Printing Industry - कागदाचे अनन्यसाधारण महत्त्व

Printing Industry - कागदाचे अनन्यसाधारण महत्त्व




चिठ्ठी आयी हे आयी हे 
चिठ्ठी आयी हे … 

आपल्या सर्वांना परिचित असलेले हे गाणे . 
पण आत्ताचे जग हे "Tech savvy " झाले आहे आणि त्यामुळे चिठ्ठी किंबहुना ते लिहिण्यासाठी वापरला जाणार कागद हे कुठेतरी 
लुप्त होत चालले आहे . 

तसे पहायला गेले तर "कागद" हा  Printing Industry मधला एक अविभाज्य घटक . 
म्हटले तर Printing Industry चा श्वास. 
कागद हा भारतीय प्राचीन लेखन सामाग्रीमधला एक महत्त्वाचा भाग आहे . 
जरी आता बहुतांश गोष्टी ह्या computerized झाल्या असल्या , संपर्कासाठी इतर अनेक सोयी -सुविधा उपलब्ध असल्या तरी कागदाची 
जागा कोणीही घेऊ शकत नाही . 
जरा विचार करून बघा जर कागदाचा शोध लागला नसता तर ?
मुद्रण कला विकसित झाली नसती तर ?
तर मग आपण काय केले असते ?
पाषाणावरती शिलालेख लिहिले असते कि वृक्षांवरती भूर्जपत्रे ?
आत्ताच्या २१ व्या शतकात आहे का हे शक्य ?
नाही ना  ???

खरे पाहायला गेले तर कागदाचा शोध हा आपल्या भारतात ७ व्या शतकात लागला परंतु तरीही ११ व्या शतकापर्यंत 
कागदाचा फारसा उपयोग केला गेला नाही . 
आपल्या भारतात कागदावर लिहिले गेलेले प्राचीन आणि दुर्मिळ पुस्तक किंवा ग्रंथ हा "पंचरक्ष" आहे आणि ते सध्या 
कलकत्ता येथे "आशुतोष संग्रहालयात " सुरक्षित आहे . 

असो तर सध्या आपण ज्या शतकात आहोत त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान एवढ्या प्रमाणात विकसित झाले आहे कि सगळकाही Internet आणि Mobile 
वर उपलब्ध आहे . 
काही शाळांमध्ये पुस्तके जाऊन त्याची जागा e - learning ने घेतली आहे ,
कादंबरी , ग्रंथ , दैनंदिन वर्तमानपत्रे , मासिके e - book , e - paper वर सहजरीत्या वाचली जातात ,
लग्न किंवा इतर समारंभाचे photos cd/ dvd  किंवा computer मध्ये save केले जातात ,
स्तोत्रे , पोथ्या हे headphone लावून mobile वर ऐकली जातात . 
पण हे सर्व जरी आधुनिक आणि आत्ताच्या जीवन सरणीसाठीसोपे असले तरी काही गोष्टींमधून मिळणारा आनंद आपल्याला विसरून चालणार नाही . 
शाळांमधल्या e - learning पद्धतीमुळे आत्ताच्या विद्यार्थ्यांना 
कोऱ्या पुस्तकाच्या वासाची गमंत कशी कळणार ?
वह्यांना खाकी cover घालून त्यावर sticker चिकटवण्याची मजा ते कसे अनुभवणार ?
सकाळी एका हातात चहा आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र घेऊन ते वाचताना मिळणारा उत्साह काही निराळाच … 
आपण आता जेव्हा आपल्या लहानपणीचे किंवा पूर्वीचे फोटो album पहिले कि नकळत आपण त्या आठवणींमध्ये रमून जातो मग जर आपण हे photos 
mobile पर्यंत मर्यादित ठेवले तर पुढच्या काळात हे फोटो बघून मिळणाऱ्या आनंदाला आपण मुकू .
देवाची स्तोत्रे हातात पोथी घेऊन वाचताना मिळणारी पवित्र स्पंदने mobile वर headphone लावून कशी मिळणार ?
शाळांमध्ये हस्तकलेच्या विविध वस्तू बनवण्याचा आनंद आत्ताची लहान मुले हरवून बसली आहेत . 
आपल्या प्रियजनांना शुभेच्छा,निमंत्रण,अभिनंदन,आशिर्वाद हे सारेwatsapp / email / phone वरून दिले जातात पण मग कधीतरी पत्रसुद्धा पाठवून बघा. एक वेगळाच आनंद आहे त्यामध्ये . 
पण सध्याच्या tech savvy जमान्यामुळे कागद किंबहुना  प्रिंटींग क्षेत्रासमोर भविष्यात फार मोठे आव्हान उभे राहणार आहे . 
आता आधुनिक तंत्रज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकसित झाले कि printing क्षेत्र आणि पर्यानाने कागद हे मागे पडत चालले आहे . 

हे असे असले तरीही कागदाचे महत्त्व विसरून चालणार नाही . 
समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये कागदाने मोलाचा वाटा उचलला आहे . 
स्वातंत्र्यपूर्व काळात ह्याच कागदावर मांडल्या गेलेल्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचू शकले . 
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या  "केसरी" आणि  "मराठा " ह्या वर्तमानपत्रांमुळे त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहचू शकले . 
आणि स्वातंत्र्याच्या कार्यात मोलाचा ठसा उमटवून गेले. 
मग जरा विचार करा जर कागदाचा शोध लागला नसता तर हे सारे किती अवघड होऊन बसले असते . 
अशा ह्या कागदाचे महत्त्व नजरेआड करून चालणार नाही . 
काय मग पटले ना कागदाचे महत्त्व ???
परंतु ह्या सगळ्यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा कि जिथे आवश्यकता नाही तिथे कागदाचा उपयोग नक्किच टाळावा . 
असा हा कागद Printing Industry  चा एक अविभाज्य घटक बनला . 

ह्याच कागदाचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचा व्यवहारातला उपयोग आपण पुढील लेखात बघूया . 

                                                                               -सुप्रिया नार्वेकर    

संदर्भ :- 

5 comments: