कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ६ कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस दुसरा

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग - 
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस दुसरा  

रोज सकाळी उठायचे आणि आवरायचे म्हणजे एक मोठा प्रश्नच असतो. 
पण इथे सकाळ कधी होतेय आणि आम्ही कधी तयार होऊन camp site वर जातोय असे होयचे . 
alarm snooze करायची वेळ नाही आली . 
२ फेब्रुवारी २०१५ , सोमवार 
आज कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराचा दुसरा दिवस 
कालच्या आठवणी इतक्या भारी होत्या कि आज काय होणार ह्याची चित्र आधीच मनात रंगू लागली . 
आज मी आणि माझी मैत्रीण सकाळी जरा लवकरच उठलो आणि पटापट आवरून महालक्ष्मी आईच्या मंदिरात आईचे दर्शन घायाला गेलो .
आईची पूजा नुकतीच झाली होती . आणि आरतीला सुरुवात झाली'. 
दिवसाची सुरुवातच मांगल्य आणि पवित्र्याने झाली . 
मी दरवर्षी कोल्हापूरला जाते पण ह्या वर्षीचे कोल्हापूर मला खूप काही देऊन गेले.
आईचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही बस मध्ये बसलो . 
बस पुन्हा camp site च्या दिशेने निघाली . 
बस मध्ये आज जाताना भक्ती गीतांचे सूर होते . 
कॅम्प साईट वर उतरल्यावर सगळीकडे चैतन्याचे वातावरण होते. 
आजचा दिवस आहे Medical check up , Student Distribution आणि अन्नपूर्णा प्रसादमचा.
सगळे volunteers आपापल्या सेवांमध्ये मग्न होते . 
गावकरी भक्त आणि विद्यार्थी यायला सुरुवात झाली होती . 
सर्वप्रथम आम्हाला नाश्ता दिला, आजचा मेनू होता उपमा . 
चहा झाला आणि मग पुन्हा कालच्याप्रमाणे परमेश्वराचे नामस्मरण केले. 
सेवेच्या इथे आमची team गेली .मग एका volunteer ने आम्हाला सेवेची माहिती सांगितली .
आणि मी तर खूप आतुर होते कधी एकदा त्या चिमुकल्यांना खाऊ घालतेय असे झाले होते . 
सेवेच्या आधी आम्हाला सांगण्यात आले की कोणीही चप्पल घालणार नाही सेवा करताना कारण जसे आपण आपल्या घरीसुद्धा जेवताना 
चप्पल घालत नाही .  
किती सुंदर विचार आहेत  … 
करायचे म्हणून करायचे असा भाव नाही . 
प्रसादालायामध्ये मेनू पण झकास होता. बाळे येण्यासाठी थोडा वेळ होता म्हणून मी जेवण जिथे बनवले 
जात होते तेथे गेले . कुतुहूल होते मला कि एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसादम आहे मग ह्याचे जेवण कसे बनवतात
असणार? , भांडी किती मोठी असणार ?, भाज्या कशा कापत असणार? , मीठ , मसाला कसा टाकत असणार ? हे आणि बरेच !!!
तिथे गेल्यावर पाहिलं तर उंच उंच भांडी होती जेवण बनवण्यासाठी , त्याला तिथे  विहीर असे म्हणतात . 
तेव्हा मनात विचार आला कि जेव्हा घरी आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा आपले चमचे , वाटी असे अंदाज असतात बंधालले आणि तरीसुद्धा  
कधीतरी काहीतरी की जास्त प्रमाणात होते मग इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचे ???? 
हे कसे करत असतील ? मग एका कार्यकर्त्याला विचारले "हे तुम्ही कसे करता ? तर त्यांनी दिलेले उत्तर खूप गोड होते . 
ते म्हणाले "काही नाही मी माझ्या परमेश्वराचे नाव घेतो आणि टाकतो सगळे , मग काय तोच घेतो उत्तम करवून . आणि ह्याचा 
अनुभव मी जेव्हा नंतर जेवले तेव्हा आला , अतिशय रुचकर होते !!!   
मेनू होता भात , भाजी , आमटी , शिरा, लोणचे आणि लिंबू. 
हळू हळू छोटी छोटी पावले दिसू लागली . 
डोक्यावर टोपी , हातात पिशवी त्यात त्यांना दिलेला खाऊ आणि इतर साहित्य , सांभाळत सांभाळत लगबगीने एकमेकांचा हात पकडून एका रांगेत बैठकीवर जाऊन बसले . 
मग आम्ही जेवण वाढायला सुरुवात केली . 
एका वेळी अंदाजे १० रांगा होत्या आणि प्रत्येक रांगेत अंदाजे ३० मुले बसत होती. 
२-२ च्या रांगा प्रमाणे volunteers विभागले होते . 
जेवण देण्यासाठी  १ team आणि वाढण्यासाठी १ team असे केले होते . 
perfect management !!!
मी वाढण्यासाठी होते .  
जेवण पूर्ण वाढून  झाल्यावर सुरुवात करण्याच्या आधी 
वदनी कवळ घेता हे एकासुरात म्हटले बाळांनी . 
किती सुंदर संस्कार हे !!!
किती गोड बाळ सारी  … 
त्यांना जेवू घालताना आलेला अनुभव भन्नाट होता . 


Annapurna Prasadam
हे करताना दुपार कधी होऊन गेली आणि ४ वाजून गेले हे कळलेच नाही . 
मी आणि माझी मैत्रीण  जेवलो नव्हतो. 
तिथले स्थानिक कार्यकर्ते आम्हाला जेवून घ्या असे सारखे सांगत होते पण 
आमचे पोट तर त्या बाळांना जेवू घालून कधीच भरले होते . 
तृप्त झालो होतो. 
अस्मानी आनंद होता . 
मध्ये मध्ये जेव्हा  break मिळायचा तेव्हा तेव्हा मी camp site वर जाऊन बाकी सगळे पाहायचे . 
आपण एक काम करूया camp site च्या सुरुवातीच्या ठिकाणी जाऊया . 
सर्वप्रथम मी जेथून विद्यार्थी येत होते तिथे गेले ,
बस मधून विद्यार्थी खाली उतरत होते ,
आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि हि बाळे बसमधून खाली उतरतानाच त्यांना टोपी दिली जात होती . 
म्हणजेच camp पर्यंत चालत जाताना त्यांना उन लागू नये . एवढी काळजी मी तरी नाही पहिली अजून कुठे . 
प्रत्येक शाळेबरोबर २-२ volunteers  दिले होते जेणेकरून कोणाचे काही राहून जाऊ नये . 
सुरुवातीला सर्वांचे medical check up केले जात होते . 
सर्व डॉक्टर्स अत्यंत प्रेमाने , आपुलकीने तपासणी करत होते .
विद्यार्थ्यांना  औषधे, विटामिन्स साठी tonic,कृमीवरील tonic दिले जात होती.


 नंतर student distribution कक्ष होता तिथे बाळांना चप्पल दिली जात होती आणि तिसुद्धा all season म्हणजेच 
बाळांना कोणत्याही ऋतूमध्ये त्रास होऊ नये . 
इतका खोल विचार करणे खरच साधी गोष्ट नाही . 
विद्यार्थ्यांना मेणबत्त्या, माचीस,
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू  ह्यांच्या "अनिरुद्ध आदेश पथक " ह्या अंतर्गत वर्षभर चालवल्या जाणाऱ्या चाराख्यामधून जो सुत निघतो 
त्यापासून बनवलेले गणवेश दिले जातात . 
तसेच शाळांच्या शिक्षकांना शाळेसाठी लागणारे साहित्य 
Rings 
cricket kit -  १ bat , ४ stumps , ६ rubbery ball , 
Frisbee Discs दिले जातात . 
ह्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि 
नुसते आरोग्य नाही तर खेळाचे महत्त सुद्धा तितकेच आहे हे मुलांना समजते . 
हे सगळे झाल्यावर सर्व विद्यार्थी अन्नपूर्णा प्रसादम येथे येतात . 
आणि वर मी ते संगीतालच आहे . 
गावकर्यांसाठी सुद्धा असेच असते . 
वैद्यकीय तपासणीचे details खालील फोटोमधून तुम्हाला समजेल . 

details of medical check up
डोळे तपासणी सुद्धा केली जाते आणि विनामुल्य चष्मे दिले जातात ,
E.C .G  काढला जातो , काही मोठा आजार असल्यास तिथल्या सरकारी इस्पितळाचा reference देऊन त्यासंदर्भात 
मार्गदर्शन केले जाते . 
आणि हे सारे विनामुल्य असते . 
आश्चर्य वाटले ना… 
ऊन खूप  असल्याने त्याचा त्रास होऊन कोणाला चक्कर आली तर 
पाण्याबरोबरच लिंबू पाणी सुद्धा होते . 
कुठलीही शिबीर न वाटता हे घर असल्यासारखे वाटत होते आणि प्रत्येक स्वयंसेवक आपल्याच 
घरातले कार्य आहे , आपलीच सारी माणसे आहेत  भावनेने सेवा करत होता . 
ह्या सगळ्यात ५ कधी वाजले कळलंच नाही . 
camp साधारण ५-६ पर्यंत आवरला.  
दिवस कधी निघून गेला कळलेच नाही . 
मग आम्ही साऱ्या मैत्रिणी इतक्या दिवसांनी एकत्र आलो . 
एकमेकी अनुभव सांगू लागलो ,गप्पा रंगल्या आमच्या . 
आणि मग रात्रीच्या जेवणासाठीचा निरोप आला . 
जेवण झाले आणि मग वेळ आली camp मधून निघायची . 
अजिबात मन नव्हते तिथून निघण्यासाठी . 
हे सेवा शिबीर इतक्या लवकर का संपले ?
आजच का निघायचे ?
अजून पाहिजे न काही दिवस 
ह्या सगळ्या विचारांनी  डोळ्यात  पाणी आले. 
आयुष्यातले हे २ दिवस कधीही न विसरण्यासारखे आहेत . 
जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी मनापासुन करतो तेव्हा मिळणारा 
आनंद हा कोणत्याही इतर आनंदापेक्षा खूप मोठा असतो . 
त्या आनंदातून मिळणारी तृप्ती , समाधान आपल्याला सगळ्यात जास्त श्रीमंत करते . 
असे हे  कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ इथे थांबले 
मी मुद्दाम थांबले म्हणेन कारण हे कधीच संपणार नाही ,
अखंड चालू राहते आणि राहणार … 
अतिशय जड अंतकरणाने मी बस मधले पुन्हा मुंबई ला येण्यासाठी . 
परंतु मनाने अजूनही शिबिरातच होते . 
ह्या सर्व लेखांच्या मालिकेमुळे सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
क्रमश :

Photo Courtesy : - Kolhapur Medical and Health Care Camp                                         Facebook Page  

सुप्रिया नार्वेकर 

Find More Photos and Videos on 

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ५ कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस पहिला


  
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग -
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर - दिवस पहिला

१ फेब्रुवारी २०१५, रविवारचा दिवस.
पण हा हा रविवार सुट्टीचा दिवस  म्हणून घरी लोळत पडण्यासाठी  नव्हता.
तर हा रविवार होता काहीतरी वेगळे करण्याचा.
आपण  ज्या समाजात राहतो , त्या समाजाचे सुद्धा आपण काही देणे लागतो .
पण सध्या आपण फक्त आपलाच विचार करतो, फक्त आपल्याच सुखासाठी
प्रयत्न करतो , चुकीचे नाही आहे हे , पण त्याचबरोबर जर आपण ह्या समाजासाठी
काही केले , गरजू  आहेत त्यांच्यासाठी काही केले तर मिळणारे समाधान , आनंद ह्याची
किंमत अमुल्य असते , आणि ह्याचा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा मी
"कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराच्या पहिल्या दिवशी घेतला .
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराने माझ्या विचारसरणीत झालेला बदल
शब्दांत मांडणे कठीण …

असा हा कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबिराचा पहिला दिवस उजाडला .
दिवस नेहमीसारखाच पण  वातावरणात  चैतन्य वेगळेच होते .
सकाळी ५ ला उठले , माझ्या रूम माझ्या अजून २ मैत्रिणी  होत्या. आम्ही तिघी किंबहुना सगळेच कॅम्पवर
लवकरात लवकर पोहचायचे म्हणून पटापट आवरले आणि खाली आलो .
तरीही काही प्रमुख कार्यकर्ते आमच्याआधीच उठून तयार होऊन आम्हां सर्वाना उठवण्यासाठी आले होते ,
management level किती सुंदर आहे ती बघा .

धर्मशाळेच्या खाली आमच्या सर्वांची चहाची सोय  केली होती . आणि पुन्हा एकदा
Bisleri Bottle देण्यात आली. कॅम्प site हि  कोल्हापूर शहरापासून थोडी लांब असल्या कारणाने
आम्हाला आपापल्या बस मध्ये जाऊन बसण्यास सांगितले .
आमच्या आधीच बसेस ready होत्या .
आम्ही सर्व आपापल्या बस मध्ये जाऊन बसलो .
साईट च्या दिशेने सर्व बसेस निघाल्या .
मुंबईत  बघायला न मिळणारी चूल , गाय ,बैल ह्यांना घेऊन निघालेले  गावकरी , डोक्यावर हंडा घेऊन नदीवर निघालेल्या मुली,
वाऱ्यावर झुलणारी पिके , अहाहा काय मन प्रसन्न करणारे दृश्य होते सारे !!!
सगळीकडे प्रसन्नता होती, हे सारे न्ह्याहाळत असताना कॅम्प साईट केव्हा आली कळलंच नाही.

कॅम्प साईट वर गेल्यावर आमच्या सकाळच्या न्याहरीची सोय केली होती …
कोल्हापूर स्पेशल मिसळ-पाव …
कसली भारी होती…
हे सगळे झाल्यावर आम्हाला मैदानात उभे राहायला सांगितले .
कोणत्याही चांगल्या गोष्टींची  सुरुवात हि भगवंताच्या नामस्मरणानेच होते ,तसे आम्ही परेमेश्वरचे नाव घेतले.
जसे तीसऱ्या भागात आपण पहिले कि "वाटप केल्या जाणाऱ्या साहित्याचे अचूक आणि पद्धतशीर
विभाजन केले होते.प्रत्येक गावाप्रमाणे वेगवेगळे भाग होते आणि तिथे banner वर त्या गावाचे नाव होते आणि त्या गावात जाणाऱ्या
group चे . गावाप्रमाणे सर्व गाठोडी व्यवस्थित रचून ठेवली होती.बघण्यासारखे होते ते सगळे "

 


त्याचप्रमाणे group coordinator हातामध्ये placards घेऊन होते जेणेकरून गोंधळ होऊ नये .
इतके पद्धतशीर होते सगळे.
मग group no . प्रमाणे tempo येत होते.
माझा group no. २३ होता . एकूण २६ group होते.
अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते कि आपला no. येईपर्यंत असंच बसून न राहता आम्हाला तिथे पूर्ण माहिती सांगितली जात होती,कसे वाटप होणार , काय काय आहे त्यात इ , camp साईट वर फिरण्याची मुभा होती .
माझ्यासाठी तर पर्वणीच होती ती ,सगळ्या गोष्टी बारकाईने पहिल्या आणि म्हणूनच कदाचित हे लिहू शकते .
असो
तर पूर्ण साईट वर पाणी वाटप सेवेचे कार्यकर्ते पाणी देत होते…
सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते .
मग आमच्या group चा no. आला , आम्हाला पाटपन्हाळे आणि बांद्रे वाडी अशी दोन गावे होती.
खूप excite होते ,
सुरुवातच सही होती ती म्हणजे
आपल्याला असलेल्या group चे tempo मध्ये material loading चे काम आपणच करायचे .
खाली दिलेल्या video च्या link वरून तुम्हाला समजू शकेल .
https://www.youtube.com/watch?v=Ow3cua7nJg0
खूप धमाल आली हे करताना .
मग आम्ही टेम्पो मध्ये बसलो गावांमध्ये जाण्यासाठी .
टेम्पोत बसण्याची तर मज्जाच न्यारी होती .
दोन्ही गावांमध्ये वाटप करताना आलेले अनुभव
अंगावर शहारे आणणारे होते.
लहान लहान मुले , त्यांचे आई बाबा , आजीबाई , आजोबा , सगळे आधीच
ठरलेल्या ठिकाणी जमले होते .
चेहऱ्यावर त्यांच्या एक वेगळाच आनंद होता.
आणि त्याही पलीकडचे म्हणजे समाधान होते .
जे आपल्याकडे आहे त्यात ते खुश होते .
कुठेही कसलीही हव नव्हती .

आम्हा सर्वांसाठी लिंबू सरबत,चहा ,पाणी हे सारे त्यांनी ठेवले होते.
केवढे प्रेम त्यांचे !!!
हे सारे काही आपल्या परमेश्वरामुळे होते आहे हा त्यांचा त्यांचा विश्वास  मनात एक वेगळेच घर करून गेला .
सुरुवातीला त्यांनी आपल्या परमेश्वराचे नाव घेतले.
त्यांच्या अभंगांमध्ये जी आर्तता होती , जो भाव होता ,त्याने डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्या.
त्यांची ती साधी भोळी भाषा इतकी गोड होती कि काय वर्णन करू त्याचे …

मग यादीप्रमाणे एकेका कुटुंबाचे नाव घेतले जात होते ,
आम्हा कार्यकर्त्यांची एक team उभी राहिली.
१-१ करून वस्तूंचे वाटप होते.
कपड्यांनी भरलेले गाठोडे ,गोधडी, मग साबण (प्रत्येक कुटुंबाला २) , कपडे धुण्याची powder (२ किलो ) , दात  घासण्याची powder (प्रत्येक कुटुंबाला २), जल शुद्धीकरण द्रव्य (१०० मिली ची १ बाटली ) ,खरुज वरील औषध (gamma benzyl ) (१०० मिली ची १ बाटली) , कंगवे , टिकल्या ,
बांगड्या ह्या साऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले . ह्यापैकी साबण , कपडे धुण्याची powder, दात  घासण्याची powder , जल शुद्धीकरण द्रव्य बाटली  ,खरुज वरील औषध  हे साहित्य तेथील स्थानिक स्वयंसेवकांकडून वर्षातून ३ वेळा दिले जाते . 

 

       



हे सारे चालू असताना बाजूला गावकऱ्यांचे अभंग चालूच होते , त्यांच्या गावरान भाषेतील परमेश्वराला आळवणे हे अतिशय गोड होते ,त्यांचे ते साधेभोळे शब्द  हृदयाचा ठाव घेत होते .

https://www.youtube.com/watch?v=eNoCiso3Olg
 लहान मुलांबरोबर , गावकऱ्यानबरोबर मी खूप गप्प मारल्या .
तेव्हा हे समजले कि आता आत आरोग्यविषयक ज्या गोष्टी दिल्या जातात त्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती आहे .
एक अनुभव सांगते  तुम्हाला
"एका आजीला मी कुतूहलाने जल शुद्धीकरण द्रव्याच्या बाटलीकडे बोट दाखवून म्हणाले कि ,
आजी , हे कसे वापरायचे ग ? त्यावर त्या आजीने दिलेले उत्तर इतके गोड होते कि काय सांगू तुम्हाला
"अग बाय , सोप्प आहे कि ……....

आम्हासनी सगलं माहित हाय,दरवर्षी तर येत्यात हे सगले ,सगलं शिकवलंय आम्हासनी"
आणि मग त्या आजीने मला संपूर्ण procedure सांगितली . "
इतका तो साधा गोड भाव …
तिथला प्रत्येक क्षण डोळ्यात पाणी आणणारा होता .
प्रत्येक क्षण मनात कोरला जात होता .

ह्या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही सर्व पुन्हा टेम्पो मध्ये बसलो .
गाव नजरेपासून दूर जात होते पण माझी नजर आणि मी अजूनही मागेच होती .
मग रात्री आम्ही पुन्हा कॅम्प site वर पोहचलो .
तिथे गावकऱ्यानी एक सुंदर सत्संग आयोजित केला होता .

 

आपल्या लाडक्या परमेश्वराला ते आपल्या अभंगातून आळवत होते ,
बेभान होऊन आपल्या लाडक्या  परमेश्वराच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचत होते ,
वातावरणात एक वेगळाच जल्लोष होता. मग आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर दंग झालो .
दिवसभराचा सारा क्षिण १ क्षणात निघून गेला .
हे सगळे बघून परमेश्वराला म्हटले " देवां काय काय साठवू रे डोळ्यांमध्ये !!!"  कधीही न पाहिलेले आणि अनुभवलेले हे सारे क्षण माझ्यासाठी
आयुष्यभराची सोबत होऊन गेले .
इतके अपार प्रेम , इतकी अपार भक्ती , इतकी अपार श्रद्धा ह्या आधी कधीच अनुभवली नाही .
खरच इतके प्रेम कोणी कसे करू शकते ?

सत्संगानंतर आमची रात्रीच्या जेवणाची वेळ झाली .
अप्रतिम असे गावचे चुलीवारचे जेवण !!!
काय चव वर्णू त्याची !!!
जेवण झाल्यावर आपले ताट ,वाटी आपणच घासून ठेवायची , इथे शिस्त अनुभवायला मिळाली .
खूप लहान लहान गोष्टींमधून खूप काही शिकायला मिळाले .

ह्या सगळ्या सुंदर आणि गोड आठवणी घेऊन आम्ही सर्व पुन्हा एकदा आपापल्या बस मध्ये जाऊन बसलो
रहाण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी …
आम्ही रूम वर पोहचलो पुन्हा आम्हाला bisleri bottle देण्यात आली , उद्याच्या reporting time सांगण्यात आले .
पण मी अजूनही त्याच आठवणीत होती …
काय झोप लागणार होती मला ???
आजच्या दिवसाच्या आठवणी आणि उद्याच्या दिवसाची उत्सुकता ह्यात रात्र कशी सरली कळलच नाही …
चला मग आता उद्याच्या दिवसाची  करूया !!!
मुले आणि  गावकरी येणार आहेत ना medical check up करायला !!!

क्रमश :

सुप्रिया नार्वेकर 

Find More Photos and Videos on 
http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/


 

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ४ (कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीरासाठी मुंबईहून निघण्याचा दिवस)


कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग -  ४
 (कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीरासाठी मुंबईहून निघण्याचा दिवस)



अखेर तो दिवस आला ….
३१ फेब्रुवारी २०१५
इतक्या दिवसांची उत्कंठा !!!
कधी एकदा तो दिवस येतोय असे झाले होते .
निघण्याच्या आदल्या दिवशी "एकमेकांना स्ग्स messages चालू होते
"bag pack झाली का ? हे घेतलस का ? ते आहे ना ? झोप आता लवकर… उद्या उठायचे आहे …
बापरे केवढी ती  गडबड आणि तितकीच excitement . कधी एकदा सकाळ होतेय आणि मी bandra ला पोहोचतेय
असे झाले होते .

आणि मग दिवस उजाडला , अतिशय आनंदाने पाय bandra च्या दिशेन धाव घेत होते …
७.५० ला जिथून bus सुटणार होत्या तिथे मी पोहचले .
आणि बघते तर काय सगळ्या बसेस आधीच लागल्या होत्या . प्रत्येक बस वर बस न. चे stickers होते.
मुंबई वरून एकूण २० बसेस होत्या आणि १ बस extra होती कारण पुढे प्रवासात एखाद्या बस चा काही problem झाला तर अडचण नको म्हणून . ती बस पूर्णपणे रिकामी होती. पुन्हा एकदा व्यवस्थापन किती उत्कृष्ट आहे ह्याचा प्रत्यय आला .
संपूर्ण बस रिकामी घेऊन जाणे एवढा विचार कोण करतही नसेल .
बस सुद्धा उत्तम होत्या .
आणि प्रत्येक बस चे coordinator group प्रमाणे उभे होते . मग मी माझ्या बस च्या group च्या line मध्ये
जाऊन उभे राहिले .


Bandra- Leaving Point
    
Bandra- Leaving Point
माझ्या सगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या बस मध्ये होत्या त्यामुळे मी शांत शांत होते .
आमच्या चहा/कॉफी आणि glucose ची biscuits ह्यांची सोय सुद्धा केली होती.
आपली सोय किती उत्तम होणार आहे ह्याची कल्पना तेव्हाच आली .
मग १-१ बस तिथून निघाल्या.
मी सुद्धा आमच्या बस मध्ये गेले ,
माझी बस होती १४ नंबरची
आणि मग काय सुरु झाला आमचा प्रवास कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराच्या दिशेने !!!
प्रत्येक बस मध्ये अंदाजे ३५-४० जणे आम्ही होतो .
बस मध्ये गेल्यावर थोड्या वेळाने आम्हाला एक Bisleri Bottle  आणि एक packet देण्यात आले .
त्या packet मध्ये १ sandwich, १ चटणीचे पाकीट , १ मेदुवडा , १ वाटी उपमा , ketch up चे sachet,
१ लाडू आणि १ केळ असा सकाळचा नाश्ता देण्यात आला आणि तोसुद्धा चवीला उत्तम …
खर तर आम्ही सेवा करायला चाललो होतो पण सेवा तर आमची होत होती .
बस मध्ये सगळे अनोळखी असून सुद्धा आपलेच वाटत होते .
सगळे ओळखीचे कधी  झाले हे कळलंच नाही .
सर्वात प्रथम Introduction Part झाला .
सगळ्यांमधल्या आपलेपणाने आपण सगळे आज नव्याने आणि पहिल्यांदा भेटलो आहोत हे कुठेही जाणवले नाही.
मग अभंग , अनुभव अशा गप्पा रंगल्या .
आणि मग बस १ ल्या Holt च्या इथे थांबली .
खालापूर येथे पहिला Holt होता , तिथे आम्हाला पुन्हा चहा / कॉफी देण्यात आली .
पुन्हा प्रवास चालू झाला .
धमाल ,मजा , मस्ती करत सातारा कधी आले कळलेच नाही .
एका प्रशस्त hall मध्ये आमच्या  दुपारच्या जेवणाची सोय केली होती .
अप्रतिम जेवण आणि जेवानंतर छास …
अहाहा क्या बात हे !!!

इथे आलेला उत्कृष्ट व्यवस्थापनाचा अजून १ अनुभव …
मी आणि माझ्याबरोबर माझ्या बस मधल्या काही मैत्रिणी अशा आम्ही मागे राहिलो होतो ,
आमचे bus - coordinators होतेच आमच्याबरोबर पण तरीही
अमोलसिंह घाडगे जे core team मध्ये होते ते विचारयला आले कि
कोण -कोण आहे मागे अजून ?
म्हणजेच फक्त coordinators वर जवाबदारी न टाकता प्रत्येक main coordinators चे लक्ष
आम्हा सर्वांवर होते.

मग अमोलसिंह घाडगे  ह्यांच्याबरोबर ह्या संदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी जे काही सांगितले त्यावरून
आमचा प्रवास किती सुखकर आणि सुरक्षित आहे पुन्हा ह्याची खात्री पटली
ते म्हणाले कि
"ह्या २१ बस बरोबर ३ गाड्या अजून गाड्या आहेत .
त्या १ल्या गाडीचे काम म्हणजे सगळ्यात पुढे जाऊन Arrangement झाली आहे का हे बघणे ,
सगळ्या बसेस आल्या का हे पाहणे
मग मधोमध २ री गाडी ,मधली कोणती बस मागे राहिली आहे का ?
कोण पुढे आहे हे सगळे पाहणे
आणि सगळ्यात शेवटी ३ री गाडी ,
सगळ्यात मागे कोण आहे ?
कुठल्या बस चा काही प्रोब्लेम झाला आहे का?
वेगवेगळ्या pick -up point वरून कोणी miss नाही झाले ना ?"
हे सगळे ऐकून मी तर गप्पच झाले …
इतके भन्नाट  coordination …
पुन्हा पुन्हा सांगावसे वाटते

"उत्कृष्ट व्यवस्थापन बघायचे असेल तर ते कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीरामध्ये …"

मग पुन्हा प्रवास चालू झाला तो थेट कोल्हापूरच्या दिशेने …
७.३०/८ च्या दरम्यान सगळ्या बसेस कोल्हापूर येथील रवी राय हॉल येथे पोहचल्या .
तिथे आम्हा सर्वांची  चहा / कॉफी आणि जेवणाची उत्तम सोय केली होती .
मग एक अतिशय भावपूर्ण सत्संग झाला आणि पुन्हा एकदा लज्जतदार जेवण !!!
इथेसुद्धा २ प्रकारचे जेवण होते म्हणजे
ज्यांना पूर्ण आहार घ्यायचा आहे ते पूर्ण घेऊ शकतात किंवा
fruit salad होते .
काय म्हणावे ह्या प्रेमाला !!!
काय म्हणावे ह्या व्यवस्थापनाला !!!
आता तुम्ही म्हणाल नक्कीच ह्याला प्रत्येक कार्यकर्त्याला खूप खर्च असेल…
पण चकित व्हाल आता कि ह्या कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीरासाठी
असलेली रक्कम हि पूर्णतः ऐच्छिक होती कोणावरही compulsion नव्हते
आणि ती रक्कम फक्त १२५० रुपये होती .
आश्यर्य वाटले ना … वाटणारच !!!

जिथे हॉल होता तिथे बाजूला माळरान होते.
रात्र आणि वर सुंदर असे चांदणे … अतिशय नयनरम्य असे दृश्य …
त्या चांदण्याचा प्रकाशात न्हाऊन झाल्यावर आम्ही पुन्हा जिथे आमच्या सर्वांची
राहण्याची सोय केली होती तिथे जाण्यासाठी पुन्हा बस मध्ये बसलो.
कोल्हापूरला आपल्या महालक्ष्मी आईच्या मंदिराशेजारी असलेल्या धर्मशाळांमध्ये
आमच्या सगळ्यांची राहण्याची सोय केली होती . तिथे गेल्यावर सुद्धा
आम्हा सर्वांना पुन्हा १-१ Bisleri Bottle देण्यात आली .
प्रत्येकाला १-१ blanket होते ,
पुन्हा एकदा उत्तम सोय …
मग पुन्हा message आला कि उद्या सकाळी ६. ३० चे reporting आहे …
डोळे एकदम मोठे झाले …
पण गावागावांत जाऊन वाटप करणार,गावकरी ,लहान मुले ह्यांच्या बरोबर वेळ
घालवता येणार, कसे असणार हे सगळे ह्या सगळ्या कल्पनांत मी रमून गेले
निघण्याचा दिवसच  इतका भन्नाट गेला कि उद्यापासून काय धमाल असणार
ह्याच विचारांमध्ये होते.
एक खास गोष्ट मला जाणवली कि प्रत्येक ठिकाणी
नवीन नवीन व्यक्ती आपल्याबरोबर arrange केल्या होत्या .
म्हणजे बस मध्ये असणारे , राहण्याच्या ठिकाणी एकत्र नव्हते .
ह्यामुळे सगळ्यांबरोबर मिळून मिसळून कसे वागायचे ,एकत्र कसे राहायचे
हे शिकायला मिळाले .
हि गोष्ट मनाला अतिशय भावली …

दिवसभराच्या ह्या सुंदर आठवणी मनामध्ये साठवून  उद्याच्या
कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीराच्या १ दिवसासाची
स्वप्ने रंगवत झोप  कधी लागली हे कळलच नाही .

क्रमश :

Kolhapur medical and health care camp

 Photo Courtesy :- Kolhapur Medical and Healthcare Camp FB Page




सुप्रिया नार्वेकर

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - ३ - पूर्वतयारी ( Pre -Arrangement ) ( मुंबई )

 कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग - ३ - पूर्वतयारी
 ( Pre -Arrangement ) (मुंबई )

जसे आपण मागच्या भागात camp site आणि गावांमध्ये होणारी पूर्वतयारी पाहिली .
पण कॅम्प साठी मुंबई येथून सुद्धा तितक्याच मेहनतीने तयारी केली जाते .
कॅम्पच्या दोन्ही  दिवसांसाठी लागणारे बहुतांश साहित्य हे मुंबई येथून पाठवले जाते .

जेव्हा मी कॅम्प ला गेले तेव्हा कॅम्प च्या इथे वाटप केल्या जाणाऱ्या साहित्याचे अचूक आणि पद्धतशीर
विभाजन केले होते.  बघण्यासारखे होते ते सगळे . मग कुतुहूल वाटले हे इतके perfect कसे  असू शकते ?
आणि त्याच जिज्ञासेपोटी माहिती मिळवली.

दोन्ही दिवसांची  कशी पूर्वतयारी होते हे बघूया …

पहिला दिवस :- गावागावांमध्ये जाऊन  साहित्याचे वाटप

कॅम्प site वर कुटुंबाच्या नावाप्रमाणे वेगवेगळी गाठोडी होती . त्यामध्ये त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक
साहित्य, कपडे,खेळणी, गोधडी, स्वेटर हे सगळे होते . मग आता हे सगळे कुठून आणि कसे येते ?

१) संपूर्ण वर्षभर मुंबई येथील श्री हरीगुरुग्राम(वांद्रे) येथे जुने जुने ते सोने योजने अंतर्गत कपडे स्वीकारले जातात .
    त्या कपड्यांची प्रत्येक वयोगटानुसार विभागणी केली जाते .
   आणि मग ते camp site ला पाठवले जातात .

२)लहान मुलांना खेळणी दिली जातात तीसुद्धा लोकरीची आणि हि सुंदर खेळणी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू ह्यांच्या संस्थेतल्या श्रद्धावान स्त्रिया बनवतात .

३) गावकऱ्याना दिल्या जाणाऱ्या गोधड्या,स्वेटर सुद्धा मायेची उब ह्या योजनेंतर्गत ह्याच संस्थेमध्ये विणल्या जातात .

दुसरा  दिवस :- कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य सेवा शिबीर


१) अजूनही त्या गावांमध्ये वीज जाते मग अशा वेळी  विद्यार्थांना अभ्यासात काही अडचण  येऊ नये म्हणून       मेणबत्त्या आणि माचिस हि पुरवल्या जातात . विद्याप्रकाश योजनेंतर्गत हे कार्य होते.

२) दिल्या जाणाऱ्या औषधांचे packing डॉक्टर्स करतात .

३) विद्यार्थ्याना दिल्या जाणारा टोप्या, सुकामेवा, चप्पल आणि शाळांना दिले जाणारे खेळाचे साहित्य हे विकत घेऊन पाठवले जाते .

४) विद्यार्थांना देण्यात येणारे  गणवेश सुद्धा चरखा योजनेंतर्गत पाठवला जातात.

५) दुसऱ्या दिवशी होणाऱ्या medical camp साठी डॉक्टर्स ,नर्सेस आणि paramedical staff  असतो.
    त्याचबरोबर डोळे तपासण्यासाठी खास एक team असते आणि विशेष म्हणजे ह्यासाठी optometry course चे       प्रशिक्षण दिले जाते.
 आणि ह्या प्रशिक्षणांतर्गत उत्तमरीत्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची निवड camp साठी होते.

इतकी उत्कृष्ट पूर्व तयारी मी तरी अजून कुठे पाहिली नाही .

ह्या सगळ्यांबरोबरच एक गोष्ट मला विशेष सांगाविशी वाटते कि मुंबईहून कॅम्पला जाणाऱ्या
सर्व कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेतली जाते . ह्या वर्षीची आमची मीटिंग २६ जानेवारी २०१५ ला
दादर येथे शारदाश्रम शाळेत घेण्यात आली होती .



Meeting At Dadar on 26th January 2015


Meeting At Dadar on 26th January 2015
 तेथे आम्हाला एक note देण्यात आली त्यामध्ये आम्हाला
आमचा bus no., आमचे राहण्याचे ठिकाण, आम्हाला आलेली सेवा , आमचे bus coordinators  हि माहिती होती .
त्याचप्रमाणे आम्हाला संपूर्ण कॅम्प ची माहिती देण्यात आली , गेल्या वर्षीची camp ची cd दाखवण्यात आली .
camp चा complete map समजावण्यात आला .
जेणेकरून कुठल्याही कार्यकर्त्याला काही अडचण येणार नाही .

किती हे सुंदर आणि पद्धतशीर व्यवस्थापन .
आणि हे सगळे करणारे आपल्यामधलेच, आपल्यासारखेच .
पण त्या साऱ्यांची मेहनत थक्क करून सोडते.
पुन्हा एकदा संघशक्ती चे महत्त्व कळून येते .
हे सगळे पहिले कि समजते कि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपण
काहीही करू शकतो आणि मग त्याला परमेश्वरची साथ मिळतेच मिळते
आणि ते कार्य यशस्वी होतेच अगदी १०८ %


अशा रीतीने होते कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा शिबिराची पूर्वतयारी .मी खूप थोडक्यात मांडले
आहे. लिहायला गेले तर खूप काही लिहिता येईल .
मला जाणवलेल्या गोष्टी मांडण्याचा मी प्रयास केला आहे .काही राहिले असल्यास अथवा चुकले असल्यास क्षमा असावी .

मग तयार ना आता शिबिरासाठी ???

उद्या भेटूच !!!


क्रमश :

सुप्रिया नार्वेकर
   

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ भाग - २ - पूर्वतयारी ( Pre -Arrangement ) (पेंडाखळे-Camp Site )


कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
भाग - २ - पूर्वतयारी
 ( Pre -Arrangement ) (पेंडाखळे-Camp Site )
मागच्या भागात आपण ह्या शिबिराची थोडक्यात माहिती घेतली .
ह्या भागात आपण "कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर" ह्यासाठी पेंडाखळे ह्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या पूर्वतयारी विषयी जाणून घेऊ .
ह्या वर्षीच्या "कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर" ची तारीख declared झाली आणि मग काय सर्वजण सज्ज झाले
"कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर" साठी .
तारीख होती १ फेब्रूवारी २०१५ ते २ फेब्रूवारी २०१५
प्रत्यक्षात camp मध्ये गेल्यावर सगळ्या गोष्टींची बारकाईने निरीक्षण केल्यावर जाणवले कि
केवढी हि मेहनत !!!
लहानात लहान गोष्टींची घेतली जाणारी काळजी…
कुठल्याही भक्ताला , कार्यकर्त्याला त्रास होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टींचे काटेकोर पणे केलेले आयोजन …
खूप आश्चर्य वाटले हे सगळे पाहून मग त्यामागची मेहनत जाणून घेतली,
कसे शक्य आहे हे ???
काय लिहू मी  ह्या सगळ्यावर …


मागील भागात उल्लेख केल्याप्रमाणे हे शिबीर २ दिवसांचे असते.
पहिल्या दिवशी आरोग्याविषयक आणि जीवनावश्यक साहित्याचे वाटप आणि दुसऱ्या दिवशी आरोग्य तपासणी.

आपण सर्वप्रथम गावागावांमध्ये वाटप होणाऱ्या साहित्याच्या पूर्व तयारीविषयी जाणून घेऊया .
उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणजे "कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य सेवा शिबीर ".

काही ठळक मुद्द्यांवर आपण बघूया जे मला जाणवले
१) गावांमध्ये होणाऱ्या साहित्य वाटपामध्ये एक महत्तवाची गोष्ट मला दिसून   ती म्हणजे अचूक "Data Collection " आणि मुख्य म्हणजे तो update ठेवणे.
२) एकूण गावे , प्रत्येक गावातील कुटुंबाची संख्या , प्रत्येक कुटुंबातील एकूण व्यक्ती , त्यातील स्त्रिया किती, लहान मुले, वयोवृद्ध किती ह्याचे विभाजन केले जाते.
३) आणि हा update ठेवणे म्हणजे  मृत झालेली व्यक्ती , नवीन जन्मला आलेले बाळ , लग्न होऊन आलेली किंवा लग्न करून गेलेली मुलगी हे सर्व. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती मृत पावला असेल तर तीही नोंद ठेवली जाते. किती लहान लहान गोष्टींची नोंद ठेवली आहे
४) शाळांचा data सुद्धा collect केला जातो ,आणि तोसुद्धा रविवार किंवा सुट्टीचा दिवस नाही तर शाळांच्या कामकाजाच्या वेळेतच. केवढी हि शिस्त
५) प्रत्येक शाळेत असणारी एकूण विद्यार्थी संख्या , इयत्तेप्रमाणे विद्यार्थी संख्या  हि माहिती घेतली जाते.
अतिशय अचूक असे व्यवस्थापन !!!

आता आपण actual camp site म्हणजेच पेंडाखळे गावातील जमिनीची पूर्वतयारी बघूया
१) हा संपूर्ण  camp उभा राहतो तो पेंडाखळे ह्या गावात १० एकर जमिनीवर तुम्ही ऐकून असाल गावाकडे शेतजमिनीवर बांध घालणे हा प्रकार असतो पण ह्या camp साठी लागणारी १० एकर हि जमीन कुणा एका शेतकऱ्याच्या मालकीची नसून ती बांध न घालता दिली जाते .
 किती हे प्रेम !!!
२) ४ महिने त्या जमिनीवर एकही पिक घेतले जात नाही. ह्या वैद्यकीय शिबिरामुळे आसपासच्या सगळ्या गावांमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत आणि केवळ ह्या प्रेमापोटी शेतकरी शिबिराच्या आधी ४ महिने तिथे पिक घेत नाही  जेणेकरून हे शिबीर तिथे कोणत्याही अडचणींशिवाय उभे रहावे.
किती हि निरपेक्ष भावना !!!
३) जवळच्या गावातील 
Dr Aniruddha Dhairyadhar Joshi  (सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू) 
यांचे कार्यकर्ते ४ महिने आधीपासूनच ह्या जागेवर सेवेसाठी कार्यरत असतात आणि हे मला कळले ते मान्सून मधील ती शेतजमीन आणि कॅम्प च्या वेळेची शेतजमीन ह्यामधला फरक बघून . विश्वास बसणार नाही  
खरचशेतजमीन होती का ?
खालील छायाचित्रे बघून तुम्हाला समजेलच… 
Camp Site In Mansoon
 
Camp Site In Mansoon

४) गावकऱ्यांच्या, लहान मुलांच्या , कार्यकर्त्यांच्या पायाला इजा होऊ नये म्हणून किती परिश्रम घेतात सगळे .
 site cleaning , leveling , खड्डे बुजवणे , ३-३ वेळा शेणाने सारवणे (एवढी मोठी जमीन शेणाने सारवणे साधी गोष्ट नाही . )
 किती हि काळजी !!!
Site ready for Camp
Site ready for Camp

५) पाण्याची  गैरसोय होऊ नये म्हणून temporary पाण्याचे connections , temporary light connections , temporary toilet बांधणे , मचाण बांधणे, मंडप बांधणे इ .
६) अन्नपूर्णा महाप्रसदाम साठी अंदाजे किती गावकरी येतील , त्यासाठी लागणारे तांदूळ , भाज्या , तिखट ,मीठ मसाला इ गोष्टींची पूर्वतयारी

इतक्या प्रंचड प्रमाणावर केले जाणारे हे कार्य मी तरी ह्या पूर्वी कधीच पहिले नव्हते …
हे सारे थक्क करून सोडणारे होते .


उद्याच्या भागात आपण इतर ठिकाणांवरून  केली जाणारी पूर्वतयारी जाणून घेऊ
चला  मग उद्या भेटूया पुढच्या लेखासाठी …
Photo Courtesy :- 

http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/

https://www.facebook.com/Aniruddhaskmhc

क्रमश :
सुप्रिया नार्वेकर

कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ (भाग - १)


कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
(भाग - १)

कधीही न पाहिलेले,अनुभवलेले, विचारांच्या पलीकडचे वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर.
हा माझ्यासाठी प्रवास होता , क्षण होते , अनुभव होता , सेवा होती नक्की काय होते हे शब्दांत सांगणे कठीण.
पण जे होते ते फक्त अदभुत होते ,अविस्मरणीय होते.
आता तुम्ही म्हणाल कित्येक ठिकाणी आरोग्य शिबीर होतात मग ह्यात काय एवढे वेगळे ?
कारण हे फक्त शिबीर नसून हे सेवा शिबीर आहे . इथे मला "सेवा" ह्या शब्दाचा खास उल्लेख करावासा वाटतो कारण ,
अत्यंत निरपेक्ष भावनेने,अत्यंत प्रेमाने केले जाणारे कार्य म्हणजेच
"कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर"

मी स्वतः ह्या शिबिरासाठी पहिल्यांदा गेले होते.
खूप श्रद्धावान स्नेहयांकडून शिबिराबद्दल ऐकून होते , photos पाहिले होते परंतु
ऐकणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे ह्यातला फरक मला शिबिराला गेल्यावर समजला.
Shree Aniruddha Upasana Foundation ,
Dilasa Medical Trsut and Rehabilitation Center
Shree Aniruddha Aadesh Pathak
SHhreeguru Upasana Foundation
Aniruddha's House of Freinds
ह्यांच्या सयुंक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले जाते .
ह्या वर्षीच्या शिबिराची तारीख होती १ फेब्रुवारी २०१५ ते २ फेब्रुवारी २०१५.
२ दिवसांच्या ह्या शिबिरामध्ये मला आलेले अनुभव , शिबिराचे स्वरूप , वेगवेगळ्या श्रद्धावानंसोबत केलेली चर्चा ,
गावकरी,लहान मुले ह्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा हे सगळे मी तुमच्याबरोबर share करणार आहे .
शिबिरात भेटलेल्या खूपशा स्थानिक स्वयंसेवकानकडून तसेच काही श्रद्धावान स्नेह्यांकडून ह्या शिबिराची खूप माहिती मिळाली.
आणि ह्या सगळ्यामधून ५-६ वेगवेगळ्या भागांमधून कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर ह्याची माहिती देण्याचा प्रयास आहे .
मी खूप ऋणी आहे देवा तुझी  कि मला ह्या कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबिराच्या सेवारूपी महासागरातला  एक थेंब होण्याची संधी दिलीस.

कोल्हापूर शहर म्हणजेच करवीर नगरी ,आपल्या महालक्ष्मी आईचे पवित्र स्थान.
ह्याच करवीर नगरीतील शाहुवाडी तालुका आणि त्यामधले  पेंडाखळे हे गाव आणि तसेच आसपासची अनेक लहान लहान गावे.
हे शिबीर इथे सुरु होण्याआधी काही वर्षांपूर्वी दैनंदिन गरजेच्या गोष्टी , मुलभूत सोयी - सुविधा सुद्धा इथे उपलब्ध नव्हत्या . देवदासी सारख्या रूढी होत्या .
अस्वच्छता, क्षिक्षणाचा अभाव ,पाणी,वीज ह्यांची कमतरता आणि ह्या सगळ्यापेक्षाही बिकट परिस्थिती होती.
आणि
आता  चित्र पूर्णपणे पालटले आहे .आमुलाग्र असा बदल इथे पहायला मिळतो .

हे शिबीर २ भागांत विभागलेले असते.

1 st Day Of Camp

2 nd Day Of Camp









१ ल्या दिवशी नजीकच्या गावांमध्ये आरोग्यविषयक गोष्टी ,साड्या , खेळणी , कपडे इ. गोष्टींचे वाटप केले जाते .
आणि २ ऱ्या दिवशी camp site वर medical camp आणि अन्नपूर्णा महाप्रसादम चे आयोजन असते .
आसपासच्या गावातील हजारो गावकरी आणि मुले इथे येउन आपल्या शरीराची तपासणी करून घेतात.

ह्याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे घेऊच .
हे सगळे पहिले कि कळते
हे कोणा एकट्या व्यक्तीचे काम नाही.
तर हे Team Work आहे
संघशक्ती चे उत्तम उदाहरण म्हणजे "कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर " !!!
उच्चस्तरीय management companies ला पण थक्क करून सोडेल असे
उत्कृष्ट पद्धतीचे व्यवस्थापन !!!

वर पाहता शिबीर फक्त २ दिवसांचे असते परंतु त्या मागची मेहनत संपूर्ण वर्षभराची असते .
"पूर्वतयारी " ह्या पुढच्या भागात आपण ह्याबद्दल सविस्तर जाणून घेऊच .
एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ह्या शिबिरामध्ये नुसते उरकून द्यायचे आहे असा भाव कुठेही नसतो .
प्रत्येक स्वयंसेवक अतिशय प्रेमाने ,मनापासून ह्या सेवा शिबिरामध्ये स्वतःला झोकून देतो .
निर्मळ मनाने , निरपेक्ष भावनेने आणि प्रबळ इच्छाशक्तीने केलेले प्रत्यके कार्य हे उत्तम आणि यशस्वी होतेच !!!
ह्या शिबिरात पाहिलेल्या कित्येक गोष्टी ने तोंडात बोट घालायची वेळ येते.
कुठेही बेशिस्त नाही , धक्का बुक्की नाही , वाद-विवाद नाही , कसलीही गैरसोय नाही , कुठलाही त्रास नाही.
खरच हे सगळे पहिले कि काय म्हणावे तेच सुचत नाही .
जागोजागी दिसतात ते फक्त सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे निष्ठावान कार्यकर्ते !!!
हा चमत्कार आहे , हि जादू आहे , तर नाही
हे फक्त प्रेम आहे
फक्त प्रेम !!!

सगळीकडे पहायला मिळते ते फक्त चैतन्य !!!
मी पाहिलेला , अनुभवलेला , मनाला भावलेला , येणाऱ्या प्रत्येक वर्षी पुन्हा पुन्हा ओढ लावणारा हा Kolhapur Medical and Healthcare Camp
तुमच्या पर्यंत पोहण्याचा हा एक छोटासा प्रयास . आशा करते कि तुम्हाला माझा हा प्रयास आवडेल .
उद्यापासून रोज आपण टप्प्या टप्यांमध्ये ह्या शिबिराची माहिती घेणार आहोत .
मग भेटूया उद्या !!!

http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/p/blog-page.html

 क्रमश: ...

सुप्रिया नार्वेकर

प्रेम कशाला म्हणायचे?


तुझी माझी आठवण...

Tuzi Mazi Aathavan
  

Poem Published in Pratyaksha Newspaper on dated 
Saturday, 26th July 2014 



तुझी माझी आठवण

डोळ्यात तुझ्या
भाव गुंतलेले
पाहताच तुला
मन वेडे झाले

ओठ मिटले
शब्द थांबले
ओंजळीतूनी तुझ्या
प्रेम सांडले

मुक्या झाल्या दिशा
मुके झाले जग सारे
रात्रीस देती आज
तुझ्या स्वप्नांचे पहारे

अंगणी रातराणीचा 
बहर आला
तुझ्या प्रेमाचा
सुगंध त्यात दरवळला

चांदण्याच्या प्रकाशात
रात्र सरली
तुझी माझी आठवण
मनात मी कोरली


- सुप्रियावीरा नार्वेकर