नटसम्राट- एक अद्भुत कलाकृती



kusumagraj



नटसम्राट- एक अद्भुत कलाकृती

कुणी घर देतं का घर ???
एका तुफानाला कुणी घर देतं का घर ???
एक तुफान भिंतीवाचून
एक तुफान छपरावाचून
माणसाच्या मायेवाचून
देवाच्या दयेवाचून
डोंगराडोंगरात हिंडत आहे
जिथून , कुणी उठवणार नाही अशी जागा
धुंडतयं…
कुणी घर देतं का घर ???


कट्यार काळजात घुसली ह्यानंतर आमच्या पिढीला
अजून एक अद्भू आणि अपूर्व कलाकृती बघण्याचा
योग आला.
नाटक  चांगले कि चित्रपट ?
कोणी काम चांगले केले ?
ह्याची चर्चा करण्यापेक्षा  हि कलाकृती किती ताकदीची आहे हे महत्त्वाचे .

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज .
साहित्य म्हणजे फुलांची बाग .
ह्या बागेमध्ये विविध फुले आहेत आणि त्या फुलांमधले सर्वश्रेष्ठ असणारे म्हणजे वि वा शिरवाडकर म्हणून कुसुमाग्रज .

आमच्या पिढीला कुसुमाग्रज म्हटले कि आठवते -
शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकामाधली "कणा "  हि कविता .
पण आमच्या आधीच्या पिढीने अनुभवले ते
साहित्यातातले सर्वोत्कृष्ट नाटक आणि ते म्हणजे "नटसम्राट"!!!आणि आज ते ह्या नव्या पिढीला अनुभवायला आले .
एक दर्जेदार कलाकृती !!!
काळजाला भिडणारे संवाद !!!
समर्थ लेखनशैली !!!
अत्यंत नाजूक आणि भावूक विषयाची उत्तम पद्धत्तीने हाताळणी !!!
आणि म्हणूनच "नटसम्राट" हा मराठी रंगभूमीवरील अनेक नटवर्यांनी आपल्या दमदार अभिनायामधून अजरामर केलेला एक मैलाचा दगड ठरला .
ह्यामधला शब्द न शब्द म्हणजे हृदय चिरणारी कट्यार जणू !!!
"माझ्या डोळ्यात आसवं जमा होयला लागली ना तर खिळे मारून खाचा करून टाकीन पण रडणार नाही . "
डोळ्यांच्या पापण्या ओल्या करणारे लिखाण …
खरच कुसुमाग्रज म्हणजे ज्येष्ठ साहित्यक …
गणपतराव बेलवलकर म्हणजेच आप्पा आणि म्हणजेच नटसम्राट हि कलाकृती निर्माण करणारे
कुसुमाग्रज म्हणजे खरे साहित्य सम्राट !!!
आपले संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी वाहिले , कमावलेली सारी मिळकत खूप मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांवर उधळून टाकली. आणि त्याच्याच नशिबाने त्याची अशी थट्टा मांडवी ???
एक उत्कृष्ट कथानक कुसुमाग्रजांनी रसिकांसमोर आणले .
अजून एक संवाद -
काहीसा खालील आशयाचा
"नटाचे काम असे असले पाहिजे कि  समोर बसलेल्या रसिक प्रेशाकांच्या एका हातात वेफर्सचे पाकीट आणि एका हातात त्यातला एक वेफर्सचा तुकडा आणि तो तुकडा आणि तोंड ह्यामाधले अंतर हे तसच राहिले पाहिजे ."

काय म्हणावे ह्या शैलीला !!!
शब्द कमी पडतील .
शब्दांची सुरेख गुंफण .

"विधात्या तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला
विसरतोस .
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोके आदळायचे …

"कमावलेले सारे वैभव गुलालासारखे ह्यांच्यावर उधळले आणि त्याच मुलांच्या घरात आज बाप चोर ठरला ."

"नटाला रंगभूमी हि आईच्या गर्भाइतकीच सुरक्षित वाटते ."

"नियती जितकी कठोर तितकेच का नरम पडत जाते काळीज ???
भिनते वेदना रोमारोमात विचारीत जाब विवेकाला … "

"रत्नजडीत मुकुट उतरवताच का उघडे पडावे कपाळी कठोर प्रारब्ध
नि व्हावी जखम वाहती
मायेचा कणभर ओलावा मागण्यास झोंबत भळभळत्या भावनेचा एकाच सवाल
"जगावं कि मरावं हा एकंच सवाल "

"लंगड्याला काय सांगतोस रे हरवलेल्या चपलेचे दु:ख"

चित्रपट पहाताना प्रत्येक संवाद कागदावर उतरवून घ्यावेसे वाटत होते …
अफाट लेखन सामर्थ्य !!!
नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि बेघर वृद्ध हे सर्व एका कथानकात रेखाटणे
हे कौतुकास्पद आहे .
आणि आता आलेल्या ह्या चित्रपटात सुद्धा हे सुंदर चित्रित केले आहे .
नाना आणि विक्रम गोखलेंच्या प्रत्येक अभिनयाची जुगलबंदी वाखाण्याजोगी आहे .
कुठेही भडकपणा नाही .
अर्थपूर्ण संगीत
प्रसंगानुरूप हास्य विनोद आणि शिव्या सुद्धा …
सर्वकाही एकेमेकांत गुंफलेले !!!
चित्रपट संपल्यानंतर डोळ्यांत पाणी घेऊन अशा दर्जेदार कलाकृतीला सलाम करीत
प्रत्येक रसिक प्रेक्षक exit घेतो  
अशा ह्या साहित्य सम्राटाला "कुसुमाग्रजांना " मानाचा मुजरा !!!
To be or not to be that
is the question !!!

-सुप्रिया नार्वेकर




1 comments: