नेताजी - एक कडवा देशभक्त

Pratyaksh Mitra


  नेताजी - एक कडवा देशभक्त
भाग _२
जेव्हा "प्रत्यक्ष मित्र "  मधील "नेताजींच्या लेखमालेमधील" दुसरे सदर वाचनात आले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली , ती म्हणजे
बालवयात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना , आपल्यावर होणारे संस्कार ह्यानेच आपले आयुष्य घडते आणि
जगण्याची योग्य दिशा ,ध्येय आपल्याला साधता येते .
तसेच नेताजींच्या बाबतीत झाले .
नेताजींचे वडिल  "जानकीदास बोस " हे कटक शहरातील नामांकित सरकारी वकील होते आणि देशभक्त सुद्धा .
परंतु नेताजींवर खास प्रभाव पडला तो दोन व्यक्तिमत्त्वांचा .
त्यातले पहिले म्हणजे बेणीमाधव दास जे नेताजींच्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक होते आणि
दुसरे म्हणजे स्वामीजी अर्थात स्वामी विवेकानंद .
बेणीमाधव दास हे एक आदर्श शिक्षक तर होतेच पण त्याचबरोबर ते एक देशप्रेमीसुद्धा होते .
आणि त्यांच्याच स्वातंत्र्याच्या विधानांवरून नेताजी घडत गेले .
नेताजी जन्मतः च प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेले होते .
शालेय जीवनात तथा पुढील अभ्यासक्रमात ते अव्वल होते .
नेताजी हे जितके हुशार होते तितकेच ते निश्चयी होते .
ह्याची जाणीव मला "प्रत्यक्ष मित्र " मध्ये "नेताजींच्या लेखमालेमधील" दुसरे सदर वाचताना आलेल्या एका प्रसंगावरून कळली.
एखादी गोष्ट फक्त शिकायची म्हणून शिकायची हा त्यांचा स्वभावाच नव्हता .
तर त्याचा सखोल अभ्यास करून ती आत्मसात करणे हा नेताजींचा स्वभाव होता.
आणि म्हणूनच यश त्यांच्या पाठी नाही तर त्यांच्या बरोबर प्रत्येक पावलात उभे राहिले .
आणि ह्यात भर पडली ती स्वामीजींच्या म्हणजेच स्वामी  विवेकानंदजींच्या विचारांची …
आकार दिलेल्या मातीच्या भांड्याला जसे अग्नी पक्क करते तसच
देशभक्तीने झपाटून गेलेल्या नेताजींच्या विचारांना स्वामीजींच्या विचारांनी अधिक पक्क केले .

दिवसरात्र एक करून जिथून मिळेल तिथून स्वमिजींची पुस्तके आणून वाचून नेताजींनी आपल्या मधल्या स्वातंत्र्य प्रेमाच्या अग्नीमध्ये निखारे घातले .
आणि त्यानेच त्यांच्या जीवनाला एक नवे वळण मिळाले .
नेताजींच्या रूपात जणू काही भारतमातेला एक धडाडीचा , सच्चा , देशप्रेमाने झपाटून गेलेला,कडवा देशभक्तच लाभला.

संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र ( http://supriyanarvekar.blogspot.in/2015/11/netajisubhashchandrabose2.html )





0 comments: