जागतिक जल दिन



 जागतिक जल दिन 
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी

कवी बा. भ. बोरकरांची वाचनात आलेली हि कविता .पाण्याचे महत्त्व सांगून जाते .
आजकाल आपण मोठ्या उत्साहाने आपले सगळे सण समारंभ, वेगवेगळे days साजरे करतो . पण ज्याला "जीवन " असे नाव दिले तो "जागतिक जल दिन " आपणअगदी सहजरीत्या विसरलो .
शाळेत असताना "पाणी वाचवा " ह्यावर निबंध लिहायचो. तेव्हा त्याचे महत्त्व तितकेसे कळले नाही .पण आज या वर्षी संपूर्ण भारतभर दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.सध्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.पूर्वी मराठवाडा आणि विदर्भातच दुष्काळ पडत असे.परंतु या वर्षी पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसलेला आहे.



त्या निबंधाची खरी व्याख्या आज कळते आहे .
गुण मिळवण्यापुरताच काय तो पाणी वाचवण्याचा अभ्यास .
पाणी वाचवण्याच्या निरनिराळ्या पद्धती ह्या फक्त वही मध्येच मर्यादित राहिल्या .
माझ्या कडून सुद्धा काही वेळी पाण्याचा अपव्यय होतो पण आजपासून तो कटाक्षाने टाळणार.
कालच एका मराठी कार्यक्रमात एका व्यक्तीचा उल्लेख केला गेला "अबीद सुरती " म्हणून जे वयाच्या ८० व्या वर्षी मुंबई मधील वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन, परवानगी घेऊन ,आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्लंबर घेऊन नळांची गळती दुरुस्त करतात .खूप कौतुक वाटले ऐकून .
जर वयाच्या ८० व्या वर्षी ते एवढा विचार करू शकतात तर आपण का नाही ?
कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात हि स्वतःपासून करावी .
दैनंदिन जीवनात आपण किती पाण्याचा अपव्यय करतो . 

आंघोळीपासून, कपडे भांडी , गाडी धुणे हे आणि बरंच काही .
हे आपण टाळू शकतो .
सध्या लग्न कार्य किंवा इतर समारंभात पाण्याचे बंद ग्लास दिले जातात आणि मग कित्येक वेळा २ घोट पिउन ते फेकून दिले जातात . 

किती प्रमाणात पाणी वाया जाते . 
हेच जर का आपण बंद पाण्याचे नळ असलेले कॅन आणि ग्लास ठेवले आणि प्रत्यकाने गरजे इतकेच पाणी घेतले तर काही प्रमाणात आपण  पाण्याचा अपव्यय टाळू शकतो आणि स्वच्छतेची चिंता नाही . 

 भारतीय संस्कृतीमध्ये आपण गंगा , नर्मदा ,गोदावरी ,कृष्णा माई ह्यांना पवित्र मानतो , त्यांची पूजा करतो परंतु त्याच नद्यांचे होणारे आणि वाढते प्रदूषण हि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे . 

आपण तलाव ,नदी समुद्र ह्यांच्या बाजूला निर्माल्यासाठी कलश ठेवलेले पाहतो परंतु तरीही काही चुकीच्या अंधश्रद्धेपोटी कित्येक जण पाण्यामध्येच विसर्जन करतात. 

इको -फ्रेंडली ऐवजी प्लास्टर ऑफ परिस च्या मुर्त्या वापरून आपण जल प्रदूषणात भर घालतो .
होळी - रंगपंचमी ह्या दिवशी कित्येक लिटर पाणी आपण वाया घालवतो .
ह्याचा अर्थ सण साजरे करू नये असा नाही तर सुक्या रंगानी सुद्धा आपण होळी खेळू शकतो .पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न करता साजरे करणाऱ्या प्रत्येक सणाचा आनंद हा खूप लाख मोलाचा असेल .
कित्येकदा आपण आदल्या दिवशीचे पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देतो आणि ताजे पाणी भरतो परंतु हे करत असताना फक्त विचार करा कि अनेक गावांमध्ये एक हंडा पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागते.



आपण पाणी वाचवण्यासाठी नवनवीन तंत्र विकसित करतो पण ती प्रत्यक्षात उतरायला मात्र वर्षानुवर्षे निघून जातात . त्यापेक्षा प्रत्येकाने जर पाणी जपून वापरण्याचे ठरवले आणि पाण्याचा अपव्यय टाळला तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच मोठ्या प्रमाणावर पाणी बचत करू शकतो. झाडे लावण्यापासून ते कुपनलीकेपर्यंत अनेक पर्यायाने जल संवर्धन करता येऊ शकते . 
पाणी हा आज पृथ्वीवरील जीवनावश्यक घटक आहे.प्रत्येक जीवाला पाणी हे अत्यावश्यक आहे .हेच जर असेच सुरु राहिले तर पाण्यावरून पुढील काळात संघर्ष पहावयास मिळतील.त्यामुळे पाणी जपून वापरणे व पाण्याचा अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.
आपण सगळीकडे स्त्री साक्षरता , प्रौढ साक्षरता मोहीम पाहतो . पण खऱ्या अर्थाने आता जल साक्षरता मोहीम राबविण्याची खरी गरज आहे .
आज जागतिक जल दिनानिमित्त आपण प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळण्याची प्रतिज्ञा करूया.
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे "
-सुप्रिया नार्वेकर 

happy Valentines Day !!!

Happy Valentines Day

शाई -Printing Industry ची नस

Ink

    शाई -Printing Industry ची नस

लहानपणी शाळेत असताना आम्हाला तिसरी आणि चौथीला निबंध लिहिण्यासाठी फक्त शाईचे पेन वापरण्याचे बंधन होते. मग काय सुबक अशी दौत आणि त्याबरोबरचे ते शाईचे पेन .
ink bottle

निराळेच अप्रूप होते ते !!!
शाईचा संबंध काय तो एवढाच .
पुढे पेन आणि पेनाची रिफील इतकंच काय ते शाईचे दैनंदिन व्यवहारातील येणे जाणे.
पण पुढे जेव्हा नोकरी संदर्भात printing क्षेत्रात आले तेव्हा शाईचे महत्त्व लक्षात आले .
छोट्याश्या दौतीमधल्या शाईची उत्क्रांती वाखाण्याजोगी आहे .
थोडासा इतिहास पहिला तर-
पूर्वी जास्त प्रमाणात काळ्या रंगाच्या शाईचा वापर केला जात असे.
चांगल्या दर्जाच्या लाखेचा वापर करून त्यावर रासायनिक पक्रिया करून शाई बनवली जात असे.
दिव्यांच्या काजळीचाही शाई म्हणून वापर केला जात असे.
त्याचबरोबर गेरू , कुंकू , हळद हेसुद्धा पर्याय उपलब्ध होते .
विचार करा जर शाईचा शोध लागला नसता तर काय आपण दगडांवर रेघोट्या ओढत बसलो असतो का ?
२१ व्या शतकात आहे का ते शक्य ?
शाई आणि तिचे प्रकार हे तांत्रिकदृष्ट्या पहायला गेलो तर फार किचकट आहेत .
म्हणून शाई मधले काही खास प्रकार आपण पाहू .
सर्वसामान्यपणे वापरात येणारी प्रिंटींगची प्रक्रिया म्हणजे ऑफसेट प्रिंटींग.
ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये ३ प्रमुख घटक असतात .
१) पिगमेंट
२) वेहिकल
३) मोडिफायर 

ह्याची थोडक्यात ओळख करून घेऊ
१) पिगमेंट
साधारणत: पिगमेंट २ प्रकारचे असतात .
i ) ओरगानिक पिगमेंट -
हे काळी शाई बनवण्यासाठी कार्बन पासून तयार केले जाते .
ii ) इनओरगानिक पिगमेंट -
वेगेवेगळ्यारंगांच्या शाई बनवण्यासाठी हे वापरले जाते
२) वेहिकल -
हे असे द्रव्य आहे जे पिगमेंटचे कण घट्ट धरून ठेवते आणि कागदावर नेण्यास सहकार्य करते .
३) मोडिफायर
हा असा घटक आहे जो शाई सुकण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो त्याचप्रमाणे शाईला येणारा वास आणि रंग पसरणे ह्याला प्रतिकार करतो'
 
आपल्या नजरेत कधी आले असेल एखादी लग्नपत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका असते त्याला
एक सुगंध येतो . हि कमाल शाईचीच.
Fragrance  Ink असे सर्वसामान्य भाषेत संबोधले आहे .
ह्या शाईमध्ये Fragrance Oil वापरले जाते .
Printing ची  पूर्ण झाल्यानंतर ह्या oil चा वापर केला जातो .
अजून खास म्हणजे -
कधी कधी काही चित्र आपल्याला सामान्य प्रकाशात दिसत नाहीत पण त्यावर ultra - violet rays चा प्रखर मारा झाला किंवा सूर्य प्रकाशाशी थेट संबंध आला कि दिसून येतात . हि कला सुद्धा शाईचीच.
ह्यामध्ये back-light ink वापरली जाते .
तुम्ही कधी जादूचा मग पहिला आहे का ?
बाजारात आता सहज उपलब्ध होतात .
मला माझ्या office मधून गिफ्ट मिळाला आहे …
हा मग बाहेरून पूर्णपणे काळा असतो .
पण जेव्हा तुम्ही त्यामध्ये गरम चहा किंवा पाणी ओतता तेव्हा हळूहळू त्यावरील चित्र दिसायला सुरुवात होते .
हि जादू आहे एका विशिष्ट प्रकारच्या शाईचीच.
magic mug
ती म्हणजे Oxidised Ink .
असा हा जादूचा मग आपल्या प्रियजनांना किती आनंद देईल .
खोलात शिरलो तर खूप माहिती आहे आणि थोडी क्लिष्ट सुद्धा .
ह्या लेखामुळे सर्वांना शाईचे महत्त्व मात्र नक्कीच कळेल .

सुप्रिया नार्वेकर 

Road Safety

article


Road Safety

३१ जानेवारीची रविवारची सकाळ हि मुंबईसाठी वेगळीच होती .
पहाटे ६ वाजल्यापासून western express highway वर  bikes ची धाव दिसत होती . 
निमित्त होते.
आपल्या RTO तर्फे  "ROAD SAFETY RALLY 2016 "चे आयोजनचे.
लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ला सुद्धा ह्याची नोंद घ्यावी लागली इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या प्रयासांना यश मिळाले.
मीसुद्धा ह्या  "Rally" चा एक भाग होते.
खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी .
ह्या rally चा  मुख्य उद्देश होता सुरक्षा !!!
कोणाची ???
तुमची ,आमची,आपल्या कुटुंबाची,आपल्या मित्र परिवाराची ,
म्हणजेच आपल्या समाजाची .
आजच्या काळामध्ये प्रवास हा महाग झाला आहे .
पैशाने पण खऱ्या अर्थाने म्हणायला गेलो तर आपल्या जीवाच्या किमतीने .
रोज आपण वर्तमानपत्र , दूरदर्शन ह्यामध्ये बातम्या वाचतो . निदान एकतरी बातमी हिअपघाताची असते .
परंतु आपल्या बाबतीत घडले नाही ना मग परमेश्वराचे आभार मानून नजरेआड करून आपण विसरतो .
पण ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे त्याच्याशी खेळण्याचा आपल्याला काय अधिकार ?
किंबहुना आपल्या चुकीमुळे दुसऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा आपल्याला काय अधिकार ?
RTO आयोजित केलेल्या ह्या Rally मध्ये काही गोष्टी ह्या सतत सांगितल्या जात होत्या .
हेल्मेट घाला ,
ते पूर्णपणे बंद असू द्या ,
पायामध्ये शूज असले पाहिजे ,
गाडीचे आरसे हे असलेच पाहिजेत आणि तेसुद्धा व्यवस्थितच पाहिजेत.
गाडी चालवताना सीट बेल्ट हे प्रत्येकासाठी आवश्यकच आहे .
गाडीचे license मिळवताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात पण त्या किती प्रमाणात कटाक्षाने पाळल्या जातात हे माहित नाही .
दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे कमी न होता वाढतच जात आहे .
ह्यामागचे गांभीर्य आपण सहज नजरेआड करतो .
वाहतुकीचे नियम हे फक्त कागदोपत्री न राहता ते अमलात पण आणले गेले पाहिजे.
रस्त्याने जाताना आपण ठिकठिकाणी वाहतूक सुरक्षा चे फलक पाहतो .
RTO कडून नेहमी सेमिनार आयोजित केले जतात .
दूरदर्शन वर जाहिराती प्रसारित केल्या जातात .
पण आपल्या सुरक्षेसाठी कोणी काही सांगावे किंवा करावे ह्याची वाट का बघा.
सुरुवातीला दुचाकी चा विचार करूया .
काही गोष्टी ह्या आपण वारंवार ऐकतो पण त्यामागचा हेतू काय असतो ते आपण बघूया .
पहिले म्हणजे सगळ्यांनाच परिचयाचे असलेले हेल्मेट.
ते फक्त दुचाकी चालवण्यासाठी नाही तर मागे बसणाऱ्यासाठी सुद्धा तितकेच बंधनकारक आहे .
आणि तेसुद्धा पूर्णपणे बंद .
खूप वेळा दुचाकी वर मागे बसलेली व्यक्ती हि हेल्मेट घालत नाही.
पण अपघातांचे प्रमाण पाहता चालवणाऱ्यापेक्षा मागे बसलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे .
त्यामुळे प्रत्येक वाहकाने हि स्वताची जबाबदारी समजून आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी. 
जर आपल्याला अपघात झाला तर जास्त प्रमाण हे डोक्यावर आघात
होण्याचे असते आणि जर हेल्मेट नसेल तर मृत्यूची शक्यता जास्त असते .
त्याचप्रमाणे ते बंद असण्याचे कारण असे कि चालवताना धूळ डोळ्यात जाऊन आपल्याला दिसू नये अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि अपघात होऊ शकतो .अजून एक महात्त्त्वाची गोष्ट म्हणजे बंद हेल्मेट आपली मानेची शीर सुरक्षित ठेवते .
त्यामुळे जर अपघात झाला तर आपला जीव वाचू शकतो .
दुसरी गोष्ट जी अगदी सहजपणे दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे
शूज .
खूप वेळा आपण चप्पल , मुली उंच खोटांचे बूट घालून दुचाकी चालवताना पाहतो .
पण खरे पाहता बाईकच्या लीवरची रचना हि बुटांच्या आकारानेच केलेलि असते .
आणि चालवताना खडे लागून आपल्याला ईजा होऊ नये हाही एक त्यामागचा उद्देश.
म्हणून दुचाकी चालवताना शक्यतो शूजच वापरावे .
हेल्मेट आणि शूज हेसुद्धा जर उत्तम दर्जाचे असतील तर चांगले .
तिसरी गोष्ट सिग्नल .
सिग्नल तोडणे हे म्हणजे अगदी रोजचेच झाले आहे .
पण ते तोडून आपण आपलाच आणि आपल्याबरोबर इतरांचा जीव सुद्धा धोक्यात घालतो .
चौथी गोष्ट वेग .
घाई हि प्रत्येकालाच असते .
पण आपल्या जिवापेक्षा नक्कीच जास्त नाही ना ???
अजून काही गोष्टी आहेत त्या म्हणजे जर दुचाकी चालवताना आपण jacket आणि gloves घातले तर ते केव्हाही चांगले असते .
jacket जेव्हा आपण चालवत असतो तेव्हा वाऱ्याचा आपल्या शरीरावर होणारा थेट प्रभाव हा रोकण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्याला थकवा येत नाहीआणि gloves हे आपल्या हातांचा धुळीपासून सांभाळ करतात, त्याचप्रमाणे चालवताना जर आपल्याला घाम आला तर आपली बाईक वरची पकड सैल होऊ शकते. म्हणून शक्यतो ह्या गोष्टी असणे चांगले. helmet, jacket आणि gloves हे सोडले तर हे सारे नियम  चार चाकी गाडीसाठी सुद्धा तितकेच बंधनकारक आहेत.
गाडीमध्ये seat belt हे प्रत्येकासाठी असतात फक्त लावले किती जातात हे प्रत्येकाला माहित .
ह्या सर्व गोष्टींबरोबर काही गोष्टी ह्या महात्तावाच्या आहेत ते म्हणजे
कोणतेही वाहन चालवत असताना mobile वर न बोलणे ,
कानात headphone लावून गाडी न ऐकणे आणि आपल्याबरोबर driving license आणि गाडीची सर्व कागदपत्रे नेहमी असणे .
जेणेकरून आपण अपघातांना आळा घालू शकतो आणि जर अपघात झालाच तर असलेल्या कागदपत्रांमुळे आपली ओळख पटणे आणि आपल्या कुटुंबाला आपली माहिती कळवणे सोयीचे होते .
हे सर्व जर प्रत्येक वाहकाने काटेकोर पणे पाळले तर पुढे येणाऱ्या वर्षात अपघातांची संख्या आपण नक्कीच कमी करू शकतो.
कारण अपघाताने आपण स्वतःचे , आपल्या कुटुंबाचे नुकसान करतोच पण आपल्या आणि सरकारच्या property चे पण नुकसान करतो .
आपल्यापैकी कित्येक  जणांच्या फोन ला पासवर्ड असतो .
पण सहसा तो नसावा कारण आपल्या फोनमधून आपल्या निकटवर्तीयांना फोन करणे सोयीचे होते .
अजून एक खूप महत्तवाची सुविधा आपल्या सरकारकडून सुरु करण्यात आली आहे .
ती म्हणजे एका sms द्वारा तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती मिळू शकते.
त्यासाठी  
७७३८२९९८९९ ह्या नंबर वर
VAHAN space vehicle number हे type करून पाठवायचे आहे .
त्यावरून तुम्हाला तुमच्या गाडीची माहिती मिळते तुमच्या नावासकट .
आणि हे सर्वांनी लक्षात ठेवावे कारण जर तुमची गाडी नसले परंतु रस्त्याने जाताना तुम्हाला
अपघात झालेला दिसला तर आणि मालकाबद्दल काही माहिती मिळत नसेल तर ह्या सेवेद्वारे तुम्ही
ती माहिती मिळवू शकता .
आपण आपल्या समाजाचे देणे लागतो आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने सतर्क असणे आणि सगळे नियम काटेकोरपणे पाळणे हे अत्यावश्यक असते .
शेवटी आपला जीव हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा आहे .

सर्व जण पाळूया वाहतुकीचे नियम 
कशाला जवळ येईल मग तुमच्या यम

                                                                              -सुप्रिया नार्वेकर

नेताजी - एक निष्ठावान देशप्रेमी


नेताजी - एक निष्ठावान देशप्रेमी

आपण वाचत आलेल्या "प्रत्यक्ष मित्र "  मधील  "नेताजींच्या लेखमालेमधील" लेखांमधून नेताजींचे देशप्रेम हे किती सच्चे
होते ते कळते . पण नेताजींची हि देशप्रेमाची ओढ त्यांच्या वडिलांना म्हणजेच जानकीबाबूंना अस्वस्थ करीत होती. ते देशप्रेमाच्या विरोधात होते असे नाही परंतु फक्त पुत्र प्रेमापोटी ते नेताजींना ह्या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. कारणही तसेच होते.
ह्याच दरम्यान इंग्रजी साम्राज्यामध्ये अनेक बदल घडत होते. बंगालची फाळणी, कालाकत्त्या ऐवजी  दिल्लीला राजधानीचे स्थान आणि त्यासाठी नवी दिल्लीची स्थापना व्होइसरॉयच्या शोभायात्रेवर बॉम्ब फेक ह्या आणि बऱ्याच घटना. आणि त्यामुळेच जानकीबाबूंनी नेताजींना प्रेमळ शब्दांत समजावले कारण त्यांना माहित होते कि दमदाटी करून काहीच फायदा नाही. म्हणून जानकीबाबूंनी नेताजींना सांगितले कि "निदान शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी तू ह्या भानगडींमध्ये पडू नकोस."
त्यामुळे नेताजींचे बाहेर जाणे कमी झाले पण त्यांच्या वाचनामध्ये कोणाताही खंड पडला नाही.
त्यातच त्यांना कि जसे स्वामी विवेकानंद जींना श्री रामकृष्ण परमहंस यांसारखे गुरु लाभले तसेच आपल्याला सुद्धा आपल्या पुढील वाटचालीसाठी गुरूची आवश्यकता आहे आणि मग त्यांचा शोध सुरु झाला  तो गुरूंचा. आणि अशातच त्यांची मट्रीकची परीक्षा जवळ आली. आणि मग जानकीबाबूंची काळजी अधिकच वाढली, त्यांना वाटले हा काही हि परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य नाही. पण शेवटी ते नेताजी होते…
खऱ्या आणि सच्च्या प्रयासांना परमेश्वर यश देतोच . नेताजी दुसरे आले परीक्षेमध्ये. म्हणजेच एका निष्ठावान देशप्रेमी बरोबरच एक हुशार विद्यार्थी म्हणूनही नेताजी सगळ्यांसमोर आले .

- सुप्रिया नार्वेकर

संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/hindi-netaji-subhashchadra-bose-6/ )


नटसम्राट- एक अद्भुत कलाकृती



kusumagraj



नटसम्राट- एक अद्भुत कलाकृती

कुणी घर देतं का घर ???
एका तुफानाला कुणी घर देतं का घर ???
एक तुफान भिंतीवाचून
एक तुफान छपरावाचून
माणसाच्या मायेवाचून
देवाच्या दयेवाचून
डोंगराडोंगरात हिंडत आहे
जिथून , कुणी उठवणार नाही अशी जागा
धुंडतयं…
कुणी घर देतं का घर ???


कट्यार काळजात घुसली ह्यानंतर आमच्या पिढीला
अजून एक अद्भू आणि अपूर्व कलाकृती बघण्याचा
योग आला.
नाटक  चांगले कि चित्रपट ?
कोणी काम चांगले केले ?
ह्याची चर्चा करण्यापेक्षा  हि कलाकृती किती ताकदीची आहे हे महत्त्वाचे .

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज .
साहित्य म्हणजे फुलांची बाग .
ह्या बागेमध्ये विविध फुले आहेत आणि त्या फुलांमधले सर्वश्रेष्ठ असणारे म्हणजे वि वा शिरवाडकर म्हणून कुसुमाग्रज .

आमच्या पिढीला कुसुमाग्रज म्हटले कि आठवते -
शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकामाधली "कणा "  हि कविता .
पण आमच्या आधीच्या पिढीने अनुभवले ते
साहित्यातातले सर्वोत्कृष्ट नाटक आणि ते म्हणजे "नटसम्राट"!!!आणि आज ते ह्या नव्या पिढीला अनुभवायला आले .
एक दर्जेदार कलाकृती !!!
काळजाला भिडणारे संवाद !!!
समर्थ लेखनशैली !!!
अत्यंत नाजूक आणि भावूक विषयाची उत्तम पद्धत्तीने हाताळणी !!!
आणि म्हणूनच "नटसम्राट" हा मराठी रंगभूमीवरील अनेक नटवर्यांनी आपल्या दमदार अभिनायामधून अजरामर केलेला एक मैलाचा दगड ठरला .
ह्यामधला शब्द न शब्द म्हणजे हृदय चिरणारी कट्यार जणू !!!
"माझ्या डोळ्यात आसवं जमा होयला लागली ना तर खिळे मारून खाचा करून टाकीन पण रडणार नाही . "
डोळ्यांच्या पापण्या ओल्या करणारे लिखाण …
खरच कुसुमाग्रज म्हणजे ज्येष्ठ साहित्यक …
गणपतराव बेलवलकर म्हणजेच आप्पा आणि म्हणजेच नटसम्राट हि कलाकृती निर्माण करणारे
कुसुमाग्रज म्हणजे खरे साहित्य सम्राट !!!
आपले संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी वाहिले , कमावलेली सारी मिळकत खूप मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांवर उधळून टाकली. आणि त्याच्याच नशिबाने त्याची अशी थट्टा मांडवी ???
एक उत्कृष्ट कथानक कुसुमाग्रजांनी रसिकांसमोर आणले .
अजून एक संवाद -
काहीसा खालील आशयाचा
"नटाचे काम असे असले पाहिजे कि  समोर बसलेल्या रसिक प्रेशाकांच्या एका हातात वेफर्सचे पाकीट आणि एका हातात त्यातला एक वेफर्सचा तुकडा आणि तो तुकडा आणि तोंड ह्यामाधले अंतर हे तसच राहिले पाहिजे ."

काय म्हणावे ह्या शैलीला !!!
शब्द कमी पडतील .
शब्दांची सुरेख गुंफण .

"विधात्या तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला
विसरतोस .
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोके आदळायचे …

"कमावलेले सारे वैभव गुलालासारखे ह्यांच्यावर उधळले आणि त्याच मुलांच्या घरात आज बाप चोर ठरला ."

"नटाला रंगभूमी हि आईच्या गर्भाइतकीच सुरक्षित वाटते ."

"नियती जितकी कठोर तितकेच का नरम पडत जाते काळीज ???
भिनते वेदना रोमारोमात विचारीत जाब विवेकाला … "

"रत्नजडीत मुकुट उतरवताच का उघडे पडावे कपाळी कठोर प्रारब्ध
नि व्हावी जखम वाहती
मायेचा कणभर ओलावा मागण्यास झोंबत भळभळत्या भावनेचा एकाच सवाल
"जगावं कि मरावं हा एकंच सवाल "

"लंगड्याला काय सांगतोस रे हरवलेल्या चपलेचे दु:ख"

चित्रपट पहाताना प्रत्येक संवाद कागदावर उतरवून घ्यावेसे वाटत होते …
अफाट लेखन सामर्थ्य !!!
नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि बेघर वृद्ध हे सर्व एका कथानकात रेखाटणे
हे कौतुकास्पद आहे .
आणि आता आलेल्या ह्या चित्रपटात सुद्धा हे सुंदर चित्रित केले आहे .
नाना आणि विक्रम गोखलेंच्या प्रत्येक अभिनयाची जुगलबंदी वाखाण्याजोगी आहे .
कुठेही भडकपणा नाही .
अर्थपूर्ण संगीत
प्रसंगानुरूप हास्य विनोद आणि शिव्या सुद्धा …
सर्वकाही एकेमेकांत गुंफलेले !!!
चित्रपट संपल्यानंतर डोळ्यांत पाणी घेऊन अशा दर्जेदार कलाकृतीला सलाम करीत
प्रत्येक रसिक प्रेक्षक exit घेतो  
अशा ह्या साहित्य सम्राटाला "कुसुमाग्रजांना " मानाचा मुजरा !!!
To be or not to be that
is the question !!!

-सुप्रिया नार्वेकर




नवीन वर्ष आणि संकल्प


                     " नवीन वर्ष आणि संकल्प" 

२०१५ सरले , २०१६ आले …
आजपासून नवीन वर्षाची सुरुवात !!!
खरे पाहता नवीन वर्ष म्हणजे ,
एका नव्या वाटेची सुरुवात ,
एका नव्या चक्राची सुरुवात ,
एका नव्या दिशेची सुरुवात,
एका नव्या ध्येयाची सुरुवात ,
आणि नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे ह्या सगळ्यांचा केंद्रबिंदू !!!
तसे पहायला गेलो तर आधीच्या वर्षाच्या अखेरीस सारेच जण येणाऱ्या नवीन वर्षासाठी संकल्प करतात .
नवीन वर्ष चालू झाले कि कटाक्षाने पाळलेसुद्धा जाते आणि नंतर हळूहळू आज नको , उद्या करू,
उद्या आला कि परवा आणि मग तेरवा अशी गाडी रुळावरून सरकते .
आणि वर्षाच्या अखेरीस केलेल्या संकल्पाचा आलेख उतरत्या क्रमाचा दिसतो .
मग पुन्हा येणाऱ्या वर्षासाठी नवीन संकल्प आणि पुन्हा त्यात खंड हे समीकरणच होऊन बसते .
खरे पाहता संकल्प म्हणजे काय ?
तो का करावा ?
त्याने काय साध्य होते ?
हे समजले तर केलेल्या संकल्पामध्ये कधीच खंड पडणार नाही .
"संकल्प" म्हणजे एक सुंदर असे रोपटे आहे ज्या रोपट्याला नियमितपणे उत्साहाने जिद्दीचे पाणी घातले तर त्या इवलाश्या रोपट्याचा
यशाचा एक मोठा वृक्ष तयार होतो आणि तो समाधानाच्या फांद्यांनी आणि आनंदाच्या फळांनी बहरतो .
कारण जिथे यश आहे तिथे आनंद आणि समाधान आहे .

संकल्प हा मोठा असावा कि लहान  ?
वयोमर्यादा काय ?
असे कोणतेही मोजमाप नाही .
तो कुठल्याही पातळीवर असू शकतो .
वैयक्तिक , सामाजिक , अध्यात्मिक इ .
उदाहरणार्थ स्वतःला चांगल्या सवयी लावणे हा वैयक्तिक पातळीवर ,
समाजकार्य करणे हा सामाजिक पातळीवर तर ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर आयुष्य दिले
त्याचे अधिकाधिक नामस्मरण करणे , उपासना करणे हे अध्यात्मिक पातळीवर .

संकल्पासाठी कोणतेही बंधन नाही ,
आवश्यकता आहे ती म्हणजे फक्त "प्रबळ इच्छाशक्ती "ची !!!
जर मला माझे ध्येय गाठायचे असेल तर माझी इच्छाशक्ती इतकी प्रबळ हवी कि मग त्या संकल्पामध्ये कधीही खंड पडणार नाही .
फक्त एक महत्त्वाचे कि आपल्या संकल्पामुळे इतरांना त्रास होणार नाही हेही तितकेच महत्त्वाचे !!!
संकल्प हा नेहमी "धावण्याच्या शर्यतीसारखा" असावा . जो वेग , जी उर्जा शर्यत सुरु झाल्यावर असते तेवढीच किंबहुना प्रत्येक टप्प्यावर त्यामध्ये
अधिकाधिक वाढ होते ती शर्यत संपेपर्यंत . कारण आपले ध्येय समोर असते.

म्हणून संकल्प करण्याआधी आपले ध्येय निश्चित करणे तितकेच महत्त्वाचे !!!
संकल्पामध्ये खंड न पाडण्यासाठी एक सोपा उपाय आहे .
रोज सकाळी उठल्यावर diary मध्ये संकल्प्य म्हणजेच निश्चित केलेले ध्येय लिहावे आणि रात्री झोपताना
"मी केलेला संकल्प आज नियमितपणे पाळला ." हे लिहावे .
हि गोष्ट तुम्हाला उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला संकल्प पाळण्याची नवीन उमेद देते .

मग करणार न खंड न पाडता संकल्प ???

आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे , अधिकाधिक यशाचे , चांगल्या आरोग्याचे आणि नियमितपणे संकल्प पाळण्याचे जावो …

-सुप्रिया नार्वेकर

SELF - HEALTH म्हणजेच आपले आरोग्य

dr.aniruddha joshi


"SELF HEALTH"  म्हणजेच "आपले आरोग्य "

"योग्य  खा आणि स्वस्थ राहा "
पण उत्तम आणि सुद्रुढ आरोग्याचा विमा उतरवला आहे ना ?
तसही हल्ली "mediclaim policy" ची फार चलती आहे .
सगळीकडे posters दिसतात लागलेले  policy चे .आणि खरे पाहता गरजच आहे त्याची .
आजारानांबरोबर त्यावर होणारा खर्चसुद्धा वाढला आहे .
वेगवेगळ्या आजारांच्या अजगराने सर्वत्र विळखा घातला आहे .
दैनंदिन जीवनात आपण किती हानिकारक पदार्थ खात आहोत ह्याची साधी कल्पनासुद्धा आपल्याला नाही .
खाण्याचा अनियमित  वेळा , चुकीच्या अन्नाचे सेवन , निरनिराळा ताण हे सारच आपल्या आरोग्याला घातक आहे .
नकळतपणे आपण हे सारे नजरेआड करतो.
मी काही वेगळी नव्हते .
पण म्हणतात ना "सोनारानेच कान टोचावे "
तसच झाले  गेल्या वर्षी १३ डिसेंबर ला .
कारण होते  डॉ. अनिरुध्द धैर्यधर जोशी  (एम . डि - मेडीसीन ) ह्यांचे "SELF - HEALTH " म्हणजेच "आपले आरोग्य "

ह्या विषयावर असलेले व्याख्यान .
अंधेरी स्पोटर्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर जेव्हा डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांनी बोलायला सुरुवात तेव्हा हजारोंच्या संख्येने जमलेला जन समुदाय
फक्त निशब्द होता . त्यांनी केलेले उचित आणि अत्यंत महत्तवपूर्ण मार्गदर्शन आणि तेही सामान्य माणसाला समजेल अशा शैलीमध्ये !!!
त्यामुळे प्रत्यके जण आपल्या आरोग्याबाबत सतर्क झाला .
दिवे लागणीच्या वेळी भगवंतासमोर हात जोडून म्हटली जाणारी  "शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा"
ह्या प्रार्थनेमधील "आरोग्यम् धनसंपदा" ह्या शब्दांचा  खरा अर्थ तेव्हा समजाला.
त्या व्याखानानंतर मी स्वतः माझ्यामध्ये बदल केले .
मला कॉफी पिण्याची फार सवय होती . एखादे डिझाईन करताना बाजूला कॉफीचा मग असायचाच . पण ह्या  व्याखानानंतर
दिवसाला ८-१० कप कॉफी पिणारी मी आता जास्तीत जास्त २ कप पिते आणि पुढे १ असा प्रयास चालू आहे .
सकाळी उशिरा उठणे आणि  त्यामुळे ऑफिसला लेट होईल म्हणून सहजरीत्या नाष्ट्याला नजेरेआड करणारी मी आता न चुकता खाते .
कारण  डॉ. अनिरुद्ध जोशी (बापू) ह्यांनी सकाळच्या नाश्ताचे महत्त्व पटवून दिले. कारण आपण साधारण रात्री ९ वाजता जेवल्या नंतर रात्री झोपण्यानंतरचा काळ आणि सकाळचा उठल्यानंतरचा काही वेळ आपल्या पोटात अन्न नसते. त्यामुळे नाश्ता केल्याने शरीराला उर्जा मिळते आणि त्यामुळे ताजेतवाने होण्यासाठी मदत होते. पण कोणताही नाश्ता नाही.
पौष्टिक नाश्ताच !!!
जसे इडली , आंबील , पोळ्या .
डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे उदाहरणासकट समजावून सांगितले .
उदाहरणार्थ साखर …
किती सहजरीत्या आपण ह्या न त्या कारणाने साखर ग्रहण करतो .
पण हि fructose ने भरलेली साखर किती हानिकारक आहे हे आधी माहीतच नव्हते .
आणि लगेचच त्याची जागा Dextrose ने घेतली आहे. ह्यामुळे साखर पूर्णपणे बंद झाली.
त्याचप्रमाणे तेल,तूप,चॉकलेट्स,बटर,सोयाबीन हे आणि बरच काही .
पण नुसताच योग्य आहार उपयोगी नाही .
योग्य आणि सकस आहाराबरोबरच योग्य व्यायाम आणि खेळ सुद्धा किती महत्त्वाचा आहे हे समजले .
आता मी घर -ऑफिस -घर ह्या मुळे थोडीफार का होईना थकत होते परंतु जरा मी
शाळेचे दिवस आठवले .
तेव्हा सकाळी शाळा मग gymnastic , योगा , शाळेतल्या वेगवेगळ्या activities आणि पुन्हा घरी आल्यावर अभ्यास हे सहरीत्या करत होते .
कधीही थकवा नाही आला .
पण आता बघितले तर ऑफिसमधून घरी आल्यावर कंटाळा येतो , थकायला होते हि वाक्ये सगळीकडून ऐकायला मिळतात .
आणि मग तेव्हा डॉक्टरांचे व्याख्यान ऐकले आणि पुन्हा एकदा योगा, व्यायाम , खेळ ह्यांचे महत्त्व पटले .
कामाचा ताण , कामाच्या जास्तीच्या वेळा , येण्याजाण्याची दगदग ह्या साऱ्यानेच एकंदरीत संपूर्ण शरीराचा ताळमेळच बदलतो , आणि तेव्हाच
योगा , खेळ , व्यायाम उपयोगी पडतात .
बारीक होण्यासाठी पट्टे कंबरेला लावणे ,जाड होण्यासाठी औषधे खाणे , वय लपविण्यासाठी हानिकारक सौंदर्य प्रसाधने वापरणे , असे कितीतरी अघोरी उपाय आपण स्वतः वर करतो .
आणि मग पुढे त्याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतात . मग भविष्यात ठेच लागण्यापेक्षा आधीच सावध झालेले केव्हाही चांगले ना  ???
शेवटी "precautions is always better than cure ."
डॉक्टरांच्या प्रत्येक वाक्यातून डोळ्यांवरची झापडे उघडली जात होती .
आणि हे काही फक्त आता आजार येऊ नये म्हणून  नाही , तर
आता घेतलेल्या चुकीच्या आहारामुळे पुढे उतारवयात अडचणी येऊ नये ह्यासाठी सुद्धा आहेच ना !!!
मग आत्तापासूनच काळजी घेतलि तर कुठे बिघडले .
Healthy असण्याची खरी व्याख्या तेव्हा समजली .
अजूनही वेळ नाही गेली .
मी तरी ठरवले आहे
" आपले आरोग्य जपायचे . भगवंताने दिलेली हि धनसंपदा सुखसंपदा करायची "
आणि माझ्या सद्गुरुंनी म्हणजेच डॉ. अनिरुध्द धैर्यधर जोशी (बापू )  ह्यांनी ती ह्या व्याख्यानाद्वारे कशी जपायची ह्याची मला आरोग्यकिल्लीच दिली . 
आणि आत्मविश्वासाने म्हणायचे "Yes! I Am Healthy and i will be ."
मी घेतलेला आणि आचरणात आणत असलेला हा अनुभव तुम्हीही घेऊ शकता . 
मग तुम्ही कधी म्हणणार असे ""Yes! I Am Healthy and i will be ."" ???? 

संदर्भ :-
डॉ. अनिरुध्द धैर्यधर जोशी  (एम . डि - मेडीसीन ) ह्यांचे "SELF - HEALTH " म्हणजेच "आपले आरोग्य "
ह्या विषयावरिल व्याख्यान  (१३ डिसेंबर २०१४ )
http://www.aarogyamsukhsampada.com/

- सुप्रिया नार्वेकर