणे दोन जीवांना जोडत 

मैत्री म्हणजे ,
प्रेमाचा किरण 
अमुल्य असे क्षण 

मैत्री म्हणजे ,
जन्मोजन्मीचे बंध 
सुंदर असे ऋणानुबंध 


- सुप्रिया नार्वेकर

0 comments:

बापू तुझ्या सेवेत





8 comments:

नाही कसे कळले, सूर कधी जुळले

 
नाही कसे कळले
सूर कधी जुळले 
प्रेमाच्या आपल्या 
गीत कसे बहरले 

प्रेमाच्या छेडील्या तारा 
गुंजतो बेधुंद वारा 
 आयुष्यभरासाठी आता 
तुझाच निवारा 

हरवले तुझ्या नजरेत 
फुलले तुझ्यासमवेत 
विसावले कायमची 
तुझ्याच कवेत 

प्रेमाचे आपल्या क्षण 
साऱ्या जीवनाची साठवाण 
जपली मनाच्या कोपऱ्यात 
तुझी माझी आठवण 

तुझ्या प्रेमसागराचा मी काठ 
नको सोडू कधी हात
मिटले जरी डोळे मी 
तरी देईन तुलाच साथ 

- सुप्रिया नार्वेकर

0 comments:

आता फक्त "बापू


माझा शब्द "बापू" , माझे मन "बापू"
माझी तहान "बापू" , माझी भूक "बापू"
माझी श्रद्धा "बापू" , माझी भक्ती "बापू"
माझी हिम्मत बापू , माझा आधार बापू
माझी आई "बापू" , माझा बाप "बापू"
माझे कर्म "बापू" , माझा धर्म "बापू"
माझी वाट "बापू" , माझे ध्येय "बापू "
माझे जीवन "बापू" , माझे सर्वस्व "बापू"
माझे देह "बापू", माझा आत्मा "बापू "

आता फक्त "बापू" आणि फक्त "बापूच"
- सुप्रियाविरा नार्वेकर

1 comments:

About Me

हरी ॐ
मी पूर्वाश्रमीची सुप्रिया विजय नार्वेकर आणि आता सुप्रिया अजिंक्य रुमडे.

एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आले. इतरांसारखेच सुंदर , अवखळ असे बालपण गेले.१०वी  पर्यंतचे शिक्षण बोरिवलीच्या चोगले हायस्कूल मधून आणि १२ वी पर्यंतचे शिक्षण दादरच्या कीर्ती college मधून पूर्ण केले. लहानपणापासूनच कलेची आवड होतीच मग MAAC मधून चा ३D Animation आणि Graphic Designing चा ३ वर्षांचा diploma पूर्ण केला.आता Mitashi Edutainment Pvt Ltd  मध्ये Sr.Visualizer  म्हणून कार्यरत आहे.

योगा , gymnastics, कबड्डी , volley-ball ह्यांनी शाळेची वर्ष जबरदस्त गेली. ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप काही शिकले पण खऱ्या अर्थाने फुलले, बहरले ते २००० पासून.  कारण Dr. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच माझा बापू , माझा dad मला भेटला आणि माझ्या आयुष्याला एक नवीन आणि उत्तम दिशा मिळाली.
जगायाचे कसे आणि जगवायचे कसे हे माझ्या बापूने मला शिकवले आणि आजही शिकवतो आहे आणि शिकवत राहणार .
माझ्या बापूच्या सहवासात माझ्या आयुष्याचे सोने झाले .

माझ्या blog चे नाव "मी माझ्यातली " ह्याचे कारण
मी एक सामान्य आयुष्य जगत होते, लिहिण्याची , Designing ची कला होतिच. पण ती कला खऱ्या अर्थाने बहरली ती माझ्या बापूमूळे.
माझ्यातली मी मला माझ्या बापूने दाखवून दिली. माझा बापू माझा सर्वस्व आहे.  माझा Dad आहे . बापू तू मला दिलेली कला तुझ्या चरणी  अर्पण .
अनिरुद्धार्पणमस्तू .
मी अम्बज्ञ आहे .

चला तर मग भेटूया माझ्या  "मी माझ्यातली " blog मध्ये !!!

4 comments: