Showing posts with label General Poem. Show all posts

Happy Womens Day


एक सलाम...

Indianarmysoldier

happy Valentines Day !!!

Happy Valentines Day

Sir A.P.J.Abdul Kalam Poem

Abdul Kalam


सर अब्दुल कलाम

भारत भूमी सांगून जाते
कलाम सरांची गाथा
सर्व संकटांनी टेकविला
त्यांच्या पुढे माथा

कुटुंब गरीब ,
परिस्थिती बिकट
आत्मविश्वासाने दूर केली
अडचणींची वाट

सकारात्मकतेचे बीज रोवुनी
घातले त्यास कार्यक्षमतेचे पाणी 
जिंकले सर्वांस स्वकर्तृत्त्वाने
वरी दिसता साधी राहणी

अभिमान वाटे साऱ्यांना
असे भारताचे हे सुपुत्र
भारत महासत्ता होणारच
ह्यांनीच रेखिले सुंदर चित्र

भारताच्या मनाच्या तुऱ्यात
रत्ने जरी अनेक
तरीही कलाम सरांसारखे
अनमोल रत्न मात्र एकच

अशा ह्या अग्निपंखाला
आमचा अखेरचा सलाम
सदैव आमच्या मनात
असतील आमचे
लाडके सर अब्दुल कलाम

                                                           - सुप्रिया नार्वेकर
                                                             बोरिवली - पूर्व


पावसा आता बरस रे जरा …

Paus Kavita

                                                   
पावसा आता बरस रे जरा …

वाढली उन्हाची काहली
सृष्टी सारी हैराण झाली
मेघा तुझ्या बरसू दे धारा
पावसा आता बरस रे जरा

मुके जीव पाण्याला सुकले
नदी ,तळे पाण्याविना आटले
कधी वाहणार पुन्हा एकदा झरा
पावसा आता बरस रे जरा

झाडेही आता शोधती सावली
चिमणी पाखरे कुठेतरी हरवली
कधी बहरणार हा परिसर सारा
पावसा आता बरस रे जरा

काळी आई बघतेय तुझी वाट
लेकरांना तिच्या तुझीच रे साथ
वाहू दे आता समृद्धीचा वारा
पावसा आता बरस रे जरा

मेघा तुझ्या बरसू दे धारा
पावसा आता बरस रे जरा

                                                                                                    -सुप्रिया नार्वेकर

माझ्या मनातला पहिला पाऊस...

Poem


माझ्या मनातला पहिला पाऊस...


माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
मनातल्या आठवणींसवे बरसणारा 

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
ओठांवर अलगद हसू आणणारा

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
डोळ्यांच्या पापण्या नकळत ओल्या करणारा

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा 
मिठीत तुझ्या हरवून देणारा

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
प्रेमात तुझ्या मला चिंब करणारा …


सुप्रिया नार्वेकर


प्रेम कशाला म्हणायचे?


तुझी माझी आठवण...

Tuzi Mazi Aathavan
  

Poem Published in Pratyaksha Newspaper on dated 
Saturday, 26th July 2014 



तुझी माझी आठवण

डोळ्यात तुझ्या
भाव गुंतलेले
पाहताच तुला
मन वेडे झाले

ओठ मिटले
शब्द थांबले
ओंजळीतूनी तुझ्या
प्रेम सांडले

मुक्या झाल्या दिशा
मुके झाले जग सारे
रात्रीस देती आज
तुझ्या स्वप्नांचे पहारे

अंगणी रातराणीचा 
बहर आला
तुझ्या प्रेमाचा
सुगंध त्यात दरवळला

चांदण्याच्या प्रकाशात
रात्र सरली
तुझी माझी आठवण
मनात मी कोरली


- सुप्रियावीरा नार्वेकर 

हमने बस प्यार करना सिखा ...

हमने  बस प्यार करना सिखा ...

मैत्री


मैत्री म्हणजे ,
आयुष्यभराची साथ 
धडपडताना  सावरणारा हात 

मैत्री म्हणजे ,
रणरणत्या उन्हातला गारवा 
सुख दुःखातला प्रेमळ गोडवा 

मैत्री म्हणजे ,
निरपेक्ष निखळ नात 
निर्मळपणे दोन जीवांना जोडत 

मैत्री म्हणजे ,
प्रेमाचा किरण 
अमुल्य असे क्षण 

मैत्री म्हणजे ,
जन्मोजन्मीचे बंध 
सुंदर असे ऋणानुबंध 


- सुप्रिया नार्वेकर

नाही कसे कळले, सूर कधी जुळले

 
नाही कसे कळले
सूर कधी जुळले 
प्रेमाच्या आपल्या 
गीत कसे बहरले 

प्रेमाच्या छेडील्या तारा 
गुंजतो बेधुंद वारा 
 आयुष्यभरासाठी आता 
तुझाच निवारा 

हरवले तुझ्या नजरेत 
फुलले तुझ्यासमवेत 
विसावले कायमची 
तुझ्याच कवेत 

प्रेमाचे आपल्या क्षण 
साऱ्या जीवनाची साठवाण 
जपली मनाच्या कोपऱ्यात 
तुझी माझी आठवण 

तुझ्या प्रेमसागराचा मी काठ 
नको सोडू कधी हात
मिटले जरी डोळे मी 
तरी देईन तुलाच साथ 

- सुप्रिया नार्वेकर