शाई -Printing Industry ची नस

Ink

    शाई -Printing Industry ची नस

लहानपणी शाळेत असताना आम्हाला तिसरी आणि चौथीला निबंध लिहिण्यासाठी फक्त शाईचे पेन वापरण्याचे बंधन होते. मग काय सुबक अशी दौत आणि त्याबरोबरचे ते शाईचे पेन .
ink bottle

निराळेच अप्रूप होते ते !!!
शाईचा संबंध काय तो एवढाच .
पुढे पेन आणि पेनाची रिफील इतकंच काय ते शाईचे दैनंदिन व्यवहारातील येणे जाणे.
पण पुढे जेव्हा नोकरी संदर्भात printing क्षेत्रात आले तेव्हा शाईचे महत्त्व लक्षात आले .
छोट्याश्या दौतीमधल्या शाईची उत्क्रांती वाखाण्याजोगी आहे .
थोडासा इतिहास पहिला तर-
पूर्वी जास्त प्रमाणात काळ्या रंगाच्या शाईचा वापर केला जात असे.
चांगल्या दर्जाच्या लाखेचा वापर करून त्यावर रासायनिक पक्रिया करून शाई बनवली जात असे.
दिव्यांच्या काजळीचाही शाई म्हणून वापर केला जात असे.
त्याचबरोबर गेरू , कुंकू , हळद हेसुद्धा पर्याय उपलब्ध होते .
विचार करा जर शाईचा शोध लागला नसता तर काय आपण दगडांवर रेघोट्या ओढत बसलो असतो का ?
२१ व्या शतकात आहे का ते शक्य ?
शाई आणि तिचे प्रकार हे तांत्रिकदृष्ट्या पहायला गेलो तर फार किचकट आहेत .
म्हणून शाई मधले काही खास प्रकार आपण पाहू .
सर्वसामान्यपणे वापरात येणारी प्रिंटींगची प्रक्रिया म्हणजे ऑफसेट प्रिंटींग.
ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये ३ प्रमुख घटक असतात .
१) पिगमेंट
२) वेहिकल
३) मोडिफायर 

ह्याची थोडक्यात ओळख करून घेऊ
१) पिगमेंट
साधारणत: पिगमेंट २ प्रकारचे असतात .
i ) ओरगानिक पिगमेंट -
हे काळी शाई बनवण्यासाठी कार्बन पासून तयार केले जाते .
ii ) इनओरगानिक पिगमेंट -
वेगेवेगळ्यारंगांच्या शाई बनवण्यासाठी हे वापरले जाते
२) वेहिकल -
हे असे द्रव्य आहे जे पिगमेंटचे कण घट्ट धरून ठेवते आणि कागदावर नेण्यास सहकार्य करते .
३) मोडिफायर
हा असा घटक आहे जो शाई सुकण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो त्याचप्रमाणे शाईला येणारा वास आणि रंग पसरणे ह्याला प्रतिकार करतो'
 
आपल्या नजरेत कधी आले असेल एखादी लग्नपत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका असते त्याला
एक सुगंध येतो . हि कमाल शाईचीच.
Fragrance  Ink असे सर्वसामान्य भाषेत संबोधले आहे .
ह्या शाईमध्ये Fragrance Oil वापरले जाते .
Printing ची  पूर्ण झाल्यानंतर ह्या oil चा वापर केला जातो .
अजून खास म्हणजे -
कधी कधी काही चित्र आपल्याला सामान्य प्रकाशात दिसत नाहीत पण त्यावर ultra - violet rays चा प्रखर मारा झाला किंवा सूर्य प्रकाशाशी थेट संबंध आला कि दिसून येतात . हि कला सुद्धा शाईचीच.
ह्यामध्ये back-light ink वापरली जाते .
तुम्ही कधी जादूचा मग पहिला आहे का ?
बाजारात आता सहज उपलब्ध होतात .
मला माझ्या office मधून गिफ्ट मिळाला आहे …
हा मग बाहेरून पूर्णपणे काळा असतो .
पण जेव्हा तुम्ही त्यामध्ये गरम चहा किंवा पाणी ओतता तेव्हा हळूहळू त्यावरील चित्र दिसायला सुरुवात होते .
हि जादू आहे एका विशिष्ट प्रकारच्या शाईचीच.
magic mug
ती म्हणजे Oxidised Ink .
असा हा जादूचा मग आपल्या प्रियजनांना किती आनंद देईल .
खोलात शिरलो तर खूप माहिती आहे आणि थोडी क्लिष्ट सुद्धा .
ह्या लेखामुळे सर्वांना शाईचे महत्त्व मात्र नक्कीच कळेल .

सुप्रिया नार्वेकर 

2 comments:

  1. सुप्रिया अगदी खरे आहे तुमचे मत की शाळा सुटली की शाईचा संबंध सुटल्यात जमा होतो. त्यामुळे शाईबद्दलची एवढी विस्मयकारक माहिती वाचून पटले की शाई ही खरोखरीच प्रिंटींग इंडस्ट्रीची नस म्हणून का गणली जाते. Back light Ink , Oxidised Ink ह्या शाईच्या जादूमागील रहस्य सुध्दा उलगडले गेले. शाईच्या उत्क्रांतीविषयक ज्ञानात भर घालणार्‍या खूप छान लेखाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  2. Good information. Very interesting Ambadnya

    ReplyDelete