Wings to Fly- DR. APJ ABDUL KALAM




                             

Wings to Fly- DR. APJ ABDUL KALAM


काल watsapp वर एका ग्रुप वर बातमी आली " DR. APJ ABDUL KALAM is no more ."
काही क्षणासाठी चीड आली social media ची . काहीही अफवा काय पसरवतात???
कारण दुपारीच "Going to Shillong.. to take course on Livable Planet earth at iim. With @srijanpalsingh and Sharma." असे tweet वाचले होते त्यांचे .
त्यामुळे आधी  T.V लावला आणि बातम्या चालू केल्या परंतु दुर्दैवाने हे खरे होते .
भारताचे क्षेपणास्त्र हरवले होते , अग्निपंख विसावले होते, भारताचे रत्न हरवले होते...
वयाच्या ८४ व्या वर्षी "Missile Man" अब्दुल कलाम सर आपल्याला सोडून गेले होते .
डोळे पाणावले पण लगेच त्यांच्या पुढील कवितेची आठवण झाली.

Wings to Fly
                             
    I am born with potential.
          I am born with goodness and trust.
         I am born with ideas and dreams.
    I am born with greatness.
      I am born with confidence.
      I am born with wings.
              I am not meant for crawling,
            So I won’t, I have wings,
       I will fly, fly and fly”
                                                            - DR. APJ ABDUL KALAM

कलाम सरांची हि एक कविताच किती मार्गदर्शक आहे आपल्यासाठी .
कोणी पाहिलेले कि रमेश्वरन सारख्या एका लहान गावात जन्माला आलेला हा मुलगा भारताचे राष्ट्रपती पद भूषवेल,
एक थोर वैद्यानिक म्हणून नाव कमावेल.
कोणतीही सबब न देता , आहे त्या परिस्थितीत वाट काढून पुढे जाणे हे कलाम सरांच्या नसानसांत भिनले होते.
घरची परिस्थिती अतिशय बेताची . लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले पण कुठेही खचून न जाता आपल्या मेहनतीने , जिद्दीने त्यांनी साऱ्या देशभर आपले नाव कमावले . त्यांचे प्रत्येक वाक्य हे प्रेरणादायी आहे आजच्या आणि पुढे येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी !!

All birds find shelter during rain.
But Eagle avoids rain by flying above the clouds.
Problems are commom, but attitude makes the difference !!
 - DR. APJ ABDUL KALAM

कलाम सर म्हणजे उत्कृष्ट शिक्षक , मार्गदर्शक , मित्र , धोरणी राजकीय नेता, मुत्सद्दी वक्ता आणि ह्या सगळ्या पलीकडे जाऊन एक आदर्श व्यक्तिमत्त्व किंबहुना एक आदर्श भारतीय नागरिक !!!

कलाम सरांबद्दल लिहिणे म्हणजे एका प्रचंड महासागराला एखाद्या लहान बाटलीमध्ये सामावण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. 

पद कोणतेही असो पण ते नेहमी आपल्याला एका शिक्षकाच्या भूमिकेतच दिसले .
ते नेहमी विद्यार्थ्यांच्या गराड्यात दिसत.
कलाम सरांचा आजच्या युवा पिढीवर कमालीचा विश्वास होता आणि म्हणूनच कदाचित "Vision २०२०" हे स्वप्न ते पाहू शकले आणि ते पूर्ण
करण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले.
 "Sir Dr. Kalam believes that the ignited mind of the youth is the most powerful resource on the earth, under the earth and above the earth."

संपूर्ण युवा पिढीचे ते अत्यंत लाडके होते. त्यांचे प्रत्येक वाक्य प्रेरणादायी आहे.

कलाम सर = extreme positive attitude 
हे जणू समीकरणच आहे .
"अशक्य" असा शब्द अस्तित्वात आहे हे मुळी त्यांना माहीतच नव्हते .
सतत कार्यरत असलेले कलाम सर सगळ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक आहेत. मी इथे होते असे म्हणणार नाही कारण ते आपल्यात आहेतच आणि राहणार .
तुम्ही कधीही google मध्ये  " APJ ABDUL KALAM " असे सर्च करा तुम्हाला फक्त
 " abdul kalam's quotes , abdul kalam's speech , 
 abdul kalam's research , abdul kalam's book, abdul kalam's biography " असे दिसेल.
कधीही "abdul kalam's vacation, abdul kalam's house,  
abdul kalam's car etc असे दिसणार नाही. 

"I will fly, fly and fly”
यशस्वी होण्याची गुरुकिल्ली त्यांनी ह्या वाक्यातून दिली .
इथे त्यांना अपेक्षित असलेले पंख म्हणजे चांगुलपणा , विश्वास , कार्यक्षमता , आत्मविश्वास ह्या साऱ्यांचे !!!

ते जसे आदर्श नागरिक,आदर्श नेता,आदर्श शिक्षक असले तरी त्याचबरोबर ते एक उत्तम लेखक आणि कवी होते .
त्यांची ग्रंथसंपदा वाखाण्याजोगी आहे .
ग्रंथसंपदा

डेव्हलपमेंट इन फ्ल्यूइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नोलॉजी (१९८८),(डॉ. एपीजे अब्दुल कमाम आण‌ि रोद्दाम नरस‌म्हिा),(डॉ. एपीजे कलाम आण‌ि वाय. एस. राजन),
विंग्ज ऑफ फायर (मराठीत अनुवाद - अग्न‌पिंख) (१९९९), डॉ. एपीजे अब्दुल कलाम, अरुण तिवारी,इग्नायटेड माईंड्स: अनलिशिंग दी पॉवर विद‌नि इंडिया (२००२)
दी ल्यूमिनस स्पार्क्स (२००४),म‌शिन इंडिया (२००५),इन्स्पायरिंग थॉट्स (२००७),इनडॉम‌टिेबल स्प‌रििट्स (२००७), एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन,
डॉ. एपीजे कलाम आण‌ि ‌सिवाथानू प‌ल्लिई, यू आर बॉर्न टू ब्लॉसम : टेक माय जर्नी ब‌यिाँड (२०११), डॉ. एपीजे कलाम आण‌ि अरुण तिवारी,टर्न‌िंग पॉईंट्सः ए जर्नी थ्रु चॅलेंजेस (२०१२), टार्गेट थ्री ब‌लि‌यिन (२०११), डॉ. एपीजे कलाम आण‌ि श्रीजन पाल सिंग, माय जर्नीः ट्रान्सफॉर्म‌िंग ड्र‌म्सि इन्टू अॅक्शन्स (२०१३),
ए मॅनीफेस्टो फॉर चेंजः ए स‌क्विेल टू इंडिया २०२० (२०१४), डॉ. एपीजे कलाम आण‌ि व्ही. पोनराज, ट्रान्सेंड‌िंग माय स्प‌रििच्युअल एक्सप‌रिियन्स विथ प्रमुख स्वामीजी (२०१५), रिइग्नायटेड ः सायंटिफ‌कि पाथवेज टू ए ब्रायटर फ्यूचर (२०१५),
डॉ. एपीजे कलाम आण‌ि श्रीजन पाल सिंग
चकित करून सोडणारी हि लेखनाची शशृंखला !!!


भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी जशी देशसेवा केलीच परंतु एक शास्त्रज्ञ म्हणून केलेले कार्य कोणत्याही  देशसेवेपेक्षा कमी नाही .
वैद्यानिक शक्तीच्या आधारे त्यांनी आपल्या भारत देशाला एका विशिष्ट उंचीवर नेले .
आपले अखंड जीवन त्यांनी आपल्या भारत देशासाठी समर्पित केले .
त्यांना जर एक महान ब्रह्मर्षी म्हटले तर वावगे ठरणार नाही .
त्रिशूल , अग्नी , पृथ्वी , नाग , आकाश हि क्षेपणास्त्रे आणि अर्जुन रणगाडा ह्यांची निर्मिती करून सरांनी साऱ्या जगाला भारताच्या ताकदीची प्रचीती करून दिली .
त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी अनेक मानाच्या पुरस्कारांची सुंदर माळ त्यांच्या गळ्यात गुंफली गेली .

१९८१ मध्ये पद्मभूषण

१९९० मध्ये पद्मविभूषण

१९९० इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार

१९९७ भारतरत्न 

१९९८ मध्ये वीर सावरकर पुरस्कार

२००० मध्ये रामानुजन पुरस्कार

२००७ मध्ये ब्रिटिश रॉयल सोसायटीतर्फे किंग चार्ल्स (द्वितीय) पदक

२००७ वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स

२००८ सिंगापूरच्या नान्यांग टेक्नॉलॉजिकल विद्यापिठाकडून डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग

२००९ अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स संस्थेतर्फे हूवर पदक

२००९ अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

२०१० वॉटलू विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग

२०११ इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर संस्थेचे मानाचे सभासदत्व

पण ह्याचा गर्व कधीही त्यांच्या वागण्यातून दिसला नाही .

त्यांचे एक वाक्य मला अतिशय भावले …
I’m not a Handsome guy,
but i can give my
Hand-To-Some one who needs help.
Beauty is in heart, not in face.

- DR. APJ ABDUL KALAM

ज्यांचे मनच इतके सुंदर आहे ती व्यक्ती किती सुंदर असेल ?
त्यांच्या ह्या सुंदर आणि निर्मळ विचारांमुळेच ते आज साऱ्या भारताचे सुपुत्र झाले .
खरच त्यांचे हे जाणे मनाला खूप मोठे दुख देऊन गेले .
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले .
ते नेहमी म्हणायचे
"I’m teacher, I’m professor.
Teaching is my passion."

आणि आपले सर्वात आवडते कार्य करतानाचा मृत्यू येणे हे परम भाग्य !!!
कलाम सर नाहीत हे म्हणणेच चुकीचे ठरेल .
त्यांच्या प्रत्येक वाक्यातून ते आपल्याबरोबरच आहेत आणि राहतील .
त्यांना खरोखर श्रद्धांजली वाहायची असेल तर "२०२० मध्ये भारत महासत्ता बनण्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न" पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयास चालू करणे हीच असेल .
कधीही भरून न निघणारी हि हानी आहे .

Dream is not that you see in sleep ,
dream is something
that does not let you sleep.

- DR. APJ ABDUL KALAM


सरांना हा कवितेरूपी अखेरचा सलाम


एक लखलखता तारा
अवचित निखळला
भारत देश नाही तर
सारा देशच हळहळला

देशसेवेसाठी सारे
जीवन  खर्चिले
भारताच्या ताकदीचे
स्वरूप साऱ्या जगाला दाखवले

साधी सरळ राहणी
पण शब्दांना होती धार
नेतृत्त्व कुशल आणि
व्यक्तिमत्त्व चमकदार

कितीही लिहिले तरी
कमी पडतील शब्द
सरांच्या विचारांसमोर
आम्ही सारेच निशब्द

असा भारत पुत्र
पुन्हा कधी होणे नाही
सरांचे हे जाणे
कधीही भरून निघणे नाही 

अशा ह्या भारतपुत्राला
अखेरचा सलाम
अखंड भारत वासीयांच्या
हृदयात राहतील
सर अब्दुल कलाम

                                          -सुप्रिया नार्वेकर


संदर्भ :-

https://en.wikipedia.org/wiki/A._P._J._Abdul_Kalam

https://www.google.co.in/search?q=abdul+kalam+quotes&biw=1366&bih=963&source=lnms&tbm=isch&sa=X&sqi=2&ved=0CAYQ_AUoAWoVChMIvI3k7_z8xgIVUFKOCh2exgxl#imgrc=_

http://www.dailyo.in/variety/kalam-apj-twitter-missile-man-president-india-death/story/1/5263.html

https://deltathrissur.wordpress.com/plus-one/unit-1-glimpses-of-greatness/i-will-fly-dr-a-p-j-abdul-kalam/

5 comments: