Diwali Rangoli

Devi

Radhakrishna

नेताजी - एक कडवा देशभक्त

Pratyaksh Mitra


  नेताजी - एक कडवा देशभक्त
भाग _२
जेव्हा "प्रत्यक्ष मित्र "  मधील "नेताजींच्या लेखमालेमधील" दुसरे सदर वाचनात आले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली , ती म्हणजे
बालवयात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना , आपल्यावर होणारे संस्कार ह्यानेच आपले आयुष्य घडते आणि
जगण्याची योग्य दिशा ,ध्येय आपल्याला साधता येते .
तसेच नेताजींच्या बाबतीत झाले .
नेताजींचे वडिल  "जानकीदास बोस " हे कटक शहरातील नामांकित सरकारी वकील होते आणि देशभक्त सुद्धा .
परंतु नेताजींवर खास प्रभाव पडला तो दोन व्यक्तिमत्त्वांचा .
त्यातले पहिले म्हणजे बेणीमाधव दास जे नेताजींच्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक होते आणि
दुसरे म्हणजे स्वामीजी अर्थात स्वामी विवेकानंद .
बेणीमाधव दास हे एक आदर्श शिक्षक तर होतेच पण त्याचबरोबर ते एक देशप्रेमीसुद्धा होते .
आणि त्यांच्याच स्वातंत्र्याच्या विधानांवरून नेताजी घडत गेले .
नेताजी जन्मतः च प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेले होते .
शालेय जीवनात तथा पुढील अभ्यासक्रमात ते अव्वल होते .
नेताजी हे जितके हुशार होते तितकेच ते निश्चयी होते .
ह्याची जाणीव मला "प्रत्यक्ष मित्र " मध्ये "नेताजींच्या लेखमालेमधील" दुसरे सदर वाचताना आलेल्या एका प्रसंगावरून कळली.
एखादी गोष्ट फक्त शिकायची म्हणून शिकायची हा त्यांचा स्वभावाच नव्हता .
तर त्याचा सखोल अभ्यास करून ती आत्मसात करणे हा नेताजींचा स्वभाव होता.
आणि म्हणूनच यश त्यांच्या पाठी नाही तर त्यांच्या बरोबर प्रत्येक पावलात उभे राहिले .
आणि ह्यात भर पडली ती स्वामीजींच्या म्हणजेच स्वामी  विवेकानंदजींच्या विचारांची …
आकार दिलेल्या मातीच्या भांड्याला जसे अग्नी पक्क करते तसच
देशभक्तीने झपाटून गेलेल्या नेताजींच्या विचारांना स्वामीजींच्या विचारांनी अधिक पक्क केले .

दिवसरात्र एक करून जिथून मिळेल तिथून स्वमिजींची पुस्तके आणून वाचून नेताजींनी आपल्या मधल्या स्वातंत्र्य प्रेमाच्या अग्नीमध्ये निखारे घातले .
आणि त्यानेच त्यांच्या जीवनाला एक नवे वळण मिळाले .
नेताजींच्या रूपात जणू काही भारतमातेला एक धडाडीचा , सच्चा , देशप्रेमाने झपाटून गेलेला,कडवा देशभक्तच लाभला.

संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र ( http://supriyanarvekar.blogspot.in/2015/11/netajisubhashchandrabose2.html )





नेताजी - एक दैदिप्यमान सूर्य




Pratyaksha mitra

  नेताजी - एक दैदिप्यमान सूर्य
भाग _१

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा। खून भी एक दो बूँद नहीं इतना कि खून का एक महासागर तैयार हो जाये और उसमें में ब्रिटिश साम्राज्य को डूबो दूँ ।''

लहानपणी शालेय अभ्यासक्रमात वाचनात आलेले नेताजींचे हे हृदयाला भिडणारे वाक्य !!!
रंगून येथील जुबली हॉल मध्ये नेताजींनी केलेले भाषण .

आझाद हिंद सेना, कॅप्टन लक्ष्मी हे सारे शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते .
पण दुर्दैवाने एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, एवढ्या मोठ्या चळवळीबद्दल फारसे अभ्यासक्रमात नाही.
पण जेव्हा "प्रत्यक्ष मित्र " मध्ये नेतेजींची लेखमाला चालू झाली , तेव्हा अतिशय आनंद झाला ,

कारण लहानपणापासूनच 
"The Great  Revolutionary Subhashchandra Bose " 
ह्यांच्याबद्दल मनात आदर आहेच  आणि तो ह्या लेखांमुळे
अधिकाधिक वाढत आहे . आणि योगमार्गावरून चालण्याची इच्छा ठेवणारे सुभाषचंद्र बोस "नेताजी " कसे झाले हे ह्या वेगवेगळ्या लेखमालिकांमधून  
वाचायला मिळते आहे .

आत्ताच्या पिढीने स्वातंत्र्य , क्रांतिकारक , चळवळ , आंदोलन , शहीद , कारावास हे सारे फक्त पुस्तकांमधून किंवा चित्रपटांमधून वाचले आहे आणि ऐकले आहे .
परंतु त्यावेळेच्या जनतेने काय सोसले असेल ह्याची जाणीव नेताजींचे खालील वाक्य वाचले कि कळेल
"मुझे वाकई बहुत मज़ा आ रहा है, एक गोरे अँग्रेज़ को मेरे जूतें पॉलिश करते हुए देखकर |’
कारण त्यावेळी परदेश तर सोडा पण भारतातसुद्धा मोठ मोठ्या हॉटेल आणि क्लब्जच्या बाहेर
"Indians and Dogs are not allowed" असे लिहिलेले असायचे .
म्हणजेच विचार करा केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना एका गोऱ्याला आपले बूट पॉलिश करताना बघून नेताजींना का नाही आनंद होणार !!!
काय हे प्रेम आपल्या मातृभूमीबद्दल !!!
आपल्या भारताबद्दल !!!

एका सुखवस्तू घरात जन्माला आलेल्या मुलाला आपले आयुष्य इतर मुलांसारखे मजा ,मस्ती करण्यात घालवता आले असते पण
म्हणतात ना "सूर्याच्या तेजाला कधी झाकून नाही ठेवता येत ."
तसच नेताजींचे झाले .
नेताजींवर खास प्रभाव पडला तो त्यांचे शिक्षक बेणीमाधव ह्यांचा .
देशप्रेम तर बेणीमाधव ह्यांच्या नसानसात ठासून भरले होते .
इथेच देशप्रेमाचे संस्कार नेताजींवर घडले गेले .
नेताजींच्या आझाद हिंद सेनेने तर ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडले 
होते.
ब्रिटिश प्रधानमंत्री ने दिलेल्या "रोग फैलता ही जा रहा है, " ह्या टिपणी वरूनच कळते.
 
स्वातंत्र्यचळवळी मधले एक दैदिप्यमान सूर्य म्हणून नेताजींना संबोधले तर वावगे ठरणार नाही .
Only the  good spirit man gives a good inspiration…



संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र ( http://www.newscast-pratyaksha.com/hindi/netaji-subhash-chandra-bose-01/ )

दिवाळी अन नात्याचे बंध






                      दिवाळी अन नात्याचे बंध

उठा उठा दिवाळी आली
मोती स्नानाची वेळ आली…
         हि जाहिरात खूपच प्रसिद्ध झाली. त्यावर खूप विनोदही झाले. अलार्म काका संपूर्ण मजल्याला उठवायचे परंतु वयोमानानुसार त्यांना शक्य नसल्यामुळे त्याच्या शेजारी राहणारा एक छोटासा मुलगा त्यांची परंपरा पुढे चालू ठेवतो. जर दिवाळी दोन शेजाऱ्यांमध्ये प्रेमाचा धागा निर्माण करू शकते 
तर सख्खी नाती किती घट्ट विणली जातील ???

    खरे पहाता सर्व सण, उत्सव हे नाती जपण्यासाठी असतात. वर्षाची सुरुवातच आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला ने करतो आणि वर्ष सरते ते सुद्धा दिवाळी सारख्या नाती फुलवणाऱ्या उत्सवाने !!!
ऑक्टोबरच्या उन्हाच्या काहीलीवारती दिवाळीचा सण आनंदाची, नव्या उत्साहाची फुंकर मारतो. दिवाळीचे हे दिवस म्हणजे सगळीकडे उत्साह, आनंद, चैतन्य आणि प्रेम!!!
सारा परिसर कंदील, रंगीबेरंगी दिव्यांची तोरणे ह्याने लखलखून निघालेला असतो. हा उत्साह फक्त बाहेरुनच नाही तर प्रत्येक घराघरांत दिसून येतो. ह्या उत्साहाला साथ असते ती प्रेमाची, प्रेमाने बांधलेल्या नात्यांची.
    आयुष्यभर जपलेल्या ह्या नात्यांचा एक सुंदर मेळ दिवाळीला आपल्याला दिसून येतो. आजही आम्ही भावंडे एकत्र येउन कंदील बनवतो आणि तो सुद्धा प्रत्येकाच्या सहभागाने. जसे एकाने कंदिलासाठी लागणाऱ्या काठ्या तासायाच्या, एकाने करंज्या बनवायच्या, एकाने सोनेरी पट्ट्या, गोंडे तर एकाने शेपट्या बनवायच्या. अशा प्रकारे हा प्रेमाची गुंफण झालेला सुंदर असा कंदिल आनंदाचा प्रकाश चोहिकडे पसरवतो. घरातली मंडळी जेव्हा एकत्र बसून फराळ बनवतात नं ते बनवताना होणारा कल्ला आणि एकदा का तो बनवून झाला की, मग त्यावर पडलेला फडशा…. ह्या साऱ्याची गम्मतच न्यारी असते. वर्षभर आपण सारे आपापल्या नोकरी, व्यवसायमध्ये व्यस्त असतो. पण दिवाळीची ही ३-४ दिवसांची सुट्टी संपूर्ण वर्षभराचा आनंद देऊन जाते.
    दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरातली मोठी  स्त्री म्हणजेच आई-आजी घरातल्या सर्व मंडळींना ओवाळते व उटणं लावते; त्यातून तीचे घरच्या लोकांवर असणारे प्रेम दिसून येते तर पाडव्याला घरातील सगळी मंडळी एकत्र बसून फराळ करतात. तर भाऊबीजेला इतर नातेवाईक एकत्र येउन साऱ्या भावंडांची धमाल नात्यांचे हे रेशमी बंध अजून घट्ट करते. दिवाळीचा फराळ सुद्धा आपल्याला नात्यांचा गोडवा जपायला शिकवतो. जसे लाडवाचा गोडवा, करंज्यांचा,खुसखुशीतपणा,शेव,चकली,चिवड्याचा तिखटपणा, शंकरापाळीचा कडक पण तितकाच गोडवा आपल्याला नाती जपायला सांगतो. रांगोळीचे विविध रंगांमध्ये नातीसुद्धा रंगून निघतात. म्हणून कितीही व्यस्त असलो तरी दिवाळी सर्वांना एकत्र आणते, भरभरून आनंद देते. नात्यांचे नवे बंध बांधतेच तर कधी हे बंध अधिक घट्ट करते.   
    मुळात हे वातावरणच इतके प्रसन्न असते की द्वेष, मत्सर, वाईट विचार ह्यांचा कुठे अंशही नसतो. असतो तो फक्त उत्साह, प्रेम, आनंद, चैतन्य… 
तुम्हा सर्वांना सुद्धा ही दिवाळी सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, चांगल्या आरोग्याची आणि
विशेषतः घट्ट प्रेमळ नात्यांची जावो हिच सदिच्छा !!!
कारण नाती टिकवायची नसतात ती जपायची असतात.
दिवाळी म्हणजे आनंद
दिवाळी म्हणजे उत्साह
दिवाळी म्हणजे चैतन्य
दिवाळी म्हणजे तेजोमय वातावरण
दिवाळी म्हणजे नात्याची गुंफण
दिवाळी म्हणजे प्रेमाचे बंधन

- सुप्रिया नार्वेकर

Printing Industry - कागद आणि त्याचे विविध प्रकार

Printing Industry - कागद आणि त्याचे विविध प्रकार



येरे येरे पावसा …
तुला देतो पैसा … 


हे गाणं ऐकले कि आठवत कागदाच्या होड्या करून कोणाची पहिली जाणार हे ओरडत खेळणारी मुले.
एक कागद हा त्या मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद आणू शकतो.
तसे पाहायला गेलो तर दैनंदिन जीवनात कागदाचा वापर आपण सर्रास करतो.
लिहिण्यासाठी वही,बिल,नोटा,तिकीट किंवा पास,सजावटीच्या वस्तू, बायोडेटा , झेरॉक्स , आमंत्रण पत्रिका  हे आणि बरच काही.
पण कधी हे पहिले आहेत का तुम्ही ???
दरवेळी हातात येणारे कागद हे वेगवेगळे असतात , म्हणजे काही जाडसर तर काही पातळ,काही लगेच फाटतात तर काही फाटत नाही .
शाळेत असताना रंगीबेरंगी घोटीव कागद आठवतात का तुम्हाला ?
किती कलात्मक वस्तू आपण करायचो त्याच्या !!!
त्याचबरोबर कार्ड पेपर,कार्डबोर्ड पेपर,जिलेटीन पेपर
(cellophane paper) ,क्रेप पेपर, काईट पेपर इ .
हे सगळे कागदच झाले ना ?
ह्याच कागदाने तुमची वस्तू आकर्षक केली आणि तुम्हाला उत्तम गुण सुद्धा दिले.



  


आपल्या वस्तूला साजेसा कागद आपण वापरत होतो .
आणि त्यामागचा उद्देश एवढाच असायचा कि  "आपली वस्तू हि सुंदर आणि आकर्षक दिसली पाहिजे ."
हि झाली मजेची गोष्ट.
परंतु खरचं एक साधा कागद ज्यावर तुम्ही तुमचा बायोडेटा लिहिता तो तुम्हाला नोकरी मिळवून देतो.
तुमच्या आनंदाच्या क्षणांची माहिती तुम्ही ह्याच कागदाने तुमच्या आप्तेष्टानपर्यंत पोहचवू शकता.
हाच कागद तुम्हाला तुमचे चलन मिळवून देतो.
हाच कागद तुमचे आनंदाचे क्षण photos च्या स्वरुपात तुमची सोबत करतो .
अशा ह्या कागदाची थोडक्यात माहिती आपण घेऊया.


अशाच पद्धतीने printing industry मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पपेर्स वापरले जातात . 

आणि त्यांतर्गत खालील प्रकार येतात .

उदाहरणार्थ xerox paper , art card paper , Coated Paper, Uncoated Paper , Silk Paper,  Ivory Paper, Kodak photo paper 
(gloss or matte ) , pearl paper etc.



      

 ​​​आणि महत्त्वाचे म्हणजे हे सर्व आपण दैनंदिन जीवनात नेहमी वापरतो .
कसे ते बघूया .


आपण photo studio मध्ये जातो Passport Size किंवा दुसरे काही प्रिंट करण्यासाठी तिथे "Kodak photo paper (gloss or matte ) "  हा पेपर वापरला जातो.आणि तो दुकानदार सांगेल तो पेपर आपण घेतो पण त्यामध्ये gloss हा पेपर दिसायला चांगला (shine ) असला तरी अधिक काळ टिकण्यासाठी  "matte paper " हा उत्तम .


office documents , school / college assignment इ xerox paper वर प्रिंट होते . जो दिसायला अतिशय साधा असतो .
साध्या साध्या कामांसाठी हा पेपर तुम्ही वापरू शकता .

हाच कागद तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा तुमची ओळख इतरांना दाखवण्यासाठी उपयोगी पडतो .
प्रत्येकाला दूरदर्शवर जाहिरात देणे शक्य आहे का?
नाही ना ?
मग आपण काय करतो तर वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देतो किंवा pamphlets छापतो.
त्याचप्रमाणे आपली ओळख समोरच्या व्यक्तीकडे राहण्यासाठी आपण आपले business cards छापतो .
म्हणजे बघा हा कागदाचा आपल्या वैयक्तित प्रगतीमध्ये किती मोठा वाटा आहे.
खूप creative business cards आपल्याला आता पाहायला मिळतात.
business card ,brochure , flyers , prospectus , promotional posters इ. art card paper ,
Coated Paper, Uncoated Paper वापरले जातात .

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण किंबहुना प्रसंग.
त्याचेच निमंत्रण पत्रिकेचे अतिशय सुंदर असे विविध प्रकार सध्या उपलब्ध आहेत .
खासकरून  इथे आपण वेगवेगळे कागदाचे प्रकार बघू शकतो.
Silk Paper, Pearl paper, Ivory Paper इ. 
ह्या प्रकारच्या पेपर्सना "Special Papers" म्हणतात. 
फक्त लग्नच नाही तर गृहप्रवेश , नामकरण विधी , उदघाटन समारंभ , वाढदिवस अशा अनेक शुभ आणि आनंदाच्या प्रसंगाचा कागद हा साक्षीदार असतो.
आता हे सारे प्रसंग जेव्हा आपण कॅमेरामध्ये बंदिस्त करतो तेव्हा ते पुन्हा डोळ्यांसमोर येतात जेव्हा आपण ते अल्बमच्या माध्यमातून
कायमस्वरूपी जपून ठेवतो.
पुढे काही वर्षांनी हेच फोटो आपल्याला हसवतात , जुन्या दिवसांची आठवण करून देतात .



पाहिलंत एक कागद आपल्या जीवनामध्ये किती आनंद भरतो ते !!!
                
वेगेवेगळ्या ठिकाणी , प्रिंटींग च्या हेतुप्रमाणे वेगवेगळे पेपर्स वापरले जातात परंतु हे सगळे पेपर सगळ्या printers वर प्रिंट होतातच असे नाही.त्यासाठी काही बंधने आणि नियम आहेत.

हे झाले papers संदर्भात.
तुम्ही कधी हे पहिले आहे का जो paper आपण stationary साठी वापरतो तो आणि business card  साठी वापरतो तो किंवा brochure or flyers चा पेपर ह्याच्या जाडीमध्ये फरक असतो.
xerox paper हा अतिशय पातळ असून brochure or flyers चा पेपर थोडा अधिक जाड आणि business card चा त्याहून अधिक जाड असा असतो .
तर हे कसे ह्याची माहिती थोडक्यात घेऊया.

प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी एक प्रमाण असते आणि  तो नियम पेपरलाही लागू आहे .
त्याचे प्रमाण आहे GSM - grams per square meter .

जितके वजन अधिक तितका पेपर जाड ( thick ) .
खाली दिलेल्या तक्त्यावरून तुम्हाला ह्याची कल्पना येईल .



अशा पद्धतीने printing industry मध्ये कागद अतिशय महत्त्वाचे कार्य बजावतो.
म्हणून मी पहिल्या लेखात असे लिहिले कि " कागद हा Printing Industry चा श्वास आहे."
परंतु ह्याच कागदाला साथ देणारी आणखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे "शाई " किंवा साध्या शब्दांत सांगायचे झाले तर रंग.
जर "कागद Printing Industry चा श्वास आहे " तर "शाई हि Printing Industry ची नस आहे ."
असे म्हटले तर चुकीचे होणार नाही .
त्याबद्दलची अधिक माहिती आपण पुढील लेखामध्ये करून घेऊ.

भेटू पुन्हा...

                                                                                - सुप्रिया नार्वेकर

Printing Industry - कागदाचे अनन्यसाधारण महत्त्व

Printing Industry - कागदाचे अनन्यसाधारण महत्त्व




चिठ्ठी आयी हे आयी हे 
चिठ्ठी आयी हे … 

आपल्या सर्वांना परिचित असलेले हे गाणे . 
पण आत्ताचे जग हे "Tech savvy " झाले आहे आणि त्यामुळे चिठ्ठी किंबहुना ते लिहिण्यासाठी वापरला जाणार कागद हे कुठेतरी 
लुप्त होत चालले आहे . 

तसे पहायला गेले तर "कागद" हा  Printing Industry मधला एक अविभाज्य घटक . 
म्हटले तर Printing Industry चा श्वास. 
कागद हा भारतीय प्राचीन लेखन सामाग्रीमधला एक महत्त्वाचा भाग आहे . 
जरी आता बहुतांश गोष्टी ह्या computerized झाल्या असल्या , संपर्कासाठी इतर अनेक सोयी -सुविधा उपलब्ध असल्या तरी कागदाची 
जागा कोणीही घेऊ शकत नाही . 
जरा विचार करून बघा जर कागदाचा शोध लागला नसता तर ?
मुद्रण कला विकसित झाली नसती तर ?
तर मग आपण काय केले असते ?
पाषाणावरती शिलालेख लिहिले असते कि वृक्षांवरती भूर्जपत्रे ?
आत्ताच्या २१ व्या शतकात आहे का हे शक्य ?
नाही ना  ???

खरे पाहायला गेले तर कागदाचा शोध हा आपल्या भारतात ७ व्या शतकात लागला परंतु तरीही ११ व्या शतकापर्यंत 
कागदाचा फारसा उपयोग केला गेला नाही . 
आपल्या भारतात कागदावर लिहिले गेलेले प्राचीन आणि दुर्मिळ पुस्तक किंवा ग्रंथ हा "पंचरक्ष" आहे आणि ते सध्या 
कलकत्ता येथे "आशुतोष संग्रहालयात " सुरक्षित आहे . 

असो तर सध्या आपण ज्या शतकात आहोत त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान एवढ्या प्रमाणात विकसित झाले आहे कि सगळकाही Internet आणि Mobile 
वर उपलब्ध आहे . 
काही शाळांमध्ये पुस्तके जाऊन त्याची जागा e - learning ने घेतली आहे ,
कादंबरी , ग्रंथ , दैनंदिन वर्तमानपत्रे , मासिके e - book , e - paper वर सहजरीत्या वाचली जातात ,
लग्न किंवा इतर समारंभाचे photos cd/ dvd  किंवा computer मध्ये save केले जातात ,
स्तोत्रे , पोथ्या हे headphone लावून mobile वर ऐकली जातात . 
पण हे सर्व जरी आधुनिक आणि आत्ताच्या जीवन सरणीसाठीसोपे असले तरी काही गोष्टींमधून मिळणारा आनंद आपल्याला विसरून चालणार नाही . 
शाळांमधल्या e - learning पद्धतीमुळे आत्ताच्या विद्यार्थ्यांना 
कोऱ्या पुस्तकाच्या वासाची गमंत कशी कळणार ?
वह्यांना खाकी cover घालून त्यावर sticker चिकटवण्याची मजा ते कसे अनुभवणार ?
सकाळी एका हातात चहा आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र घेऊन ते वाचताना मिळणारा उत्साह काही निराळाच … 
आपण आता जेव्हा आपल्या लहानपणीचे किंवा पूर्वीचे फोटो album पहिले कि नकळत आपण त्या आठवणींमध्ये रमून जातो मग जर आपण हे photos 
mobile पर्यंत मर्यादित ठेवले तर पुढच्या काळात हे फोटो बघून मिळणाऱ्या आनंदाला आपण मुकू .
देवाची स्तोत्रे हातात पोथी घेऊन वाचताना मिळणारी पवित्र स्पंदने mobile वर headphone लावून कशी मिळणार ?
शाळांमध्ये हस्तकलेच्या विविध वस्तू बनवण्याचा आनंद आत्ताची लहान मुले हरवून बसली आहेत . 
आपल्या प्रियजनांना शुभेच्छा,निमंत्रण,अभिनंदन,आशिर्वाद हे सारेwatsapp / email / phone वरून दिले जातात पण मग कधीतरी पत्रसुद्धा पाठवून बघा. एक वेगळाच आनंद आहे त्यामध्ये . 
पण सध्याच्या tech savvy जमान्यामुळे कागद किंबहुना  प्रिंटींग क्षेत्रासमोर भविष्यात फार मोठे आव्हान उभे राहणार आहे . 
आता आधुनिक तंत्रज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकसित झाले कि printing क्षेत्र आणि पर्यानाने कागद हे मागे पडत चालले आहे . 

हे असे असले तरीही कागदाचे महत्त्व विसरून चालणार नाही . 
समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये कागदाने मोलाचा वाटा उचलला आहे . 
स्वातंत्र्यपूर्व काळात ह्याच कागदावर मांडल्या गेलेल्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचू शकले . 
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या  "केसरी" आणि  "मराठा " ह्या वर्तमानपत्रांमुळे त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहचू शकले . 
आणि स्वातंत्र्याच्या कार्यात मोलाचा ठसा उमटवून गेले. 
मग जरा विचार करा जर कागदाचा शोध लागला नसता तर हे सारे किती अवघड होऊन बसले असते . 
अशा ह्या कागदाचे महत्त्व नजरेआड करून चालणार नाही . 
काय मग पटले ना कागदाचे महत्त्व ???
परंतु ह्या सगळ्यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा कि जिथे आवश्यकता नाही तिथे कागदाचा उपयोग नक्किच टाळावा . 
असा हा कागद Printing Industry  चा एक अविभाज्य घटक बनला . 

ह्याच कागदाचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचा व्यवहारातला उपयोग आपण पुढील लेखात बघूया . 

                                                                               -सुप्रिया नार्वेकर    

संदर्भ :- 

गुरुपौर्णिमा …


Maza Bapu

Maza Bapu



Find More details and exclusive wallpapers  @http://aniruddhabapu-gurupournima.blogspot.in/





Sir A.P.J.Abdul Kalam Poem

Abdul Kalam


सर अब्दुल कलाम

भारत भूमी सांगून जाते
कलाम सरांची गाथा
सर्व संकटांनी टेकविला
त्यांच्या पुढे माथा

कुटुंब गरीब ,
परिस्थिती बिकट
आत्मविश्वासाने दूर केली
अडचणींची वाट

सकारात्मकतेचे बीज रोवुनी
घातले त्यास कार्यक्षमतेचे पाणी 
जिंकले सर्वांस स्वकर्तृत्त्वाने
वरी दिसता साधी राहणी

अभिमान वाटे साऱ्यांना
असे भारताचे हे सुपुत्र
भारत महासत्ता होणारच
ह्यांनीच रेखिले सुंदर चित्र

भारताच्या मनाच्या तुऱ्यात
रत्ने जरी अनेक
तरीही कलाम सरांसारखे
अनमोल रत्न मात्र एकच

अशा ह्या अग्निपंखाला
आमचा अखेरचा सलाम
सदैव आमच्या मनात
असतील आमचे
लाडके सर अब्दुल कलाम

                                                           - सुप्रिया नार्वेकर
                                                             बोरिवली - पूर्व