कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ (भाग - १)


कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
(भाग - १)

कधीही न पाहिलेले,अनुभवलेले, विचारांच्या पलीकडचे वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर.
हा माझ्यासाठी प्रवास होता , क्षण होते , अनुभव होता , सेवा होती नक्की काय होते हे शब्दांत सांगणे कठीण.
पण जे होते ते फक्त अदभुत होते ,अविस्मरणीय होते.
आता तुम्ही म्हणाल कित्येक ठिकाणी आरोग्य शिबीर होतात मग ह्यात काय एवढे वेगळे ?
कारण हे फक्त शिबीर नसून हे सेवा शिबीर आहे . इथे मला "सेवा" ह्या शब्दाचा खास उल्लेख करावासा वाटतो कारण ,
अत्यंत निरपेक्ष भावनेने,अत्यंत प्रेमाने केले जाणारे कार्य म्हणजेच
"कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर"

मी स्वतः ह्या शिबिरासाठी पहिल्यांदा गेले होते.
खूप श्रद्धावान स्नेहयांकडून शिबिराबद्दल ऐकून होते , photos पाहिले होते परंतु
ऐकणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे ह्यातला फरक मला शिबिराला गेल्यावर समजला.
Shree Aniruddha Upasana Foundation ,
Dilasa Medical Trsut and Rehabilitation Center
Shree Aniruddha Aadesh Pathak
SHhreeguru Upasana Foundation
Aniruddha's House of Freinds
ह्यांच्या सयुंक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले जाते .
ह्या वर्षीच्या शिबिराची तारीख होती १ फेब्रुवारी २०१५ ते २ फेब्रुवारी २०१५.
२ दिवसांच्या ह्या शिबिरामध्ये मला आलेले अनुभव , शिबिराचे स्वरूप , वेगवेगळ्या श्रद्धावानंसोबत केलेली चर्चा ,
गावकरी,लहान मुले ह्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा हे सगळे मी तुमच्याबरोबर share करणार आहे .
शिबिरात भेटलेल्या खूपशा स्थानिक स्वयंसेवकानकडून तसेच काही श्रद्धावान स्नेह्यांकडून ह्या शिबिराची खूप माहिती मिळाली.
आणि ह्या सगळ्यामधून ५-६ वेगवेगळ्या भागांमधून कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर ह्याची माहिती देण्याचा प्रयास आहे .
मी खूप ऋणी आहे देवा तुझी  कि मला ह्या कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबिराच्या सेवारूपी महासागरातला  एक थेंब होण्याची संधी दिलीस.

कोल्हापूर शहर म्हणजेच करवीर नगरी ,आपल्या महालक्ष्मी आईचे पवित्र स्थान.
ह्याच करवीर नगरीतील शाहुवाडी तालुका आणि त्यामधले  पेंडाखळे हे गाव आणि तसेच आसपासची अनेक लहान लहान गावे.
हे शिबीर इथे सुरु होण्याआधी काही वर्षांपूर्वी दैनंदिन गरजेच्या गोष्टी , मुलभूत सोयी - सुविधा सुद्धा इथे उपलब्ध नव्हत्या . देवदासी सारख्या रूढी होत्या .
अस्वच्छता, क्षिक्षणाचा अभाव ,पाणी,वीज ह्यांची कमतरता आणि ह्या सगळ्यापेक्षाही बिकट परिस्थिती होती.
आणि
आता  चित्र पूर्णपणे पालटले आहे .आमुलाग्र असा बदल इथे पहायला मिळतो .

हे शिबीर २ भागांत विभागलेले असते.

1 st Day Of Camp

2 nd Day Of Camp









१ ल्या दिवशी नजीकच्या गावांमध्ये आरोग्यविषयक गोष्टी ,साड्या , खेळणी , कपडे इ. गोष्टींचे वाटप केले जाते .
आणि २ ऱ्या दिवशी camp site वर medical camp आणि अन्नपूर्णा महाप्रसादम चे आयोजन असते .
आसपासच्या गावातील हजारो गावकरी आणि मुले इथे येउन आपल्या शरीराची तपासणी करून घेतात.

ह्याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे घेऊच .
हे सगळे पहिले कि कळते
हे कोणा एकट्या व्यक्तीचे काम नाही.
तर हे Team Work आहे
संघशक्ती चे उत्तम उदाहरण म्हणजे "कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर " !!!
उच्चस्तरीय management companies ला पण थक्क करून सोडेल असे
उत्कृष्ट पद्धतीचे व्यवस्थापन !!!

वर पाहता शिबीर फक्त २ दिवसांचे असते परंतु त्या मागची मेहनत संपूर्ण वर्षभराची असते .
"पूर्वतयारी " ह्या पुढच्या भागात आपण ह्याबद्दल सविस्तर जाणून घेऊच .
एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ह्या शिबिरामध्ये नुसते उरकून द्यायचे आहे असा भाव कुठेही नसतो .
प्रत्येक स्वयंसेवक अतिशय प्रेमाने ,मनापासून ह्या सेवा शिबिरामध्ये स्वतःला झोकून देतो .
निर्मळ मनाने , निरपेक्ष भावनेने आणि प्रबळ इच्छाशक्तीने केलेले प्रत्यके कार्य हे उत्तम आणि यशस्वी होतेच !!!
ह्या शिबिरात पाहिलेल्या कित्येक गोष्टी ने तोंडात बोट घालायची वेळ येते.
कुठेही बेशिस्त नाही , धक्का बुक्की नाही , वाद-विवाद नाही , कसलीही गैरसोय नाही , कुठलाही त्रास नाही.
खरच हे सगळे पहिले कि काय म्हणावे तेच सुचत नाही .
जागोजागी दिसतात ते फक्त सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे निष्ठावान कार्यकर्ते !!!
हा चमत्कार आहे , हि जादू आहे , तर नाही
हे फक्त प्रेम आहे
फक्त प्रेम !!!

सगळीकडे पहायला मिळते ते फक्त चैतन्य !!!
मी पाहिलेला , अनुभवलेला , मनाला भावलेला , येणाऱ्या प्रत्येक वर्षी पुन्हा पुन्हा ओढ लावणारा हा Kolhapur Medical and Healthcare Camp
तुमच्या पर्यंत पोहण्याचा हा एक छोटासा प्रयास . आशा करते कि तुम्हाला माझा हा प्रयास आवडेल .
उद्यापासून रोज आपण टप्प्या टप्यांमध्ये ह्या शिबिराची माहिती घेणार आहोत .
मग भेटूया उद्या !!!

http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/p/blog-page.html

 क्रमश: ...

सुप्रिया नार्वेकर

7 comments:

  1. सुप्रिया, खूपच अनोख्या पध्दतीचे हे कोल्हापूर वैद्यकीय शिबीर असावे ह्याचा अंदाज आपला लेख वाचून आला. निर्मळ मनाने , निरपेक्ष भावनेने आणि प्रबळ इच्छाशक्तीने केलेले प्रत्यके कार्य हे उत्तम आणि यशस्वी होतेच !!! हे आपले मत अगदी मनाला तंतोतंत पटले आणि भिडलेही. आपल्या पुढील लेखांतून ह्या शिबीराविषयीची परिपूर्ण माहिती जाणून घेण्याची उत्कंठा वाढली आहे. लवकरच तेही लेख वाचायला मिळतील अशी आशा बाळगते.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much.
      मी माझ्याकडून पूर्ण प्रयास करेन शिबिरासंदर्भात
      परिपूर्ण शिबिरासंदर्भात माहिती देण्याचा .

      Delete
  2. khupach chan lihila aahe supriyaveera... waiting for more...!!! ambadnya

    ReplyDelete
  3. Punhaa Ekdaa Kolhapur Medical Camp Lekhaatuun Anubhwaylaa milnaarrr .... Yessssss lots of Ambadnyaa Jai Jagdamb Jai Durge....

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की तृप्ती.
      कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबिरातले ते दोन दिवस म्हणजे आयुष्यभर साठवण्याची पुंजी आहे .
      Thank you so much for your feedback.

      Delete
  4. Nice experience given u 2, helpfully others.

    ReplyDelete