नवीन वर्ष आणि संकल्प


                     " नवीन वर्ष आणि संकल्प" 

२०१५ सरले , २०१६ आले …
आजपासून नवीन वर्षाची सुरुवात !!!
खरे पाहता नवीन वर्ष म्हणजे ,
एका नव्या वाटेची सुरुवात ,
एका नव्या चक्राची सुरुवात ,
एका नव्या दिशेची सुरुवात,
एका नव्या ध्येयाची सुरुवात ,
आणि नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे ह्या सगळ्यांचा केंद्रबिंदू !!!
तसे पहायला गेलो तर आधीच्या वर्षाच्या अखेरीस सारेच जण येणाऱ्या नवीन वर्षासाठी संकल्प करतात .
नवीन वर्ष चालू झाले कि कटाक्षाने पाळलेसुद्धा जाते आणि नंतर हळूहळू आज नको , उद्या करू,
उद्या आला कि परवा आणि मग तेरवा अशी गाडी रुळावरून सरकते .
आणि वर्षाच्या अखेरीस केलेल्या संकल्पाचा आलेख उतरत्या क्रमाचा दिसतो .
मग पुन्हा येणाऱ्या वर्षासाठी नवीन संकल्प आणि पुन्हा त्यात खंड हे समीकरणच होऊन बसते .
खरे पाहता संकल्प म्हणजे काय ?
तो का करावा ?
त्याने काय साध्य होते ?
हे समजले तर केलेल्या संकल्पामध्ये कधीच खंड पडणार नाही .
"संकल्प" म्हणजे एक सुंदर असे रोपटे आहे ज्या रोपट्याला नियमितपणे उत्साहाने जिद्दीचे पाणी घातले तर त्या इवलाश्या रोपट्याचा
यशाचा एक मोठा वृक्ष तयार होतो आणि तो समाधानाच्या फांद्यांनी आणि आनंदाच्या फळांनी बहरतो .
कारण जिथे यश आहे तिथे आनंद आणि समाधान आहे .

संकल्प हा मोठा असावा कि लहान  ?
वयोमर्यादा काय ?
असे कोणतेही मोजमाप नाही .
तो कुठल्याही पातळीवर असू शकतो .
वैयक्तिक , सामाजिक , अध्यात्मिक इ .
उदाहरणार्थ स्वतःला चांगल्या सवयी लावणे हा वैयक्तिक पातळीवर ,
समाजकार्य करणे हा सामाजिक पातळीवर तर ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर आयुष्य दिले
त्याचे अधिकाधिक नामस्मरण करणे , उपासना करणे हे अध्यात्मिक पातळीवर .

संकल्पासाठी कोणतेही बंधन नाही ,
आवश्यकता आहे ती म्हणजे फक्त "प्रबळ इच्छाशक्ती "ची !!!
जर मला माझे ध्येय गाठायचे असेल तर माझी इच्छाशक्ती इतकी प्रबळ हवी कि मग त्या संकल्पामध्ये कधीही खंड पडणार नाही .
फक्त एक महत्त्वाचे कि आपल्या संकल्पामुळे इतरांना त्रास होणार नाही हेही तितकेच महत्त्वाचे !!!
संकल्प हा नेहमी "धावण्याच्या शर्यतीसारखा" असावा . जो वेग , जी उर्जा शर्यत सुरु झाल्यावर असते तेवढीच किंबहुना प्रत्येक टप्प्यावर त्यामध्ये
अधिकाधिक वाढ होते ती शर्यत संपेपर्यंत . कारण आपले ध्येय समोर असते.

म्हणून संकल्प करण्याआधी आपले ध्येय निश्चित करणे तितकेच महत्त्वाचे !!!
संकल्पामध्ये खंड न पाडण्यासाठी एक सोपा उपाय आहे .
रोज सकाळी उठल्यावर diary मध्ये संकल्प्य म्हणजेच निश्चित केलेले ध्येय लिहावे आणि रात्री झोपताना
"मी केलेला संकल्प आज नियमितपणे पाळला ." हे लिहावे .
हि गोष्ट तुम्हाला उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला संकल्प पाळण्याची नवीन उमेद देते .

मग करणार न खंड न पाडता संकल्प ???

आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे , अधिकाधिक यशाचे , चांगल्या आरोग्याचे आणि नियमितपणे संकल्प पाळण्याचे जावो …

-सुप्रिया नार्वेकर

2 comments: