कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ६ कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस दुसरा

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग - 
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस दुसरा  

रोज सकाळी उठायचे आणि आवरायचे म्हणजे एक मोठा प्रश्नच असतो. 
पण इथे सकाळ कधी होतेय आणि आम्ही कधी तयार होऊन camp site वर जातोय असे होयचे . 
alarm snooze करायची वेळ नाही आली . 
२ फेब्रुवारी २०१५ , सोमवार 
आज कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराचा दुसरा दिवस 
कालच्या आठवणी इतक्या भारी होत्या कि आज काय होणार ह्याची चित्र आधीच मनात रंगू लागली . 
आज मी आणि माझी मैत्रीण सकाळी जरा लवकरच उठलो आणि पटापट आवरून महालक्ष्मी आईच्या मंदिरात आईचे दर्शन घायाला गेलो .
आईची पूजा नुकतीच झाली होती . आणि आरतीला सुरुवात झाली'. 
दिवसाची सुरुवातच मांगल्य आणि पवित्र्याने झाली . 
मी दरवर्षी कोल्हापूरला जाते पण ह्या वर्षीचे कोल्हापूर मला खूप काही देऊन गेले.
आईचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही बस मध्ये बसलो . 
बस पुन्हा camp site च्या दिशेने निघाली . 
बस मध्ये आज जाताना भक्ती गीतांचे सूर होते . 
कॅम्प साईट वर उतरल्यावर सगळीकडे चैतन्याचे वातावरण होते. 
आजचा दिवस आहे Medical check up , Student Distribution आणि अन्नपूर्णा प्रसादमचा.
सगळे volunteers आपापल्या सेवांमध्ये मग्न होते . 
गावकरी भक्त आणि विद्यार्थी यायला सुरुवात झाली होती . 
सर्वप्रथम आम्हाला नाश्ता दिला, आजचा मेनू होता उपमा . 
चहा झाला आणि मग पुन्हा कालच्याप्रमाणे परमेश्वराचे नामस्मरण केले. 
सेवेच्या इथे आमची team गेली .मग एका volunteer ने आम्हाला सेवेची माहिती सांगितली .
आणि मी तर खूप आतुर होते कधी एकदा त्या चिमुकल्यांना खाऊ घालतेय असे झाले होते . 
सेवेच्या आधी आम्हाला सांगण्यात आले की कोणीही चप्पल घालणार नाही सेवा करताना कारण जसे आपण आपल्या घरीसुद्धा जेवताना 
चप्पल घालत नाही .  
किती सुंदर विचार आहेत  … 
करायचे म्हणून करायचे असा भाव नाही . 
प्रसादालायामध्ये मेनू पण झकास होता. बाळे येण्यासाठी थोडा वेळ होता म्हणून मी जेवण जिथे बनवले 
जात होते तेथे गेले . कुतुहूल होते मला कि एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसादम आहे मग ह्याचे जेवण कसे बनवतात
असणार? , भांडी किती मोठी असणार ?, भाज्या कशा कापत असणार? , मीठ , मसाला कसा टाकत असणार ? हे आणि बरेच !!!
तिथे गेल्यावर पाहिलं तर उंच उंच भांडी होती जेवण बनवण्यासाठी , त्याला तिथे  विहीर असे म्हणतात . 
तेव्हा मनात विचार आला कि जेव्हा घरी आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा आपले चमचे , वाटी असे अंदाज असतात बंधालले आणि तरीसुद्धा  
कधीतरी काहीतरी की जास्त प्रमाणात होते मग इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचे ???? 
हे कसे करत असतील ? मग एका कार्यकर्त्याला विचारले "हे तुम्ही कसे करता ? तर त्यांनी दिलेले उत्तर खूप गोड होते . 
ते म्हणाले "काही नाही मी माझ्या परमेश्वराचे नाव घेतो आणि टाकतो सगळे , मग काय तोच घेतो उत्तम करवून . आणि ह्याचा 
अनुभव मी जेव्हा नंतर जेवले तेव्हा आला , अतिशय रुचकर होते !!!   
मेनू होता भात , भाजी , आमटी , शिरा, लोणचे आणि लिंबू. 
हळू हळू छोटी छोटी पावले दिसू लागली . 
डोक्यावर टोपी , हातात पिशवी त्यात त्यांना दिलेला खाऊ आणि इतर साहित्य , सांभाळत सांभाळत लगबगीने एकमेकांचा हात पकडून एका रांगेत बैठकीवर जाऊन बसले . 
मग आम्ही जेवण वाढायला सुरुवात केली . 
एका वेळी अंदाजे १० रांगा होत्या आणि प्रत्येक रांगेत अंदाजे ३० मुले बसत होती. 
२-२ च्या रांगा प्रमाणे volunteers विभागले होते . 
जेवण देण्यासाठी  १ team आणि वाढण्यासाठी १ team असे केले होते . 
perfect management !!!
मी वाढण्यासाठी होते .  
जेवण पूर्ण वाढून  झाल्यावर सुरुवात करण्याच्या आधी 
वदनी कवळ घेता हे एकासुरात म्हटले बाळांनी . 
किती सुंदर संस्कार हे !!!
किती गोड बाळ सारी  … 
त्यांना जेवू घालताना आलेला अनुभव भन्नाट होता . 


Annapurna Prasadam
हे करताना दुपार कधी होऊन गेली आणि ४ वाजून गेले हे कळलेच नाही . 
मी आणि माझी मैत्रीण  जेवलो नव्हतो. 
तिथले स्थानिक कार्यकर्ते आम्हाला जेवून घ्या असे सारखे सांगत होते पण 
आमचे पोट तर त्या बाळांना जेवू घालून कधीच भरले होते . 
तृप्त झालो होतो. 
अस्मानी आनंद होता . 
मध्ये मध्ये जेव्हा  break मिळायचा तेव्हा तेव्हा मी camp site वर जाऊन बाकी सगळे पाहायचे . 
आपण एक काम करूया camp site च्या सुरुवातीच्या ठिकाणी जाऊया . 
सर्वप्रथम मी जेथून विद्यार्थी येत होते तिथे गेले ,
बस मधून विद्यार्थी खाली उतरत होते ,
आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि हि बाळे बसमधून खाली उतरतानाच त्यांना टोपी दिली जात होती . 
म्हणजेच camp पर्यंत चालत जाताना त्यांना उन लागू नये . एवढी काळजी मी तरी नाही पहिली अजून कुठे . 
प्रत्येक शाळेबरोबर २-२ volunteers  दिले होते जेणेकरून कोणाचे काही राहून जाऊ नये . 
सुरुवातीला सर्वांचे medical check up केले जात होते . 
सर्व डॉक्टर्स अत्यंत प्रेमाने , आपुलकीने तपासणी करत होते .
विद्यार्थ्यांना  औषधे, विटामिन्स साठी tonic,कृमीवरील tonic दिले जात होती.


 नंतर student distribution कक्ष होता तिथे बाळांना चप्पल दिली जात होती आणि तिसुद्धा all season म्हणजेच 
बाळांना कोणत्याही ऋतूमध्ये त्रास होऊ नये . 
इतका खोल विचार करणे खरच साधी गोष्ट नाही . 
विद्यार्थ्यांना मेणबत्त्या, माचीस,
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू  ह्यांच्या "अनिरुद्ध आदेश पथक " ह्या अंतर्गत वर्षभर चालवल्या जाणाऱ्या चाराख्यामधून जो सुत निघतो 
त्यापासून बनवलेले गणवेश दिले जातात . 
तसेच शाळांच्या शिक्षकांना शाळेसाठी लागणारे साहित्य 
Rings 
cricket kit -  १ bat , ४ stumps , ६ rubbery ball , 
Frisbee Discs दिले जातात . 
ह्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि 
नुसते आरोग्य नाही तर खेळाचे महत्त सुद्धा तितकेच आहे हे मुलांना समजते . 
हे सगळे झाल्यावर सर्व विद्यार्थी अन्नपूर्णा प्रसादम येथे येतात . 
आणि वर मी ते संगीतालच आहे . 
गावकर्यांसाठी सुद्धा असेच असते . 
वैद्यकीय तपासणीचे details खालील फोटोमधून तुम्हाला समजेल . 

details of medical check up
डोळे तपासणी सुद्धा केली जाते आणि विनामुल्य चष्मे दिले जातात ,
E.C .G  काढला जातो , काही मोठा आजार असल्यास तिथल्या सरकारी इस्पितळाचा reference देऊन त्यासंदर्भात 
मार्गदर्शन केले जाते . 
आणि हे सारे विनामुल्य असते . 
आश्चर्य वाटले ना… 
ऊन खूप  असल्याने त्याचा त्रास होऊन कोणाला चक्कर आली तर 
पाण्याबरोबरच लिंबू पाणी सुद्धा होते . 
कुठलीही शिबीर न वाटता हे घर असल्यासारखे वाटत होते आणि प्रत्येक स्वयंसेवक आपल्याच 
घरातले कार्य आहे , आपलीच सारी माणसे आहेत  भावनेने सेवा करत होता . 
ह्या सगळ्यात ५ कधी वाजले कळलंच नाही . 
camp साधारण ५-६ पर्यंत आवरला.  
दिवस कधी निघून गेला कळलेच नाही . 
मग आम्ही साऱ्या मैत्रिणी इतक्या दिवसांनी एकत्र आलो . 
एकमेकी अनुभव सांगू लागलो ,गप्पा रंगल्या आमच्या . 
आणि मग रात्रीच्या जेवणासाठीचा निरोप आला . 
जेवण झाले आणि मग वेळ आली camp मधून निघायची . 
अजिबात मन नव्हते तिथून निघण्यासाठी . 
हे सेवा शिबीर इतक्या लवकर का संपले ?
आजच का निघायचे ?
अजून पाहिजे न काही दिवस 
ह्या सगळ्या विचारांनी  डोळ्यात  पाणी आले. 
आयुष्यातले हे २ दिवस कधीही न विसरण्यासारखे आहेत . 
जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी मनापासुन करतो तेव्हा मिळणारा 
आनंद हा कोणत्याही इतर आनंदापेक्षा खूप मोठा असतो . 
त्या आनंदातून मिळणारी तृप्ती , समाधान आपल्याला सगळ्यात जास्त श्रीमंत करते . 
असे हे  कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ इथे थांबले 
मी मुद्दाम थांबले म्हणेन कारण हे कधीच संपणार नाही ,
अखंड चालू राहते आणि राहणार … 
अतिशय जड अंतकरणाने मी बस मधले पुन्हा मुंबई ला येण्यासाठी . 
परंतु मनाने अजूनही शिबिरातच होते . 
ह्या सर्व लेखांच्या मालिकेमुळे सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
क्रमश :

Photo Courtesy : - Kolhapur Medical and Health Care Camp                                         Facebook Page  

सुप्रिया नार्वेकर 

Find More Photos and Videos on 

0 comments: