नेताजी - हुशार विद्यार्थी



नेताजी - हुशार विद्यार्थी

"प्रत्यक्ष मित्र " मधील "नेताजींच्या लेखमाला"  म्हणजे सुभाषबाबूंचा जीवनपटच आहे ,
हळूहळू नेताजींचा स्वभाव , त्यांचे कार्य आपल्याला अनुभवायला मिळते .
क्रांतीकरिता सोडून शिक्षण आणि व्यावसायिक प्रगती ह्याकडे नेताजींनी लक्ष केंद्रित करावे असे नेताजींच्या वडिलांना म्हणजेच जानकीनाथ ह्यांना वाटत होते आणि त्यासाठी त्यांचे सर्वोत्तपरी प्रयत्न चालू होते. पण नेताजीसुद्धा हार मानण्यातले नव्हते. वडिलांनी सांगितल्यानंतर दिवस रात्र एक करून नेताजींनी मेट्रिकची परीक्षा दिली आणि दुसरा क्रमांक मिळवला .
नेताजींच्या मनातून क्रांतिकारीता जावी म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी  नेताजींचे मोठे बंधू शरद ह्यांच्याकडे कोलकात्याला पाठिविण्याचा
निर्णय घेतला .
 पण सूर्याचे तेज झाकता येत नाही तसेच काहीही  केले तरी नेताजींच्या मनात पेटलेली स्वातंत्र्याची ठिणगी विझणार नव्हती .
कटक मध्ये वडिलांनी दिलेल्या समजुतीमुळे नेताजींनी गुरूचा शोध थांबविला होता परंतु तो त्यांनी पुन्हा जोमाने सुरु केला. त्या काळी आपल्या भारताची परिस्थिती फार हलाखीची होती. खरे तर समाज हा भारताचा महत्त्वाचा हिस्सा आहे आणि तोच जर दुर्लक्षित आणि हलाखीत राहिला तर भारताचे स्वातंत्र्य आणि प्रगती कठीण आहे हे नेताजींना माहित होते . आपल्या मातृभूमीची हि अवस्था पाहून सुभाषबाबू खूप कष्टी होत असत .
अधिक माहितीसाठी वाचा 

- सुप्रिया नार्वेकर
संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र



आता प्रत्यक्ष मित्र एका क्लिकमध्ये
डाउनलोड करा प्रत्यक्ष ऍप 

4 comments:

  1. Supriya,v nicely written. Briefly noted.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much for feedback.
      I ll put efforts to give more information.

      Delete
  2. सुप्रिया आपण दिलेली उपमा नेताजींबद्दलची अत्यंत मनाला भावली . अगदी खरेच आहे नेताजींचे जाज्जवल्य देशप्रेम, त्यांची नि:स्सीम देशभक्ती ह्याला तोडच नाही. सूर्याचे तेज झाकता येत नाही तसेच नेताजींच्या मनात लहानपणीच पेटलेली स्वातंत्र्याची ठिणगी कोणत्याही परिस्थितीला शरण जाऊन विझणार नव्हती हे आपले मत अगदी पटले.

    ReplyDelete
    Replies
    1. नेताजींसारखे व्यक्तिमत्त्व होणे नाही हेच खरे .
      तुम्ही दिलेल्या अभिप्रायासाठी धन्यवाद ...

      Delete