पावसा आता बरस रे जरा …
वाढली उन्हाची काहली
सृष्टी सारी हैराण झाली
मेघा तुझ्या बरसू दे धारा
पावसा आता बरस रे जरा
मुके जीव पाण्याला सुकले
नदी ,तळे पाण्याविना आटले
कधी वाहणार पुन्हा एकदा झरा
पावसा आता बरस रे जरा
झाडेही आता शोधती सावली
चिमणी पाखरे कुठेतरी हरवली
कधी बहरणार हा परिसर सारा
पावसा आता बरस रे जरा
काळी आई बघतेय तुझी वाट
लेकरांना तिच्या तुझीच रे साथ
वाहू दे आता समृद्धीचा वारा
पावसा आता बरस रे जरा
मेघा तुझ्या बरसू दे धारा
पावसा आता बरस रे जरा
खूपच सुंदर कविता, सुप्रिया ... पाऊस बरसविणार्या काळ्या मेघांची आकाशात गर्दी दाटू लागली की आता कधी एकदा हा पाऊस येणार म्हणून सारेच चराचरातील , निसर्गातील सजीव व्याकुळ होतात , त्याचे खूपच छान भावस्पर्शी शब्दांकन केले आहे...
ReplyDeleteधन्यवाद !!!
Deleteपाऊस हा ऋतुच असा आहे कि त्यावर लिहावे तितके कमीच आहे .
मनापासून आभार !!!