नेताजी - एक श्रद्धावान देशभक्त

Pratyaksh Mitra

नेताजी - एक श्रद्धावान देशभक्त

नेताजींचे मन आतापर्यंत स्वामी विवेकानंदजींच्या विचारांनी संपूर्णपणे भारावून गेले होते.
प्रत्येकाला आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची किंवा गुरूची आवश्यकता असते.
त्याच शोधात नेताजी होते  आणि मग स्वामी विवेकानंदजींच्या रुपामध्ये नेताजींना त्यांचे गुरु लाभले.
प्राचीन आणि आधुनिक पद्धतींचा सुवर्णमध्य साधण्याचे धाडस स्वामीजींनी त्या काळी केले होते.

Pratyaksh Mitra

आणि म्हणूनच नेताजी स्वामीजींच्या विचारांवर चालत रहिले.
स्वामीजी हे  स्वतः श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते.
खरे पहाता नेताजी स्वतः एक खरे श्रद्धावान होते.
कारण फक्त एक सच्चा श्रद्धावानाच इतरांच्या बबतीत चांगला विचार करू शकतो.
ईश्वर आहे हि संकल्पना फक्त मानव जन्मातच शक्य आहे ,पशु योनीमध्ये हे शक्य नाही .
आणि नेताजी ह्या साऱ्या गोष्टींना पूर्णपणे सहमत होते.
भक्ती हीच यशस्वी जीवनाचा पाया आहे आणि ईश्वरप्राप्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे हे नेताजींनी जाणले होते
म्हणून मी जे काही करेन ते ईश्वर चरणी अर्पण करत एक दिवस सारे जीवनच ईश्वर चरणी अर्पण करायचे आहे ,
हे नेताजींनी आपल्या जीवनाचे सूत्र बनवले.
परंतु नेताजींचे हे वागणे त्यांच्या पालकांना मात्र अस्वस्थ करत होते आणि म्हणून हवाबदलीसाठी नेताजींना शरदबाबुंकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.
पण त्याचा परिणाम उलट झाला.
पर्यावरणातला बदल होण्यापेक्षा नेताजींच्या मनाचाच बदल झाला .
अन्यायाविरुद्ध लढण्याची एक वेगळीच शक्ती त्यांच्यामध्ये आली .
इंग्रज सरकार आणि त्यावेळची इंग्रज महाराणी ह्याबद्दल विलक्षण चीड त्यांच्या मनात निर्माण झाली .
"प्रत्यक्ष मित्र "  मधील  "नेताजींच्या लेखमालेमधील" लेखांमधून हे सारे प्रकर्षाने जाणवते .
कलकत्त्यावरून आल्यावर शाळेत इंग्रज महाराणीच्या प्रार्थनेला नेताजींनी ठामपणे  नकार दिला .
त्यासाठी शिक्षकांचा अंगावर वळ उठेपर्यंत मार खाल्ला आणि तरीही आपल्या मतावर ते ठाम होते.
ऐतिहासिक अलीपूर बॉम्ब धमाक्यामध्ये १८ वर्षाच्या खुदिराम बोस ह्याला राजद्रोही ठरवून इंग्रज सरकारकडून  फाशी देण्यात आली
आणि ह्या घटनेमुळे नेताजी खूप हळहळले, खूप रडले . त्यांच्या आदर्श व्याक्तीमात्तावांच्या यादींमध्ये अजून एक नाव सामील झाले .
हे सारे "प्रत्यक्ष मित्र "  मधील  "नेताजींच्या लेखमालेमधील" लेखांमधून आपल्याला समजते कि
"देशभक्ती हि नेताजींच्या नसानसांत किती भरली होती ."
आणि ती निघणे आता शक्य नव्हते .
अन्यायाविरुद्ध लढा पुकारण्याचे वादळ केव्हाच नेताजींच्या मध्ये सुरु झाले होते .
आणि ह्यातून जन्म झाला एका थोर श्रद्धावान देशभक्ताचा  !!!


- सुप्रिया नार्वेकर

संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/vivekanand-influence-subhashchandra-bose/ )
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/hindi-netaji-subhashchandra-bose-4/ )
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/netaji-5/ )
                          

0 comments: