आनंद


वाचण्यात एक सुंदर वाक्य आले 
Money can't buy Happiness !!!

खरच आहे हे !!! 
मी एका अनाथाश्रमासाठी काम करते "वात्सल्य" म्हणून.मागच्याच रविवारी तिथे गेले होते.जुन्या मुलांबरोबरच खूप सारी नवीन मुले होती.गोंडस एकदम !!! पण त्या साऱ्या मुलांमधून एका गोड मुलीकडे लक्ष गेले … शरीराने खूप अशक्त होती. वय १ वर्ष. तिकडच्या मावशींना विचारले की काय झाले आहे हिला ?, एवढी अशक्त का दिसते ?, तेव्हा त्या म्हणाल्या कि तिला heart problem आहे. treatment चालू आहे तिची. ऐकून डोळ्यात चटकन पाणी आले पण त्याचबरोबर तिची जगण्यासाठीची झुंज पाहुन ,तिच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून खूप कौतुक वाटले. आणि मग मनात विचार आला कि जर ती किंवा तिथली इतर मुले आनंदाने जगू शकतात तर मग आपण का नाही ???

आपण सतत ह्या ना कारणाने रडत बसतो, एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली कि आपण जगातले सगळ्यात दु:खी माणूस म्हणून स्वतःवर stamp मारून मोकळे होते. पण जर आपण जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर जगी सर्व सुखी असा कोण आहे तर आपण नक्की स्वतःकडे बोट दाखवू . 

आपला आनंद हा सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतो. आपण आनंदी राहू शकतो कि नाही हे फक्त आपणच  ठरवू शकतो. 

कधी तुम्ही एखादा मस्त गाणी ऐकत ऐटीत रिक्षा चालवणारा रिक्षेवाला पहिला आहे ? त्याची style च भारी असते. भले ती रिक्षा त्याची असो वा नसो पण तो अशा आवेशात चालवत असतो कि जणू काही एखादी BMW किंवा MERCEDES चालवतो आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच  भन्नाट असतो. रस्त्याने चालताना एखाद्या झोपडीत बघा त्यात राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर महालात राहण्याचा आनंद असतो. चापून चोपून केस बांधून, रंगीबेरंगी रिबिनी लावून गजरे माळलेल्या मुली जेव्हा  "ताई गजरा घ्या ना बोलतात आणि आपण तो घेतल्यावर  त्यांच्या  चेहऱ्यावर दिसणारा आनंद अनुभवा. रस्त्यावर असलेल्या फेरीवाल्यांचा तोरा असा असतो कि जणू काही एखाद्या mall मध्ये showroom आहे त्यांचे. एखादा वाढदिवस अनाथाश्रमातल्या मुलांबरोबर साजरा करून बघा, आपल्या  वाढदिवासात पण, ते किती खुश असतात ते अनुभवून बघा. जर हे सगळे अशा बिकट परीस्थित पण आनंदी राहू शकतात तर मग आपण का नाही ?

काल घडून गेलेल्या गोष्टींवर रडत बसून आपण आपला आज आणि उद्या दोन्ही वाया घलवतो. 
आनंदाने जगा आणि आनंदाने जगवा.  दुसऱ्याला आनंद देण्यात एक वेगळीच नशा आहे.  कुठेतरी वाचले होते कि "आनंद हा चंदनासारखा असतो , समोरच्याच्या कपाळी लावलात तरी तुमचे हात सुगंधी करतो . "

आणि हाच जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याचा दृष्टीकोन मला दिला तो माझ्या बापूने !!!
भूतकाळात अडकून रडत बसण्यापेक्षा जिथे आहात , जसे आहात तिथून नव्याने सुरुवात करायला मला माझ्या बापूने शिकवले. 
बापूच्या विचारांनी , सहवासाने माझी जगण्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली . 
आणि म्हणूनच मी बोलते कि जगायचे कसे आणि जगवायचे कसे माझ्या बापूने मला शिकवले. 

so 
आनंद घ्या ! आनंद द्या !!!

Smile Please !!! 


- सुप्रिया नार्वेकर

7 comments: