माझ्या मनातला पहिला पाऊस...

Poem


माझ्या मनातला पहिला पाऊस...


माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
मनातल्या आठवणींसवे बरसणारा 

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
ओठांवर अलगद हसू आणणारा

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
डोळ्यांच्या पापण्या नकळत ओल्या करणारा

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा 
मिठीत तुझ्या हरवून देणारा

माझ्या मनातला पहिला पाऊस कोसळणारा
प्रेमात तुझ्या मला चिंब करणारा …


सुप्रिया नार्वेकर


हास्य

हास्य

मराठी कविता









RGB and CMYK Printing


RGB and CMYK Printing

आपण प्रिंटींग ची basic माहिती घेतली . पण प्रिंटींग व्यवस्थित आणि अचूक होण्यासाठी ज्या creative चे प्रिंटींग होणार आहे ते अचूक असणे अत्यावश्यक असते . खूप वेळा असे होते कि आपण design केलेले artwork जसेच्या तसे print झाल्यावर  दिसत नाही. रंगामध्ये थोडाफार किंवा कधीतरी खूपच जास्त फरक झालेला दिसतो.
तर ह्याचे कारण काय ?
जसे make - up करताना आपण सर्व सौंदर्य प्रसाधने योग्य प्रमाणात आणि योग्य तिथे वापरतो तसेच प्रिटींग करताना सर्व गोष्टी योग्य प्रमाणात वापरल्या जाणे महत्त्वाचे असते .
आणि ह्या मध्ये Designers चा role खूप महत्त्वाचा असतो .
Designer हा जेवढा creative असला पाहिजे तेवढाच तो techinically सुद्धा strong असला पाहिजे .
तरच त्या designer ने बनवलेले artwork प्रिंटींग झाल्यावर सुंदर आणि उठावशीर दिसेल .

काही खूप basic गोष्टी आहेत ज्या एक Graphic Designer म्हणून माहित असल्या पाहिजेत .
आणि त्यामधली पहिली गोष्ट मध्ये आपण कुठल्या प्रक्रियेमध्ये प्रिंट करणार आहोत .
printing च्या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत.
१) RGB
२) CMYK
 आता ह्या दोन मधली कुठली प्रक्रिया कधी वापरायची हे आपण बघूया, तर
WEB ह्या क्षेत्राशी related असणाऱ्या designs साठी RGB आणि कागदावर प्रिंट होणाऱ्या गोष्टींसाठी CMYK . काही अपवाद वगळता.

आपण  RGB  आणि CMYK म्हणजे काय ते जाणून घेऊया .
RGB :-  R- Red , G - Green , B - Blue

आणि
CMYK  :- C - Cyan , M - Magenta , Y - Yellow , K - Black

CMYK मध्ये प्रिंटींग करण्याच्या प्रक्रियेला Offset Printing असे म्हणतात.
आता CMYK मध्ये K म्हणजे black कसे ?
हा प्रश्न पडला असेल ना…

तर एक कारण असे आहे कि , B हे आधीच RGB मध्ये Blue साठी वापरले गेले असल्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून आणि महत्त्वाचे कारण म्हणजे
CMYK हि ४ colors printing प्रक्रिया असून ती plates ने केली जाते आणि त्यात Black ला Key plate बोलले जाते कारण हि plate artistic related सर्व महत्त्वाची माहिती carry करते म्हणून .Offset प्रिंटींग मध्ये plates चा उपयोग करून प्रिंटींग केले जाते . plates ह्या खालील चित्रात तुम्ही बघू शकतात .




CMYK प्रिंटींग ला ऑफसेट प्रिंटींग असेही  म्हणतात . मग आता हे कुठे वापरले जाते तर Newspaper, visiting cards, box packaging , books printing , brochures etc.
काही वेळेला तुम्हाला पेपर वर खालच्या बाजूला एक लाईन दिसते . तो ऑफसेट प्रिटींग Symbol चा असतो .





RGB प्रिटींग म्हणजे आपण जे फोटो स्टुडीओ मधून प्रिंट काढून घेतो ते .
अगदी नॉर्मल उपयोगासाठी.

काही वेळेला RGB मधून CMYK मध्ये conversion करणे हे कठीण असू शकते आणि मिळणारा result हा चुकीचा असू शकतो.
म्हणून हे सगळे टाळण्यासाठी तुम्ही करत असलेले काम हे कुठल्या प्रक्रियेमध्ये print होणार आहे ह्याची पूर्ण माहिती घेऊनच Designs करा जेणेकरून तुम्ही केलेले designs हे तुम्हाला हवे तसे printing झाल्यावरही दिसेल.

​ In depth खूप माहिती आहे ह्या सगळ्याची पण ती वाचायला खूप क्लिष्ट वाटेल म्हणून थोडे सोपे करून सहज समजेल असे सांगण्याचा प्रयास केला आहे.

- सुप्रिया नार्वेकर


प्रिंटींग



काही वर्षांनी  कानी  पडणारा संवाद …
"अग इंटरनेट चालू नाही आहे , काही प्रोब्लेम झाला आहे का ? मला पेपर वाचायचा आहे ."
ह्याचे कारण  आपण आता ज्या  शतकात  आहोत त्यामध्ये बहुतांश गोष्टी ह्या E - Portal झाल्या आहेत. हातात smart phone आल्यामुळे एखादी गोष्ट लिहिण्यासाठी आपण वही-पेन वापरत नाही, Hoardings च्या ऐवजी Led Screen चा उपयोग केला जातो, पत्रांची जागा E-Mail ने घेतली आहे, कादंबरी- पुस्तके   E-Book वर उपलब्ध आहेत, वर्तमानपत्रे सुद्धा E - Paper वर वाचायला मिळतात .
सगळीकडे Save Tree - Save Paper चे slogans दिसतात, कागदाचा वापर कमीत कमी करण्यावर भर दिला जातो आणि ह्या सगळ्यामुळे printing क्षेत्रापूढे  खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हे सगळे असले तरी printing चे महत्त्व आपल्याला विसरून चालणार नाही. आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्याशी आमचा काय संबंध ???
पण जरा वेगळ्या point of view ने पहिले तर समजेल Printing ने समाज प्रबोधनाच्या कार्यात खूप मोलाचा वाटा उचलला आहे. नाही कळले ?
आता बघा,
लोकमान्य टिळकांनी आपल्या "केसरी"  आणि "मराठा " ह्या वर्तमानपत्रातून जनजागृती केली , आपले स्वत्रांत्र्याबद्दलचे विचार जनतेपर्यंत पोहचवले आणि  हे शक्य झाले कारण तेव्हा मुद्रण कला विकसित झाली होती म्हणून …
जर तेव्हा  प्रिंटींग नसते तर गावोगावी माहिती पोहोचणे किती अवघड झाले असते .
एकेक पुस्तकाच्या १००० प्रती काढल्या जातात जर प्रिंटींग नसेल तर प्रत्येक वेळेला आपणा लिहित बसणार का ?
मग आता आपण जी पुस्तके वाचतो ती printing चीच  कमाल ना !!!
जगभरातल्या बातम्या आपण घर बसल्या वर्तमान पत्रातून वाचतो ते printing मुळेच ना !!!

printing म्हणजे नुसते साहित्य नाही तर आपण जे आपले photos, एखाद्या समारंभाचे photos घेतो हे सारे printing मध्येच आले, घरात लावलेल्या photo frames आपल्या आठवणींना उजाळा देतात हे कौशल्य सुद्धा printing चे !!!
हल्ली personalize gifts ना खूप मागणी आहे. Mug,Calendars,Card Holders,Key chains,Pillows,Mobile covers,T -shirts etc ह्या सगळ्यावर आपल्या आवडत्या  व्यक्तीचा photo लावून ते त्या व्यक्तीला gift म्हणून देऊ शकतो.
दुकानातून ready made gift घेण्यापेक्षा असे personalize gifts दिले तर काय मस्त वाटेल ना… हि पण कमाल printing ची !!!

प्रिंटींग क्षेत्राची भरारी वाखाण्याजोगी आहे. एखाद्या बागेत कशी वेगवेगळ्या प्रकारची फुले असतात आणि त्या प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात तसच आहे इथे पण …
प्रिंटींग हि खूप मोठी बाग आहे आणि त्यात निरनिराळ्या पद्धतीच्या प्रिंटींग प्रक्रिया आहेत आणि त्या प्रत्येकाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे.

जसे 

Digital printing,
Offset printing,
Screen printing, 
Met Pet printing, 
Lenticular printing म्हणजेच  3D Printing 
हे आणि असे बरेच काही…
खूप मजेशीर आणि शिकण्यासारखे आहे.
तुम्हालाही आवडेल
मग भेटू पुन्हा !!!

-सुप्रिया नार्वेकर

Matching Center - शुभ विवाह




Matching Center

"आमच्या येथे perfect matching वधू - वर मिळतील ."
लग्न आहे कि matching center चे दुकान !!!
गम्मतच वाटते मला हे सगळे पहिले कि.
खरोखरच arrange marriage म्हणजे एखाद्या कटपीस सेन्टरमध्ये जाऊन
साडीला matching blouse piece घेण्यासारखे वाटते .
ते घेताना  कसे तंतोतंत match होत आहे का ते पाहतो,
कुठेही compromise नाही अगदी तसेच !!!
रंग , उंची , चष्मा ,  केस , जाडी , घर , पगार , नोकरी , क्षिक्षण , गाडी
बापरे किती ती मोज मापे !!!
मोज मापांची शेपटी हि हनुमानाच्या शेपटीसारखी  वाढतच जाते .
आणि खासकरून मुला-मुलींच्या अपेक्षा बाजूला इथे तर
त्यांच्या पालकांच्या अपेक्षाच भन्नाट असतात ….
"आमच्या मुलाला ना M. B.A च मुलगी हवी आहे , पगार लाखभर असला  तरी चालेल,
आमच्या मुलीला ना वेगळे राहणारा मुलगा हवा आहे , आणि त्याची गाडी पण हवी हा !!!
हे आणि असे बरेच काही ."
मुला मुलींच्या  नावावर हे  सारे सारे खपवले जाते.
एकदा का मुलांनी पंचविशी ओलांडली म्हणजे संपले सगळे …
मग काय सगळ्या कौटुंबिक समारंभांना विवाह मंडळाचे किंवा सामुहिक वधू वर मेळाव्याचे स्वरूप येते .
आपल्या मुलांबद्दल सांगताना जराही थकत नाहीत हे सर्व ….
कदाचित  आपल्यातले हे hidden गुण त्या बिचाऱ्या मुला मुलींनाहि माहित नसतील. 

बिचारे शांतपणे हे सगळे ऐकत असतात.
आणि मग सगळी मोज मापे पडताळून विवाह नामक एक फार मोठे ध्येय गाठले जाते…
गमतीचा भाग सोडला तर ह्या सगळ्यामध्ये एका खूप मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केला जातो .
आणि ती म्हणजे "एकमेकांचे स्वभाव ".
स्वभाव मनमिळाऊ पाहिजे हे फक्त  लिहिण्यापुरतीच कागदावर राहते .
दिसणे , नोकरी , शिक्षण ,रंग इ. हे तुमचे समाजातील पत वाढवू शकतात परंतु
स्वभाव तुमची एकमेकांच्या नजरेतील पत वाढवू शकतात.
जर दिसणे , नोकरी , शिक्षण ,रंग इ. अगदी तंतोतंत जुळले पण पुढे जाऊन स्वभावच जुळले नाही तर
काय फायदा !!!
ह्यातून होणारे पर्याय म्हणजे
एक तर मनाविरुद्ध आयुष्यभर संसार करायचा नाहीतर सध्या fashion आहेच घटस्फोट !!!
दोन्ही कुटुंबाला मानिसक त्रास !!!
मग हे सगळे करण्यापेक्षा
दिसणे,नोकरी,शिक्षण,रंग ह्याचबरोबर स्वभाव बघा.
तो पडताळून पहा. अगदी १०० वेळा पडताळून पहा .
तो जर एकदा जुळला,
perfect match झाला तर मग बघा तुमची संसारुपी साडी  किती खुलून दिसते ते !!!
आजूबाजूचे सर्व कसे वळून वळून पाहतील तुमच्याकडे !!!
आणि मग ह्याच समाजात तुम्ही अभिमानाने चालू शकाल …
हे पुरेसे नाही का मग खोट्या मान मरातब पेक्षा !!! 

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !!!

  

- सुप्रिया नार्वेकर

कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य सेवा शिबीर खूप आतुरतेने वाट बघतेय !!!




कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर
खूप आतुरतेने वाट  बघतेय

आज सकाळपासून  अस्वस्थ होते . काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते .
कारण आज माझी रोजच्यासारखी कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर ह्यावर लेख
लिहिण्याची  घाई नव्हती .
रोजची सवय झाली होती ती गेले ७ दिवस …
रोज रात्री झोपताना उद्याच्या लेखाची तयारी करायची ,
मग सकाळी काही बदल असल्यास ते करायचे आणि मग पोस्ट करायचे blog  वर .
हे routine झाले होते पण आज तसे काहीच नव्हते .
मग  विचार आला
नवीन वर्ष कधी येणार ?
पुन्हा कॅम्प  date कधी announce होणार ?
कॅम्प साईट वर लगबग कधी दिसणार ?
पुन्हा  जाऊन  गावकर्यांना कधी भेटणार ?
लहान बाळानबरोबर कधी बोलणार ?
ह्यावर्षी काय नवीन असणार
मला पुन्हा फोन येणार का ?
आणि मग तो कधी येणार ?
पुन्हा माझी निघाण्यासाठीची  गडबड , excitement !!!
वाट बघतेय ह्या साऱ्याची !!!
खूप आतुरतेने वाट  बघतेय
आणि
मला माहित आहे तुम्ही पण सारे ह्याची  तेवढ्याच आतुरतेने वाट बघताय !!!
बरोबर ना  ?

आयुष्याला लागलेले सुंदर वळण म्हणजे ,
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर

आयुष्याला लागलेली शिस्त म्हणजे
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर

आयुष्याला मिळालेली कलाटणी  म्हणजे
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर

आयुष्यावर झालेले संस्कार म्हणजे
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर

आयुष्यात  अनुभवलेले अनमोल क्षण म्हणजे
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर

आयुष्यात मनावर  उमटलेला एक गोड ठसा म्हणजे
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर

आयुष्यात मनावर  उमटलेला एक गोड ठसा म्हणजे
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर
आणि
आयुष्यभराची पुंजी म्हणजे
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य  सेवा शिबीर

सुप्रिया नार्वेकर

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ७ समग्र परिवर्तन … (लाभार्थी आणि सेवेक ऱ्यांचे )


कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
 भाग - ७
समग्र परिवर्तन … (लाभार्थी आणि सेवेक ऱ्यांचे  ) 

आपण वेगवेगळ्या ६ भागांमधून कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराची माहिती घेतली . 
मला आलेले अनुभव , मी पाहिलेले हे सेवा शिबीर मी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयास केला . 
आणि ह्यामध्ये मला काही श्रद्धावान स्नेह्यांनी खूप मदत केली. 
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर म्हणजे एक नुसते सेवा शिबीर नाही ठरले माझ्यासाठी . 
तर माझ्यासाठी ती एक संस्कार शाळाच होती . 
सतत आपण रडत असतो , माझ्याकडे हे नाही,  माझ्याकडे ते नाही, देवा  मला हे दे , ते दे सतत मागण्या . 
सगळ्या सुख सोयी आहेत आपल्याकडे . 
हातात महागडे smart phone आहेत , hotel , मजा मस्ती , party , shopping सतत चालू असते . पण तरीही समाधान नाही . 
पण ह्या सेवा शिबिराला गेल्यावर कळले कि आपण किती नशीबवान आहोत. 
अजूनही त्या ठिकाणी गावांमध्ये वीज जाते , खूपशा आधुनिक गोष्टी तिथपर्यंत पोहचू शकत नाही पण हि खंत मला तिथल्या कोणत्याही माणसाच्या चेहऱ्यावर दिसली नाही . 
किंबहुना एक वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते . 
ह्या दोन दिवसांच्या कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा  शिबिराने माझ्यात खूप बदल झाले , विचार करण्याची दृष्टीच बदलली . 
आपल्या प्रेमाच्या दोन शब्दांनी , आपल्या प्रेमाच्या दोन क्षणांनी जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर 
तसे करायला काय हरकत आहे ना ?
दुसऱ्यांना आनंद देण्यात एक वेगळेच समाधान आहे. 
आणि त्याने तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होतात एवढे मात्र नक्की . 
मी घरी आईला मदत करते पण सगळी कामे स्वताची स्वतः करावी हि शिस्त मला ह्या कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा शिबिरामुळे लागली . घरी किंवा कुठलेही family function असेल तर काम करते मी 
पण अन्नपूर्णा प्रसादम च्या सेवेमध्ये हातात मोठे पातेले घेऊन , खाली वाकून एका वेळी २५-३० भक्तांना जेवण वाढणे , आणि ते सुद्धा दिवसभर. 
आणि सेवा झाल्यानंतर कंबर दुखतेय , हात दुखतोय अशी तक्रारहि नाही किंवा त्रास हि नाही . हे सारे माझ्यासाठी एक मोठे आश्चर्यच आहे !!! 
प्रत्येक क्षणी वेगवेगळे लोक भेटत होते, वेगवेगळ्या स्वभावांचे आणि म्हणतात न "व्यक्ती तितक्या प्रकृत्ती "
पण प्रत्येकाशी जुळवून घेणे , प्रेमाने वागणे , मिळून मिसळून राहणे हे सारे बदल आपोआपच माझ्यामध्ये झाले . 
भक्तीचे एक वेगळेच रूप मला पहायला मिळाले . 
ज्या बापूंना एकदाही प्रत्यक्ष पहिले नाही त्यावर इतके प्रेम कसे करू शकत कोणी !!!
जो बापू ह्या सगळ्यांसाठी एवढे सगळे करतो त्या बापुसाठी ह्या भक्तांच्या मुखातून येणारे अभंग काळजाचा ठाव घेणारे होते. आपल्या सद्गुरूला प्रेमाने आळवताना 
त्यांचे डोळे पाणावत होते . 
नाही वर्णन करू शकत ह्या भावाचे , प्रेमाचे  !!!

आपण घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो पण ते पण किती असतात ३,४,५ जास्तीत जास्त १० . 
पण २५-२५ जणांचे स्वागत "अतिथी देवो भाव " ह्या वाक्याची शिकवण देऊन गेली , जेव्हा मी गावांमध्ये साहित्य वाटप करायाल गेले होते 
पहिल्या दिवशी तेव्हा . त्यांनी दिलेल्या लिंबू सरबताची गोडी इथे मिळणाऱ्या कोणत्याही five star हॉटेलमध्यल्या सर्वात महागड्या पदार्थापेक्षाही कितीतरी पटीने अधिक होती . तुलनाच नाही त्याला .

असे हे कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य सेवा शिबीर मला खूप काही शिकवून गेले . 
बापू मी ऋणी आहे तुझी कि मला तू हि संधी दिलीस . 
माझ्याकडून सेवा करवून घेतलीस. जे काही केलेस ते फक्त तूच आणि जे काही घडले ते फक्त तुझ्याच कृपेने . 

अशी हि कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य सेवा शिबीराची लेखनमाला इथेच थांबवते . 
आणि ह्या कॅम्पसाठी मला येणाऱ्या प्रत्येक वर्षी जायला आवडेल आणि तुम्हालाही  संधी मिळावी हीच इच्छा .
आशा आहे तुम्हाला माझे हे प्रयास आवडले असतील ,
काही राहिले असल्यास , चुकले असल्यास क्षमस्व !!!

तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतेय !!!

सुप्रिया नार्वेकर 

http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ६ कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस दुसरा

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग - 
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस दुसरा  

रोज सकाळी उठायचे आणि आवरायचे म्हणजे एक मोठा प्रश्नच असतो. 
पण इथे सकाळ कधी होतेय आणि आम्ही कधी तयार होऊन camp site वर जातोय असे होयचे . 
alarm snooze करायची वेळ नाही आली . 
२ फेब्रुवारी २०१५ , सोमवार 
आज कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराचा दुसरा दिवस 
कालच्या आठवणी इतक्या भारी होत्या कि आज काय होणार ह्याची चित्र आधीच मनात रंगू लागली . 
आज मी आणि माझी मैत्रीण सकाळी जरा लवकरच उठलो आणि पटापट आवरून महालक्ष्मी आईच्या मंदिरात आईचे दर्शन घायाला गेलो .
आईची पूजा नुकतीच झाली होती . आणि आरतीला सुरुवात झाली'. 
दिवसाची सुरुवातच मांगल्य आणि पवित्र्याने झाली . 
मी दरवर्षी कोल्हापूरला जाते पण ह्या वर्षीचे कोल्हापूर मला खूप काही देऊन गेले.
आईचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही बस मध्ये बसलो . 
बस पुन्हा camp site च्या दिशेने निघाली . 
बस मध्ये आज जाताना भक्ती गीतांचे सूर होते . 
कॅम्प साईट वर उतरल्यावर सगळीकडे चैतन्याचे वातावरण होते. 
आजचा दिवस आहे Medical check up , Student Distribution आणि अन्नपूर्णा प्रसादमचा.
सगळे volunteers आपापल्या सेवांमध्ये मग्न होते . 
गावकरी भक्त आणि विद्यार्थी यायला सुरुवात झाली होती . 
सर्वप्रथम आम्हाला नाश्ता दिला, आजचा मेनू होता उपमा . 
चहा झाला आणि मग पुन्हा कालच्याप्रमाणे परमेश्वराचे नामस्मरण केले. 
सेवेच्या इथे आमची team गेली .मग एका volunteer ने आम्हाला सेवेची माहिती सांगितली .
आणि मी तर खूप आतुर होते कधी एकदा त्या चिमुकल्यांना खाऊ घालतेय असे झाले होते . 
सेवेच्या आधी आम्हाला सांगण्यात आले की कोणीही चप्पल घालणार नाही सेवा करताना कारण जसे आपण आपल्या घरीसुद्धा जेवताना 
चप्पल घालत नाही .  
किती सुंदर विचार आहेत  … 
करायचे म्हणून करायचे असा भाव नाही . 
प्रसादालायामध्ये मेनू पण झकास होता. बाळे येण्यासाठी थोडा वेळ होता म्हणून मी जेवण जिथे बनवले 
जात होते तेथे गेले . कुतुहूल होते मला कि एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसादम आहे मग ह्याचे जेवण कसे बनवतात
असणार? , भांडी किती मोठी असणार ?, भाज्या कशा कापत असणार? , मीठ , मसाला कसा टाकत असणार ? हे आणि बरेच !!!
तिथे गेल्यावर पाहिलं तर उंच उंच भांडी होती जेवण बनवण्यासाठी , त्याला तिथे  विहीर असे म्हणतात . 
तेव्हा मनात विचार आला कि जेव्हा घरी आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा आपले चमचे , वाटी असे अंदाज असतात बंधालले आणि तरीसुद्धा  
कधीतरी काहीतरी की जास्त प्रमाणात होते मग इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचे ???? 
हे कसे करत असतील ? मग एका कार्यकर्त्याला विचारले "हे तुम्ही कसे करता ? तर त्यांनी दिलेले उत्तर खूप गोड होते . 
ते म्हणाले "काही नाही मी माझ्या परमेश्वराचे नाव घेतो आणि टाकतो सगळे , मग काय तोच घेतो उत्तम करवून . आणि ह्याचा 
अनुभव मी जेव्हा नंतर जेवले तेव्हा आला , अतिशय रुचकर होते !!!   
मेनू होता भात , भाजी , आमटी , शिरा, लोणचे आणि लिंबू. 
हळू हळू छोटी छोटी पावले दिसू लागली . 
डोक्यावर टोपी , हातात पिशवी त्यात त्यांना दिलेला खाऊ आणि इतर साहित्य , सांभाळत सांभाळत लगबगीने एकमेकांचा हात पकडून एका रांगेत बैठकीवर जाऊन बसले . 
मग आम्ही जेवण वाढायला सुरुवात केली . 
एका वेळी अंदाजे १० रांगा होत्या आणि प्रत्येक रांगेत अंदाजे ३० मुले बसत होती. 
२-२ च्या रांगा प्रमाणे volunteers विभागले होते . 
जेवण देण्यासाठी  १ team आणि वाढण्यासाठी १ team असे केले होते . 
perfect management !!!
मी वाढण्यासाठी होते .  
जेवण पूर्ण वाढून  झाल्यावर सुरुवात करण्याच्या आधी 
वदनी कवळ घेता हे एकासुरात म्हटले बाळांनी . 
किती सुंदर संस्कार हे !!!
किती गोड बाळ सारी  … 
त्यांना जेवू घालताना आलेला अनुभव भन्नाट होता . 


Annapurna Prasadam
हे करताना दुपार कधी होऊन गेली आणि ४ वाजून गेले हे कळलेच नाही . 
मी आणि माझी मैत्रीण  जेवलो नव्हतो. 
तिथले स्थानिक कार्यकर्ते आम्हाला जेवून घ्या असे सारखे सांगत होते पण 
आमचे पोट तर त्या बाळांना जेवू घालून कधीच भरले होते . 
तृप्त झालो होतो. 
अस्मानी आनंद होता . 
मध्ये मध्ये जेव्हा  break मिळायचा तेव्हा तेव्हा मी camp site वर जाऊन बाकी सगळे पाहायचे . 
आपण एक काम करूया camp site च्या सुरुवातीच्या ठिकाणी जाऊया . 
सर्वप्रथम मी जेथून विद्यार्थी येत होते तिथे गेले ,
बस मधून विद्यार्थी खाली उतरत होते ,
आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि हि बाळे बसमधून खाली उतरतानाच त्यांना टोपी दिली जात होती . 
म्हणजेच camp पर्यंत चालत जाताना त्यांना उन लागू नये . एवढी काळजी मी तरी नाही पहिली अजून कुठे . 
प्रत्येक शाळेबरोबर २-२ volunteers  दिले होते जेणेकरून कोणाचे काही राहून जाऊ नये . 
सुरुवातीला सर्वांचे medical check up केले जात होते . 
सर्व डॉक्टर्स अत्यंत प्रेमाने , आपुलकीने तपासणी करत होते .
विद्यार्थ्यांना  औषधे, विटामिन्स साठी tonic,कृमीवरील tonic दिले जात होती.


 नंतर student distribution कक्ष होता तिथे बाळांना चप्पल दिली जात होती आणि तिसुद्धा all season म्हणजेच 
बाळांना कोणत्याही ऋतूमध्ये त्रास होऊ नये . 
इतका खोल विचार करणे खरच साधी गोष्ट नाही . 
विद्यार्थ्यांना मेणबत्त्या, माचीस,
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू  ह्यांच्या "अनिरुद्ध आदेश पथक " ह्या अंतर्गत वर्षभर चालवल्या जाणाऱ्या चाराख्यामधून जो सुत निघतो 
त्यापासून बनवलेले गणवेश दिले जातात . 
तसेच शाळांच्या शिक्षकांना शाळेसाठी लागणारे साहित्य 
Rings 
cricket kit -  १ bat , ४ stumps , ६ rubbery ball , 
Frisbee Discs दिले जातात . 
ह्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि 
नुसते आरोग्य नाही तर खेळाचे महत्त सुद्धा तितकेच आहे हे मुलांना समजते . 
हे सगळे झाल्यावर सर्व विद्यार्थी अन्नपूर्णा प्रसादम येथे येतात . 
आणि वर मी ते संगीतालच आहे . 
गावकर्यांसाठी सुद्धा असेच असते . 
वैद्यकीय तपासणीचे details खालील फोटोमधून तुम्हाला समजेल . 

details of medical check up
डोळे तपासणी सुद्धा केली जाते आणि विनामुल्य चष्मे दिले जातात ,
E.C .G  काढला जातो , काही मोठा आजार असल्यास तिथल्या सरकारी इस्पितळाचा reference देऊन त्यासंदर्भात 
मार्गदर्शन केले जाते . 
आणि हे सारे विनामुल्य असते . 
आश्चर्य वाटले ना… 
ऊन खूप  असल्याने त्याचा त्रास होऊन कोणाला चक्कर आली तर 
पाण्याबरोबरच लिंबू पाणी सुद्धा होते . 
कुठलीही शिबीर न वाटता हे घर असल्यासारखे वाटत होते आणि प्रत्येक स्वयंसेवक आपल्याच 
घरातले कार्य आहे , आपलीच सारी माणसे आहेत  भावनेने सेवा करत होता . 
ह्या सगळ्यात ५ कधी वाजले कळलंच नाही . 
camp साधारण ५-६ पर्यंत आवरला.  
दिवस कधी निघून गेला कळलेच नाही . 
मग आम्ही साऱ्या मैत्रिणी इतक्या दिवसांनी एकत्र आलो . 
एकमेकी अनुभव सांगू लागलो ,गप्पा रंगल्या आमच्या . 
आणि मग रात्रीच्या जेवणासाठीचा निरोप आला . 
जेवण झाले आणि मग वेळ आली camp मधून निघायची . 
अजिबात मन नव्हते तिथून निघण्यासाठी . 
हे सेवा शिबीर इतक्या लवकर का संपले ?
आजच का निघायचे ?
अजून पाहिजे न काही दिवस 
ह्या सगळ्या विचारांनी  डोळ्यात  पाणी आले. 
आयुष्यातले हे २ दिवस कधीही न विसरण्यासारखे आहेत . 
जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी मनापासुन करतो तेव्हा मिळणारा 
आनंद हा कोणत्याही इतर आनंदापेक्षा खूप मोठा असतो . 
त्या आनंदातून मिळणारी तृप्ती , समाधान आपल्याला सगळ्यात जास्त श्रीमंत करते . 
असे हे  कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ इथे थांबले 
मी मुद्दाम थांबले म्हणेन कारण हे कधीच संपणार नाही ,
अखंड चालू राहते आणि राहणार … 
अतिशय जड अंतकरणाने मी बस मधले पुन्हा मुंबई ला येण्यासाठी . 
परंतु मनाने अजूनही शिबिरातच होते . 
ह्या सर्व लेखांच्या मालिकेमुळे सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
क्रमश :

Photo Courtesy : - Kolhapur Medical and Health Care Camp                                         Facebook Page  

सुप्रिया नार्वेकर 

Find More Photos and Videos on